(फोटो सौजन्य-AI एआय)
Hedonist हेल्मेटची किंमत 2.11 लाख
Hedonist हे हाफ-फेस हेल्मेट असून त्याची किंमत £1,650 म्हणजेच अंदाजे 2.11 लाख रुपये आहे. हे हेल्मेट XS, S, M, L, XL आणि XXL अशा 6 साइजमध्ये मिळते. सुरक्षेच्या दृष्टीने याला ECE 22.06 आणि DOT सर्टिफिकेशन मिळाले आहे. त्यामुळे प्रीमियम लूकसोबत आधुनिक सुरक्षा मानकांवरही भर देण्यात आला आहे.
या हेल्मेटमध्ये फायबरग्लास आणि कार्बन फायबरपासून तयार केलेले कंपोझिट फायबर शेल वापरण्यात आले आहे. आतमध्ये Hed Armour लाइनिंग, 360-डिग्री कुशन पॅडिंग आणि Merlin अँटी-बॅक्टेरियल फॅब्रिक देण्यात आले आहे. ब्लॅक लेदर लाइनिंग, व्हाइट लेदर ट्रिम आणि 3-चॅनेल व्हेंटिलेशन सिस्टमसह 7 इंटरचेंजेबल रंगीत व्हायझर्सही मिळतात.
Heroine Racer ची किंमत 2.68 लाख
Heroine Racer हे फुल-फेस हेल्मेट असून त्याची किंमत £2,100 म्हणजे अंदाजे 2.68 लाख रुपये आहे. हे S, M, L, XL, XXL आणि XXXL अशा 6 साइजमध्ये ऑर्डर करता येते. Hedonist प्रमाणे यालाही ECE 22.06 आणि DOT सर्टिफिकेशन तसेच 1 वर्षाची स्टँडर्ड वॉरंटी मिळते.
हेल्मेट बनवण्यासाठी कोणते साहित्य वापरतात आणि ते डोक्याला गंभीर दुखापतीपासून कसे वाचवते? समजून घ्या
या मॉडेलमध्ये अल्ट्रा-लाइट आणि लो-प्रोफाइल शेल, स्टेनलेस स्टील DD बकल, स्टेनलेस स्टील हार्डवेअर आणि अनोडाइज्ड स्टील-कलर्ड ब्रास HEDON प्लेट देण्यात आली आहे. ECE-होमोलोगेटेड क्लिअर व्हायझरसह अतिरिक्त रेड व्हायझरही मिळतो. क्रीम आणि रेड ऑटोमोटिव्ह पेंटला क्रोम पॅटिना शेल आणि ग्लॉस फिनिश देण्यात आले आहे.
ही कलेक्शन रॉयल एनफिल्डच्या क्लासिक मोटरसायकल संस्कृतीला Hedonच्या प्रीमियम क्राफ्टमॅनशिपशी जोडते. त्यामुळे सामान्य रायडिंग हेल्मेटपेक्षा कलेक्टर्स आणि प्रीमियम मोटरसायकल संस्कृतीची आवड असलेल्या रायडर्ससाठी ही कलेक्शन खास ठरते.






