फोटो सौजन्य: Arun Smoki (YouTube)
आपल्या देशात जुगाडू लोकांची काही कमी नाही. कित्येक जण नवनवीन जुगाड करत सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. हल्ली एका कारला दुसऱ्या कारमध्ये ट्रान्सफॉर्म केले जाते. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जिथे एका पठ्ठ्याने चक्क एका कारला Lamborghini Huracan मध्ये बदलले आहे.
केरळमधील एका माणसाने अजबच जुगाड केला आहे. त्याच्या कठोर मेहनतीने त्याने जुन्या मारुती सुझुकी अल्टोला अशा प्रकारे मॉडिफाय केले आहे की ते आता लॅम्बोर्गिनी हुराकनसारखे दिसत आहे. इतकेच नाही तर त्याचे इंजिन देखील अशा प्रकारे अपडेट केले आहे की ते अगदी Lamborghini Huracan च्या इंजिनसारखे आवाज करत आहे. केरळच्या बिबिनने मारुती सुझुकी अल्टोला लॅम्बोर्गिनी हुराकनसारखे बनवण्याचे काम केले आहे. बिबिनच्या लॅम्बोर्गिनी प्रतिकृतीच्या खास फीचर्सबद्दल जाणून घेऊया.
Toyota Hyryder साठी लिमिटेड एडिशन Prestige Package लाँच, खास वैशिष्ट्ये आणि किंमत
बिबिनने मारुतीच्या स्पेअर पार्ट्सचा वापर करून भंगारातून ही लॅम्बोर्गिनीची प्रतिकृती तयार केली आहे. त्याने त्याच्या विलक्षण क्रिएटिव्हिटीचा सर्वोत्तम वापर करून ती तयार केली आहे. या हुरॅकन प्रतिकृतीची बॉडी लॅम्बोर्गिनीसारखे दिसत असले तरी, त्याची व्हील्स मारुती सुझुकी अल्टोची आहेत आणि त्यात मारुती सुझुकी 800 चे इंजिन बसवले आहे. हे भारतीय ऑटोमोबाईल अभियांत्रिकीची साधेपणा आणि सुलभता दर्शवते.
बिबिनने मारुती सुझुकी अल्टोचे रूपांतर लॅम्बोर्गिनी हुराकनसारखे करण्यासाठी अंदाजे 1.5 लाख रुपये खर्च केले. यामध्ये फायबरग्लास, सीट्ससाठीचे साहित्य, स्टिअरिंग व्हील आणि इतर ॲक्सेसरीजचा समावेश आहे.
या प्रतिकृतीमध्ये मूळ हुराकनसारखे बटरफ्लाय डोअर्स आणि बटण दाबताच कारचा पुढचा भाग करणारे वायपर-पॉवेर्ड नोज लिफ्ट फीचर्स देखील आहे.
ग्राहकाची आवडती Electric Scooter झाली स्वस्त ! नवीन किंमत वाचाल तर आजच बुक कराल
26 वर्षीय बिबिनने त्याच्या कॉलेजच्या काळात या प्रोजेक्टवर काम करायला सुरुवात केली होती आणि तो पूर्ण करण्यासाठी त्याला सुमारे तीन वर्षे लागली. बिबिनची लॅम्बोर्गिनीची प्रतिकृती अद्याप पूर्णपणे तयार झालेली नाही. त्यात काही किरकोळ बदल आणि सीट कुशन बसवायचे आहेत. याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो ही कस्टम-बिल्ट सुपर कार चालवताना दिसत आहे.