ऑटोमोबाईल क्षेत्रात 5 लाख कारची निर्मिती करत Skoda Auto ने गाठला महत्वाचा टप्पा
स्कोडा ऑटोने भारतात आपल्या अत्याधुनिक उत्पादन सुविधेतून 5 लाख गाड्यांची निर्मिती करून एक महत्त्वाचा मैलाचा दगड गाठला आहे. स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (SAVWIPL) चे हे यश भारतातील त्यांच्या दीर्घकालीन वचनबद्धतेचे आणि स्थानिक उत्पादन क्षमतेवरील विश्वासाचे प्रतिक आहे. या प्रवासात त्यांनी केवळ दर्जा व सुरक्षिततेला प्राधान्य दिले नाही, तर भारतीय मार्केटला आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर नेले आहे.
2001 मध्ये स्कोडाने छत्रपती संभाजीनगर येथील प्रकल्पातून पहिली ऑक्टेव्हिया भारतीय बाजारात आणली होती. या एकाच मॉडेलपासून सुरुवात करून, स्कोडाने भारतीय ग्राहकांच्या पसंतीनुसार विविध मॉडेल्स सादर केली आहेत. ऑक्टेव्हिया, लॉरा, सुपर्ब, कोडियाक यांसारख्या लक्झरी गाड्यांपासून ते कुशाक, स्लाव्हिया, आणि सब-4-मीटर किलाक यांसारख्या नवीन जनरेशन कारपर्यंत त्यांनी सतत नवकल्पनांना प्राधान्य दिले. या गाड्यांनी भारतीय वाहनप्रेमींसोबत एक भावनिक नातेसुद्धा निर्माण केले आहे.
या इलेक्ट्रिक कारने Tata च्या लोकप्रिय EVs ला दाखवला बाहेरचा रस्ता, सटासट विकले गेले 19,394 युनिट्स
या कार्स केवळ देशांतर्गत वापरापुरत्याच मर्यादित नसून, भारतात बनलेल्या स्कोडा गाड्यांचे जागतिक विस्तारातही महत्त्व वाढले आहे. व्हिएतनाममधील नव्या उत्पादन प्रकल्पात भारतात तयार झालेल्या सुटे भागांचा वापर केला जात आहे. येथून कुशाक आणि स्लाव्हिया यांचे स्थानिक उत्पादन व्हिएतनामसाठी सुरू करण्यात आले आहे. भारत आता स्कोडा ग्रुपसाठी केवळ उत्पादन केंद्र नाही, तर धोरणात्मक निर्यात केंद्र म्हणून पुढे येत आहे. हे भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाशी पूर्णतः सुसंगत आहे.
स्कोडा ऑटोचे उत्पादन व लॉजिस्टिक विभागाचे बोर्ड सदस्य आंद्रे डिक म्हणाले, “भारतात 5 लाख गाड्यांचे उत्पादन करणे ही आमच्या स्थानिक सहभागाची आणि गुणवत्ता-निष्ठेची साक्ष आहे. भारतीय अभियांत्रिकी कौशल्य आणि जागतिक उत्पादन प्रणाली एकत्र आणत आम्ही एक मजबूत आणि लवचिक इकोसिस्टम तयार केली आहे.”
घरादारावर तुळशीपत्र ठेवणाऱ्या Osho कडे तब्बल 93 Rolls Royce Cars, एवढा पैसा आला कुठून?
स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडियाचे सीईओ पियूष अरोरा यांनी सांगितले की, “हे केवळ एक आकडेवारी यश नाही, तर ५ लाख कुटुंबांसोबत जोडलेले नाते आहे. प्रत्येक कार ही युरोपियन अभियांत्रिकीचा उत्कृष्ट नमुना आहे.”
भारतातील दोन प्रमुख उत्पादन केंद्रांपैकी सुमारे 70% कार्स पुण्यात तर उर्वरित छत्रपती संभाजीनगर येथे तयार झाल्या आहेत. मार्च 2025 मध्ये स्कोडाने विक्रीत उच्चांक गाठत 7422 युनिट्स डिलिव्हरी करून आपली मार्केटमधील स्थिती अधिक बळकट केली आहे.