फोटो सौजन्य: www.heromotocorp.com
भारतात दिवसेंदिवस बाईकची विक्री वाढताना दिसत आहे. भारतीय ग्राहक नेहमीच बाईक खरेदी करताना उत्तम मायोइज आणि बजेट फ्रेंडली किंमत याकडे लक्ष देत असतात. त्यामुळेच अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या देशात बजेट फ्रेंडली बाईक ऑफर करत असतात. जर तुम्ही सुद्धा अशाच एका बाईकच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच असणार आहे.
जर तुम्ही रोजच्या प्रवासासाठी परवडणारी आणि फ्युएल एफिशियंट बाईक शोधत असाल तर Hero HF 100 तुमच्यासाठी एक चांगला ऑप्शन ठरू शकतो. हिरो एचएफ 100 ही देशातील सर्वात किफायतशीर बाईक मानली जाते, ज्याची मेंटेंनस देखील खूप सोपे आहे. याशिवाय, ही बाईक मायलेजच्या बाबतीतही खूप चांगली आहे, ज्यामुळे पेट्रोलचा खर्चही वाचतो.
भारतीयांना सहज परवडणारी कार पाकिस्तानी लोकांच्या बजेट बाहेर, किंमत एकदा वाचाच
जर तुम्ही ही बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर पूर्ण पैसे देऊन ती खरेदी करणे आवश्यक नाही. तुम्ही Hero HF 100 लोनवर खरेदी करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला दरमहा EMI भरावा लागेल. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
जर आपण राजधानी दिल्लीतील Hero HF 100 बाईकच्या ऑन-रोड किमतीबद्दल बोललो तर या बाईकची किंमत सुमारे 71 हजार रुपये आहे. तुम्ही ही बाईक 10 हजार रुपयांच्या डाउन पेमेंटसह देखील खरेदी करू शकता. यामध्ये, 9.7 टक्के व्याजदराने 36 महिन्यांसाठी सुमारे 2000 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. हिरो Hero HF 100 ची ऑन-रोड किंमत शहरं आणि डीलरशिपनुसार बदलू शकतात.
हिरो HF 100 मध्ये 97.2 सीसी, 4-स्ट्रोक, सिंगल-सिलेंडर, ओएचसी इंजिन आहे, जे 5.9 किलोवॅट पॉवर निर्माण करते आणि 8.05 एनएम टॉर्क जनरेट करते. या बाईकचा टॉप स्पीड 90 किमी प्रतितास आहे. ही बाईक 9.1 लिटर फ्युएल कपॅसिटीसह येते. ही हिरो बाईक 70 किमी प्रति लिटर मायलेज देते. हिरो एचएफ 100 ची एक्स-शोरूम किंमत 59,018 रुपयांपासून सुरू होते.
‘ही’ ऑटो कंपनी काय ऐकत नाही ! फक्त 5 वर्षात 15 लाख कार बनवत गाजवलंय मार्केट
हिरो एचएफ 100 एका लिटर पेट्रोलमध्ये 70 किलोमीटरपर्यंत धावू शकते. या बाईकमध्ये 9.1 लिटरचे फ्युएल टॅंक आहे. या बाईकचे एकूण वजन 110 किलो आहे, ज्याची लांबी 1965 मिमी, रुंदी 720 मिमी आणि उंची 1045 मिमी आहे. याला 165 मिमी ग्राउंड क्लिअरन्स, 1235 मिमी व्हीलबेस आणि 805 मिमी सॅडल हाइट मिळते.
हिरो एचएफ 100 मध्ये 130 मिमी फ्रंट आणि रियर ड्रम ब्रेक आहेत. यात पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक फोर्क सस्पेंशन आणि मागील बाजूला स्विंगआर्मसह 2-स्टेप अॅडजस्टेबल हायड्रॉलिक शॉक अॅब्झॉर्बर्स वापरले आहेत.