स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडियाच्या पोर्टफोलिओमध्ये Bentley चा समावेश
स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (SAIPL) ने आज त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये प्रसिद्ध ब्रिटिश लक्झरी कार ब्रँड बेंटलेचा सहावा ब्रँड म्हणून समावेश करण्याची घोषणा केली. 1 जुलै 2025 पासून स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया भारतात बेंटले कारच्या आयात, वितरण आणि सेवांचे संपूर्ण व्यवस्थापन करणार आहे. भारतात झपाट्याने वाढणाऱ्या लक्झरी कार मार्केटमधील सहभाग अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने ही बाब महत्त्वपूर्ण ठरते.
ग्रुपच्या नव्याने स्थापन झालेल्या बेंटले इंडिया या उपकंपनीमार्फत संपूर्ण मार्केटिंग, विक्री आणि विक्रीनंतरची सेवा दिली जाणार आहे. बेंटले इंडियाचे नेतृत्व अबे थॉमस हे करतील. त्यांची ब्रँड डायरेक्टर पदावर नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या सखोल मार्केट अनुभवाचा उपयोग बेंटलेच्या भारतीय विस्तारात होणार आहे.
मुलाने वडिलांना दिलं सरप्राईझ ! खास Birth Date असणारी Royal Enfield दिली भेट
बेंटले इंडिया सुरुवातीला देशातील तीन प्रमुख शहरांमध्ये – मुंबई, बंगळुरू आणि दिल्ली – डीलरशिप नेटवर्क उभारणार आहे. हे आधुनिक शोरूम्स केवळ लक्झरी अनुभव न देता, ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करणाऱ्या सर्व सुविधा एकत्रितपणे देणार आहेत. ग्राहकांना बेंटलेच्या उच्च दर्जाच्या परफॉर्मन्स, उत्कृष्ट कारागिरी आणि वैभवशाली सुविधा अनुभवता येणार आहेत.
स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ पीयूष अरोरा म्हणाले, “बेंटलेला आमच्या कुटुंबात सामील करणे हे आमच्यासाठी अत्यंत गौरवाचे आहे. आमच्या पोर्टफोलिओमध्ये जर्मन अभियांत्रिकीची अचूकता आणि ब्रिटिश लक्झरीची सुंदर संगम साधला गेला आहे. भारतात उच्च दर्जाच्या लक्झरी कार्सची मागणी वेगाने वाढत असून, त्याला उत्तर देण्यासाठी बेंटले एक योग्य पाऊल आहे. अबे थॉमस यांचं भारतीय बाजारातील ज्ञान हे ब्रँडच्या विस्तारासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.”
विक्री, मार्केटिंग आणि डिजिटल विभागाचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर जान ब्युरेस म्हणाले, “भारताच्या युएचएनआय (Ultra High Net-worth Individuals) वर्गासाठी बेंटले एक प्रेरणादायी ब्रँड आहे. आमच्या डीलर पार्टनर्ससह आम्ही ग्राहकांना सर्वोत्तम परफॉर्मन्स आणि लक्झरीचा अनुभव देण्यासाठी कटिबद्ध आहोत.”
बेंटले गेल्या दोन दशकांपासून भारतीय बाजारपेठेत अस्तित्वात आहे. टॉप-टियर लक्झरी ग्राहकांच्या गरजा आणि अपेक्षा पूर्ण करण्यात या ब्रँडने उच्च स्थान निर्माण केले आहे. स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया ग्रुपमध्ये समावेश झाल्याने या ब्रँडच्या विस्ताराला गती मिळणार असून, ग्राहकांना बेंटलेच्या मालकीचा एकसंध आणि जागतिक दर्जाचा अनुभव मिळणार आहे.