Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जेव्हा एकाच कंपनीच्या दोन बाईक आपापसात भिडतात, Royal Enfield Hunter 350 आणि Bullet 350 मध्ये कोण आहे जास्त सरस?

Royal Enfield Hunter 350 आणि Bullet 350 या रॉयल एन्फिल्डच्या लोकप्रिय बाईक आहेत. पण डिझाइन, इंजिन, मायलेज आणि फीचर्सच्या बाबतीत कोणती बाईक आहे जबरदस्त? चला याबद्दल जाणून घेऊया.

  • By मयुर नवले
Updated On: May 01, 2025 | 03:36 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Follow Us:

भारतात नेहमीच स्टायलिश आणि हाय परफॉर्मन्स बाईक्सनी आपली हवा केली आहे. तरुणांचा देखील अशा बाईक्स खरेदी करण्याकडे जास्त कल असतो. म्हणूनच तर देशात स्टायलीश आणि आकर्षक लूक असणाऱ्या बाईकची विक्री झपाट्याने वाढताना दिसत आहे. त्यातही रॉयल एन्फिल्डच्या बाईक्सने भारतीय मार्केटमध्ये आपला एक विशेष चाहता वर्ग बनवला आहे. हंटर 350 आणि बुलेट 350 या दोन बेस्ट बाईक कंपनी मार्केटमध्ये ऑफर करते.

नुकतेच रॉयल एनफील्डने नवीन रॉयल एनफील्ड हंटर 350 लाँच केली आहे. त्यात एलईडी हेडलाइट्सपासून नवीन सस्पेंशनपर्यंत अनेक फीचर्स अपडेट केले गेले आहे. कंपनी रॉयल एनफील्ड बुलेट 350 देखील त्याच इंजिन आणि फीचर्ससह येते. या दोन्ही बाईक मार्केटध्ये खूप लोकप्रिय आहेत. म्हणूनच आज आपण या बाईक्सची तुलना करणार आहोत. तसेच डिझाइन, फीचर्स, इंजिन आणि किंमतीच्या बाबतीत कोणती बाईक चांगली आहे त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

‘या’ ऑटो कंपनीसाठी April 2025 ठरला कमाईचा महिना; विक्रीत 33 टक्क्यांची वाढ, अन्य कंपन्यांचा कसा होता परफॉर्मन्स?

डिझाइन

रॉयल एनफील्ड हंटर 350: ही एक निओ-रेट्रो रोडस्टर बाईक आहे, जी तरुणांना विशेष लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आली आहे. तिचा कॉम्पॅक्ट आणि मस्क्युलर लूक, गोल एलईडी हेडलॅम्प (मेट्रो व्हेरियंटमध्ये), टियरड्रॉप फ्युएल टॅंक आणि सिंगल-पीस सीट यामुळे ही बाईक अधिक स्टायलिश लूक देते. ही फॅक्टरी ब्लॅक, रिओ व्हाइट, डॅपर ग्रे, बेल ब्लू, लंडन रेड आणि टोकियो ब्लॅक रंगात येते.

रॉयल एनफील्ड बुलेट 350: या बाईकमध्ये मोठे फ्युएल टॅंक, क्रोम अ‍ॅक्सेंट आणि गोल हेडलॅम्प्स तिला रेट्रो लूक देतात. ही बाईक मिलिटरी ब्लॅक, स्टँडर्ड मरून आणि ब्लॅक गोल्ड आणि अशा सात रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

मायलेज आणि परफॉर्मन्स

दोन्ही बाईक 349 सीसी, सिंगल-सिलेंडर, एअर/ऑइल-कूल्ड जे-सिरीज इंजिन वापरतात, जे 20 पीएस पॉवर आणि 27 एनएम टॉर्क जनरेट करते. या दोन्हींचे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहेत. दोन्ही बाईक्सचा टॉप स्पीड सुमारे 114-130 किमी प्रतितास आहे. बुलेट 350 बाईक 37 किमी प्रति लिटर मायलेज देते. तर हंटर 36.2 किमी प्रति लिटरचा मायलेज देते.

फुल्ल टाकीत 600 KM पेक्षा जास्त धावणारी ‘ही’ बाईक फक्त 2 हजारांच्या EMI वर होईल तुमची

फीचर्स

रॉयल एनफील्ड हंटर 350: या बाईकमध्ये एलईडी हेडलाइट पाहायला मिळते. आता तर त्यात मोबाईल फोन चार्ज करण्यासाठी USB टाइप-सी चार्जिंग पोर्ट देखील दिले आहे. यात टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन आणि एसएमएस/कॉल अलर्टसह स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी देखील आहे.

रॉयल एनफील्ड बुलेट 350: यात सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल आहे. तसेच यूएसबी चार्जिंग पोर्ट, डिजिटल फ्युएल गेज, ट्यूबलेस टायर्स, हॅलोजन हेडलाइट, एलईडी टेललाइट, बल्ब टाइप टर्न सिग्नल लॅम्प यांसारखी फीचर्स देखील देण्यात आली आहेत.

किती आहे किंमत?

रॉयल एनफील्ड हंटर 350 भारतीय बाजारात 1.49 लाख ते 1.81 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे. तर रॉयल एनफील्ड बुलेट 350 ही भारतीय बाजारात 1.74 लाख ते 2.18 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे.

Web Title: Royal enfield hunter 350 vs bullet 350 which bike is best in terms of mileage features and price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2025 | 03:36 PM

Topics:  

  • automobile
  • Bullet Bike
  • royal enfield

संबंधित बातम्या

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट
1

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री
2

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री

बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!
3

बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!

मर्सिडीज-बेंझ GLC इलेक्ट्रिक 4 नोव्हेंबरला होणार भारतात लाँच; 715 km रेंजसह येणार ही लक्झरी SUV कार!
4

मर्सिडीज-बेंझ GLC इलेक्ट्रिक 4 नोव्हेंबरला होणार भारतात लाँच; 715 km रेंजसह येणार ही लक्झरी SUV कार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.