
हैदराबादमध्ये विक्री आणि सर्व्हिसचे नेटवर्क
फ्लाइंग फ्लीचे हैदराबादमधील नेटवर्क एका कंपनीच्या मालकीच्या स्टोअर आणि 3 पार्टनर आउटलेट्समध्ये विभागले आहे. एर्रागड्डा मेन रोडवरील कंपनी स्टोअरमध्ये विशेष टेक्निकल सपोर्ट दिला जाणार आहे. तर वनस्थलीपुरममधील टॉरस मोटर्स, हायटेक सिटीतील बोल्ट मोटरसायकल्स एलएलपी आणि कोंडापूरमधील एसव्हीआर मोटर्स येथे नियमित सर्व्हिसिंगची सुविधा असेल. या सिस्टममुळे सामान्य सर्विसिंग आणि क्रिटीकल टेक्निकल कामांसाठी स्वतंत्र सुविधा मिळणार आहेत.
रॉयल एनफिल्डची हेल्मेट्सच 2.68 लाखांची! फक्त 16 युनिट्स, जाणून घ्या काय आहे खास
एका चार्जमध्ये 154 किमीची रेंज
फ्लाइंग फ्ली एफएफ.सी6 मध्ये 3.91 kWh क्षमतेचा लिथियम-आयन बॅटरी पॅक देण्यात आला आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, ही बाईक एका चार्जमध्ये 154 किमीपर्यंत धावू शकते. यात परमनंट मॅग्नेट सिंक्रोनस इलेक्ट्रिक मोटर असून ती 15.4 kW पॉवर आणि 60 Nm टॉर्क देते. 2-स्टेज बेल्ट ड्राइव्हद्वारे मागच्या चाकाला पॉवर मिळते. बाईकचा टॉप स्पीड 115 किमी प्रतितास असून, 0 ते 60 किमी प्रतितास वेग गाठण्यासाठी 3.7 सेकंद लागतात. स्टँडर्ड 16A सॉकेटद्वारे बॅटरी 20% ते 80% चार्ज होण्यासाठी सुमारे 65 मिनिटे लागतात.
फीचर्स आणि सेफ्टीवरही भर
या इलेक्ट्रिक मोटरसायकलमध्ये 3.5-इंच गोलाकार TFT टचस्क्रीन, गुगल मॅप्स नेव्हिगेशन, फोन-अॅज-की आणि वायरलेस फोन चार्जिंग मिळते. सेफ्टीसाठी लीन-अँगल सेन्सिटिव्ह ट्रॅक्शन कंट्रोल आणि ड्युअल-चॅनल ABS देण्यात आले आहे. याशिवाय जिओफेन्सिंग, चोरीविरोधी फंक्शन्स आणि SOS फीचरही मिळते.
रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 महागली! सर्व व्हेरिएंट्सच्या किंमतीत ₹2,000 ची वाढ
बाईकमध्ये फोर्ज्ड ॲल्युमिनियम एक्सोस्केलेटन चेसिस, मॅग्नेशियम अलॉय बॅटरी केसिंग आणि पुढे गिर्डर-टाइप सस्पेन्शन आहे. तिचे वजन 124 किलो, सीटची उंची 823 मिमी आणि ग्राउंड क्लिअरन्स 207 मिमी आहे. स्टॉर्म ब्लॅक, फ्ली ग्रीन आणि पॅराशूट व्हाइट अशा 3 रंगांमध्ये ती मिळते. प्रत्येक एफएफ.सी6 सोबत 24×7 रोडसाइड असिस्टन्स दिले जाते. भारतातील विस्तारानंतर कंपनीने युरोप आणि यूकेमध्येही या बाईकची विक्री सुरू केली आहे.