फोटो सौजन्य: Social Media
भारतात ज्याप्रमाणे दुचाकींची संख्या वाढत आहे, त्याचप्रमाणे अपघातांची संख्या सुद्धा वाढताना दिसत आहे. याचमुळे आता वाहतुकीचे नियम अधिक कठोर करण्यात आले आहे. त्यातही हेल्मेट बंधनकारक करण्यात आले आहे. मार्केटमध्ये तुम्हाला असे देखील हेल्मेट बघायला मिळतील, ज्यांची किंमत ही खूपच कमी असते. परंतु अशाप्रकारचे हेल्मेट वापरणे तुमच्या सुरक्षिततेसाठी धोक्याचे ठरू शकते.
मार्केटमध्ये अशा अनेक उत्तम हेल्मेट निर्मात्या कंपन्या आहेत, ज्या हाय क्वालिटी आणि बेस्ट सेफ्टी असणाऱ्या हेल्मटस ऑफर करतात. त्यातीलच एक कंपनी म्हणजे स्टीलबर्ड. हेल्मेट उत्पादक कंपनी स्टीलबर्डने विंटेज सीरिजचे नवीन हेल्मेट भारतीय बाजारपेठेत लाँच केले आहेत. या सिरीजमधील हेल्मेट किती किंमतीला लॉन्च केले आहेत? यामध्ये कोणते फीचर्स दिले आहेत आणि ते किती सुरक्षित असतील?. या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या बातमीत जाणून घेणार आहोत.
मागील 5 वर्षात EV ची रेकॉर्डब्रेक विक्री, ‘या’ राज्यात सर्वाधिक मागणी
स्टीलबर्डने भारतीय बाजारपेठेत नवीन विंटेज सिरीज या नावाने नवीन हेल्मेट लाँच केले आहेत. हे खास अशा रायडर्ससाठी आणले आहे ज्यांना सुरक्षेसोबतच स्टाइल सुद्धा आवडते.
हे हेल्मेट बनवण्यासाठी कंपनीने थर्मोप्लास्टिक शेलचा वापर केला आहे, जो चांगली इम्पॅक्ट रेसिस्टेंस प्रदान करते आणि या हेल्मेटचे वजनही कमी आहे. हाय डेन्सिटी एक्सपांडेड पॉलिस्टीरिनमुळे, हे नवीन हेल्मेट्स प्रवासादरम्यानचे धक्के अधिक चांगल्या प्रकारे शोषून घेतात, ज्यामुळे रायडरची सुरक्षितता वाढते. यासोबतच मागच्या बाजूला लेदरचा पट्टा देण्यात आला आहे, जो हेल्मेटला विंटेज लुक देतो. हाफ फेस हेल्मेट असल्याने ते चांगले वेंटिलेशन प्रदान करते.
हे हेल्मेट कंपनीने अतिशय सुरक्षितरित्या बनवले आहे. हे DOT (FMVSS क्रमांक 218) आणि BIS (IS 4151:2015) सुरक्षा मानदंडांवर प्रमाणित आहे. यामुळे देशात तसेच परदेशातही सुरक्षित राईडची खात्री मिळते.
स्टीलबर्ड हेल्मेटचे मॅनेजिंग डिरेक्टर राजीव कपूर म्हणाले की, भारतात दर तासाला 53 रस्ते अपघात होतात आणि 19 जणांना आपला जीव गमवावा लागतो. यापैकी ४५ टक्के अपघात हे दुचाकी वाहनांशी संबंधित आहेत. अशा परिस्थितीत रायडर्सनी सुरक्षिततेला प्राधान्य देणे आणि स्टाइलची तडजोड न करणे महत्त्वाचे आहे.
स्टीलबर्डने नवीन हेल्मेट सिरीजमध्ये एकूण तीन हेल्मेट सादर केले आहेत, ज्यात SBH-54, SBH-55 आणि SBH-56 यांचा समावेश आहे. हे अनेक रंग आणि साइजमध्ये आणले गेले आहेत. यामध्ये तीन आकार देण्यात आले आहेत, ज्यात 580mm, 600mm आणि 620mm यांचा समावेश आहे.
या हेल्मेटची किंमत कंपनीने 959 रुपयांपासून सुरू केली आहे आणि या सिरीजमधील सर्वात महाग हेल्मेट 1199 रुपयेमध्ये तुम्ही खरेदी करू शकता.