Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लोखंड नव्हे तर फायबर बॉडी कार! ८० च्या दशकात मारुतीला धडकी भरवणारी ही ‘डॉल्फिन’ भारतीय कार अचानक कुठे गायब झाली?

१९८२ मध्ये लाँच झालेली 'सिपानी डॉल्फिन' ही फायबरग्लास बॉडी असलेली भारतातील एक क्रांतिकारी आणि वेगवान कार होती, जिने रॅली रेसिंगमध्ये नाव कमावले. मात्र, दोन दरवाजे असणारे डिझाईन, ग्राहकांमध्ये फायबर बॉडीबद्दल असलेली भीती आणि 'मारुती ८००' च्या आगमनामुळे १९८७ मध्ये या कारचे उत्पादन कायमचे बंद झाले.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jun 22, 2026 | 09:50 PM
लोखंड नव्हे तर फायबर बॉडी कार! ८० च्या दशकात मारुतीला धडकी भरवणारी ही ‘डॉल्फिन’ भारतीय कार अचानक कुठे गायब झाली?
Follow Us
Follow Us:

८० च्या दशकात भारतात जेव्हा गाड्यांचा उल्लेख व्हायचा, तेव्हा डोळ्यांसमोर फक्त ॲम्बेसेडर किंवा प्रीमियर पद्मिनी यायच्या. अशा काळात बंगळुरूच्या ‘सिपानी ऑटोमोबाईल्स’ कंपनीने भारतीय रस्त्यांवर एक अशी कार उतरवली, जी आपल्या काळापेक्षा खूप पुढे होती. या कारचे नाव होते ‘सिपानी डॉल्फिन’.

१९८२ मध्ये लाँच झालेली ही कार लोखंडाची नसून, तिची संपूर्ण बॉडी ‘फायबरग्लास’ पासून बनवली गेली होती. ब्रिटनच्या ‘रिलायंट किटन’ या मॉडेलवर आधारित असलेल्या या गाड्यांचे वजन अवघे ५०५ किलो होते. वजनाने हलकी आणि ८४८ सीसी च्या शक्तिशाली इंजिनमुळे या २-डोअर कारचा ‘पॉवर-टू-वेट रेशो’ अप्रतिम होता. यामुळे ही कार रस्त्यावर वाऱ्याच्या वेगाने धावायची. विशेषतः भारतीय रॅली आणि रेसिंग जगतात या कारने अनेक ऐतिहासिक विजय मिळवले आणि कार प्रेमींना वेड लावले.

भारताची शान होती ही कार! ‘ॲम्बेसेडर’ कारची यशोगाथा

परंतु, ही वेगवान ‘डॉल्फिन’ बाजारात मात्र फार काळ टिकू शकली नाही. यामागे सर्वात मोठे कारण होते सुरक्षा आणि भारतीय ग्राहकांची मानसिकता. भारतातील लोकांना फायबरच्या बॉडीवर विश्वास नव्हता; अपघातात ही गाडी पत्त्यांसारखी विखुरेल अशी भीती ग्राहकांना होती. तसेच कौटुंबिक वापरासाठी दोन दरवाजे असलेल्या कारऐवजी चार दरवाजे असणाऱ्या गाड्यांना प्राधान्य दिले जात असे.

रेस जिंकण्यासाठी मर्सिडीजने एका रात्रीत कारचा रंग खरवडला! मर्सिडीजची पांढरी कार ‘सिल्व्हर ॲरो’ अशी बनली?

याच काळात, म्हणजेच १९८३ मध्ये, संजय गांधी यांच्या स्वप्नातील ‘मारुती ८००’ कारने भारतीय बाजारात प्रवेश केला. मारुतीच्या ४-डोअर मजबूत लोखंडी डिझाईन आणि स्वस्त सुट्या भागांमुळे मध्यमवर्गीयांनी सिपानीकडे पूर्णपणे पाठ फिरवली. कंपनीने नंतर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ‘मॉन्टाना’ नावाने ४-डोअर मॉडेल आणले, पण तोपर्यंत मारुतीने बाजारपेठेवर पूर्ण ताबा मिळवला होता. शेवटी, अत्यंत कमी विक्रीमुळे १९८७ मध्ये या वेगवान ‘प्लास्टिक कार’चे उत्पादन कायमचे बंद झाले आणि भारतीय ऑटोमोबाईल इतिहासातील एक धाडसी प्रयोग काळाच्या पडद्याआड गेला.

Web Title: Sipani dolphin the indian vintage fibre body car

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 09:50 PM

Topics:  

  • automobile
  • cars

संबंधित बातम्या

Toyota New Cars To Launch: भारतात लवकरच लाँच होणाऱ्या टोयोटाच्या ५ नव्या गाड्या! पाहा कोणत्या असतील या कार्स!
1

Toyota New Cars To Launch: भारतात लवकरच लाँच होणाऱ्या टोयोटाच्या ५ नव्या गाड्या! पाहा कोणत्या असतील या कार्स!

पेट्रोल-डिझेलचा खर्च वाचणार! या ३ गाड्यांना लवकरच मिळणार हायब्रिड पॉवरट्रेन!
2

पेट्रोल-डिझेलचा खर्च वाचणार! या ३ गाड्यांना लवकरच मिळणार हायब्रिड पॉवरट्रेन!

Tata New EV Cars: टाटा मोटर्सच्या ३ नव्या ईव्ही गाड्या लाँचसाठी सज्ज! नव्या इलेक्ट्रिक गाड्यांसह टाटा पोर्टफोलिओ वाढवणार!
3

Tata New EV Cars: टाटा मोटर्सच्या ३ नव्या ईव्ही गाड्या लाँचसाठी सज्ज! नव्या इलेक्ट्रिक गाड्यांसह टाटा पोर्टफोलिओ वाढवणार!

Skoda Superb 4th Generation: चौथ्या जनरेशनची स्कोडा सुपरब डिझेल इंजिनसह भारतात होणार लाँच! पाहा काय असतील खास फीचर्स
4

Skoda Superb 4th Generation: चौथ्या जनरेशनची स्कोडा सुपरब डिझेल इंजिनसह भारतात होणार लाँच! पाहा काय असतील खास फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.