Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Royal Enfield Interceptor 650 एका वेगळ्याच अंदाजात! मुंबईच्या ‘मीन ग्रीन कस्टम्स’ने बनवली इंटरसेप्टर 650  ची दणकेबाज बॉबर बाईक

मुंबईतील 'मीन ग्रीन कस्टम्स'ने रॉयल एनफील्ड इंटरसेप्टर ६५० या लोकप्रिय बाईकला एका अत्यंत आकर्षक आणि अनोख्या रूपात सादर केले आहे. मूळ रचनेत मोठे बदल करून तयार केलेल्या या विशेष मॉडेलचे मुख्य वैशिष्ट्य नेमके काय आहे, हे जाणून घेऊयात.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 17, 2026 | 03:25 PM
Royal Enfield Interceptor 650 एका वेगळ्याच अंदाजात! मुंबईच्या ‘मीन ग्रीन कस्टम्स’ने बनवली इंटरसेप्टर 650  ची दणकेबाज बॉबर बाईक
Follow Us
Follow Us:
  • मुंबईच्या मीन ग्रीन कस्टम्सने रॉयल एनफील्ड इंटरसेप्टर ६५० ला दिला अत्यंत आकर्षक आणि सखल क्लासिक बॉबर अवतार.
  • सॅटिन गोल्ड फिनिश, सोलो सीट आणि रुंद टायर्समुळे या कस्टम बाईकला मिळाला एक वेगळाच प्रीमियम लुक.
  • मूळ ६४८ सीसी इंजिन कायम ठेवत गाडीच्या डिझाइन आणि सौंदर्यावर Builders ने अधिक भर दिला आहे.

रॉयल एनफील्डची लोकप्रिय बाईक इंटरसेप्टर ६५० ही कस्टम बाईक बिल्डर्ससाठी नेहमीच एक उत्तम पर्याय राहिली आहे. परंतु मुंबईतील ‘मीन-ग्रीन कस्टम्स’ या वर्कशॉपने या बाईकला एका वेगळ्याच रूपात सादर केले आहे. त्यांनी या बाईकची मूळ रचना बदलून तिला अत्यंत सखल, सुटसुटीत आणि क्लासिक बॉबर शैलीमध्ये रूपांतरित केले आहे.

या बाईकमध्ये सर्वात मोठा बदल तिच्या रचनेत आणि स्टान्समध्ये करण्यात आला आहे. मूळ बाईकची उंच आणि सरळ बसण्याची रचना बदलून तिच्या मागील सबफ्रेमचा भाग पूर्णपणे नवीन बनवला गेला आहे, जो जमिनीच्या खूप जवळ आहे. तसेच बाईकचा स्विंगआर्म किंचित लांब केल्यामुळे मागचे शॉक्स तिरपे बसले आहेत, ज्यामुळे बॉबर बाईकला मिळणारा खास स्लोपिंग लूक या गाडीला मिळतो.

Classic Legends : क्लासिक लिजेंड्सचा अनोखा उपक्रम! जावा आणि येझदी रायडर्सनी Bike Rally काढून साजरा केला Independence Day

गाडीची मूळ दुहेरी सीट काढून त्याऐवजी एक कस्टम सोलो सीट बसवण्यात आली आहे, जी फ्रेमवर तरंगल्यासारखी दिसते. बाईकचे मूळ १८-इंची व्हील्स कायम ठेवून त्यावर शिनको ई-२७० सुपर क्लासिक टायर्स चढवले गेले आहेत. या जाड टायर्समुळे आणि कस्टम रिब्ड फेन्डर्समुळे गाडीला एक वजनदार आणि क्लासिक लूक प्राप्त होतो.

बाईकचा मध्यभाग अत्यंत स्वच्छ ठेवण्यासाठी मूळ कंपनीचे साईड पॅनेल्स काढून हाताने बनवलेले ॲल्युमिनियम पॅनेल्स आणि इंजिनखाली मेटल बेली पॅन बसवला आहे. हँडलबार बदलून क्लिप-ऑन बार वापरले आहेत आणि हेडलाइट फोर्क्सच्या मध्ये अधिक खोलवर tuck केली आहे. मागील बाजूस छोटा बुलेट-स्टाईल टेल-लॅम्प देऊन डिझाइन अधिक मिनिमलिस्टिक ठेवले आहे.

Toyota New Cars To Launch: भारतात लवकरच लाँच होणाऱ्या टोयोटाच्या ५ नव्या गाड्या! पाहा कोणत्या असतील या कार्स!

नेहमीच्या ग्लॉसी ब्लॅक रंगाऐवजी या बाईकला सॅटिन गोल्ड आणि ब्राँझ रंगाचे फिनिशिंग दिले आहे. हा मेटॅलिक रंग, ब्लॅक इंजिन आणि ब्राऊन-ब्लॅक लेदर सीटच्या कॉम्बिनेशनमुळे अत्यंत आकर्षक दिसतो. गाडीच्या इंजिनमध्ये कोणताही बदल केलेला नसून मूळ ६४८ सीसी पॅरेलल-ट्विन इंजिन (४७ पीएस पॉवर आणि ५२ एनएम टॉर्क) कायम ठेवले आहे, कारण बिल्डर्सचा मुख्य भर हा परफॉर्मन्सपेक्षा डिझाइन आणि लूकवर होता.

Web Title: Royal enfield interceptor 650 bobber modification auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 03:25 PM

Topics:  

  • automobile
  • Bikes
  • royal enfield

संबंधित बातम्या

Classic Legends : क्लासिक लिजेंड्सचा अनोखा उपक्रम! जावा आणि येझदी रायडर्सनी Bike Rally काढून साजरा केला Independence Day
1

Classic Legends : क्लासिक लिजेंड्सचा अनोखा उपक्रम! जावा आणि येझदी रायडर्सनी Bike Rally काढून साजरा केला Independence Day

Toyota New Cars To Launch: भारतात लवकरच लाँच होणाऱ्या टोयोटाच्या ५ नव्या गाड्या! पाहा कोणत्या असतील या कार्स!
2

Toyota New Cars To Launch: भारतात लवकरच लाँच होणाऱ्या टोयोटाच्या ५ नव्या गाड्या! पाहा कोणत्या असतील या कार्स!

पेट्रोल-डिझेलचा खर्च वाचणार! या ३ गाड्यांना लवकरच मिळणार हायब्रिड पॉवरट्रेन!
3

पेट्रोल-डिझेलचा खर्च वाचणार! या ३ गाड्यांना लवकरच मिळणार हायब्रिड पॉवरट्रेन!

Tata New EV Cars: टाटा मोटर्सच्या ३ नव्या ईव्ही गाड्या लाँचसाठी सज्ज! नव्या इलेक्ट्रिक गाड्यांसह टाटा पोर्टफोलिओ वाढवणार!
4

Tata New EV Cars: टाटा मोटर्सच्या ३ नव्या ईव्ही गाड्या लाँचसाठी सज्ज! नव्या इलेक्ट्रिक गाड्यांसह टाटा पोर्टफोलिओ वाढवणार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.