फोटो सौजन्य: Pinterest
Skoda चा हा व्हेरिएंट कमी किमतीत चांगले फीचर्स देतो. यात LED DRLs, प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, अलॉय व्हील्स आणि LED इंडिकेटर्स दिले आहेत. या व्हेरिएंटचे खास आकर्षण म्हणजे सनरूफ. इंटीरियरमध्ये इंफोटेनमेंट सिस्टम, स्पीकर्स आणि स्टीयरिंगवरील कंट्रोल बटणं मिळतात. तसेच फॅब्रिक सीट्स, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल (ACC), मागील प्रवाशांसाठी AC व्हेंट्स आणि क्रूज कंट्रोलसारखी फीचर्स दिली आहेत.
इंजिनबाबत बोलायचं झालं तर यात 1.0 TSI इंजिन आहे, जे सुमारे 110 bhp पॉवर जनरेट करतं. सेफ्टीसाठी 6 एअरबॅग्स दिल्या आहेत. या व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत सुमारे 10.69 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.
Renault Duster चा बेस व्हेरिएंट किंचित स्वस्त असून त्याची किंमत सुमारे 10.4 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. यात LED हेडलॅम्प्स आणि DRLs मिळतात, मात्र अलॉय व्हील्स दिलेले नाहीत. फीचर्सच्या बाबतीत 7-इंच डिस्प्ले, मॅन्युअल AC आणि रिअर AC व्हेंट्स दिले आहेत. स्टीयरिंग अॅडजस्ट करण्याची सुविधाही आहे. मात्र, या व्हेरिएंटमध्ये सनरूफ आणि पूर्ण इंफोटेनमेंट सिस्टमचा अभाव आहे. सेफ्टीसाठी 6 एअरबॅग्स, रिअर पार्किंग असिस्ट आणि ऑटो हेडलॅम्प्स दिले आहेत.
BYD ची स्वस्त Electric Car देतेय 380 km ची रेंज; पाहा किंमत आणि जबरदस्त फीचर्स
फीचर्सच्या बाबतीत Skoda Kushaq स्पष्टपणे पुढे दिसते. यात जास्त फीचर्स आणि प्रीमियम फील मिळतो. जर तुम्हाला अधिक फीचर्स हवे असतील, तर हा पर्याय योग्य ठरेल. तर दुसरीकडे, Renault Duster कमी किमतीत आवश्यक फीचर्स देते, पण काही आधुनिक सुविधांची कमतरता जाणवते. जर तुमचा बजेट मर्यादित असेल, तर Duster हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.






