फोटो सौजन्य: iStock
देशात मोठया प्रमाणात कार्सची विक्री होते. त्यात आता मार्केटमध्ये इलेक्ट्रिक कार्स व एसयूव्हीला जबरदस्त मागणी मिळताना दिसत आहे. त्यात मार्केटमध्ये अनेक ऑटो कंपन्या विविध सेगमेंटमध्ये कार्स ऑफर करत असतात. नुकताच एप्रिल 2025 मधील कार सेल्स रिपोर्ट जारी करण्यात आला आहे. यात काही ऑटो कंपन्यांच्या विक्रीत वाढ तर काहींच्या विक्रीत घट झाल्याचे दिसून आले आहे. चला जाणून घेऊया Toyota, JSW MG, Kia आणि Hyundai साठी कसा होता एप्रिल 2025 चा महिना.
टोयोटाने एप्रिल 2025 मध्ये 27324 युनिट्सची विक्री केली आहे. कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात म्हणजेच एप्रिल 2025 मध्ये 33 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. यापूर्वी एप्रिल 2024 मध्ये ही संख्या 20494 युनिट्स इतकी होती. टोयोटाने एप्रिल तसेच कंपनीने 2491 युनिट्स निर्यात देखील केल्या आहेत.
फुल्ल टाकीत 600 KM पेक्षा जास्त धावणारी ‘ही’ बाईक फक्त 2 हजारांच्या EMI वर होईल तुमची
दक्षिण कोरियाची वाहन निर्माता कंपनी ह्युंदाईने गेल्या महिन्यात म्हणजेच एप्रिल 2025 मध्ये 60774 युनिट्सची विक्री केली. त्यापैकी 44374 युनिट्स देशांतर्गत बाजारात विकल्या आहेत, तर 16400 युनिट्स निर्यात करण्यात आल्या. कंपनीने इयर व इयर बेसिसवर 21.5 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. यासह, ह्युंदाईने आतापर्यंत 9,000,000 वाहनं विकण्याचा टप्पा गाठला आहे.
ब्रिटिश वाहन निर्माता कंपनी जेएसडब्ल्यू एमजी मोटर्स देखील भारतीय मार्केटमध्ये अनेक सेगमेंटमध्ये कार्स ऑफर करते. कंपनीने एप्रिल 2025 मध्ये भारतात 5829 युनिट्सची विक्री नोंदवली आहे. तर इयर ऑन इयर बेसिसवर 23 टक्के वाढ नोंदवली आहे. तर एप्रिल 2024 मध्ये ही संख्या 4725 युनिट्स होती. यामध्ये MG Windsor EV ने सर्वाधिक योगदान आहे. ही इलेक्ट्रिक CUV सलग सातव्या महिन्यात कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी EV ठरली आहे.
ह्युंदाई प्रमाणे, किआ मोटर्स देखील अनेक सेगमेंटमध्ये कार ऑफर करते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल 2025 मध्ये देशभरात 23623 युनिट्स विकल्या गेल्या. कंपनीने इयर ऑन इयर बेसिसवर 18.3 टक्क्यांची वाढ नोंदवली. कंपनीच्या किया सोनेट या एसयूव्हीला सर्वाधिक मागणी मिळत आहे. गेल्या महिन्यात प्रीमियम एमपीव्ही कार्निव्हलचे 161 युनिट्सची विक्री झाली आहे.
टाटा मोटर्स अनेक सेगमेंटमध्ये कार्स विकते. एप्रिल 2025 मध्ये 45532 प्रवासी वाहनांची विक्री झाली. तर एप्रिल 2024 मध्ये ही संख्या 47983 होती. आकडेवारीनुसार, कंपनीच्या विक्रीत इयर ऑन इयर बेसिसवर 5 टक्क्यांनी घट दिसून आली आहे.