फोटो सौजन्य: iStock
दिवसेंदिवस देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत वाढ होताना दिसत आहे. वाढत्या इंधनाच्या किंमतींमुळे अनेक ग्राहक इलेक्ट्रिक कार्सच्या खरेदीकडे वळताना दिसत आहे. त्यात आता ज्या कंपन्या आधी फक्त इंधनावर चालणाऱ्या कार्स उत्पादित करत होत्या त्याच आता इलेक्ट्रिक वाहनांच्या प्रोडक्शनवर सुद्धा भर देत आहे. यावरून एक गोष्ट नक्कीच समजते की येणारा काळ हा नक्कीच इलेक्ट्रिक वाहनांचा असणार आहे.
ICE वाहनांच्या तुलनेत भारतात ईव्हीची विक्री जोर धरू लागली आहे. लोकांना हा विभागही आवडताना दिसत आहे. हे पाहता वाहन उत्पादकांकडून उत्कृष्ट फीचर्ससह नवीन ईव्ही आणल्या जात आहेत. पण तुम्हला कधी प्रश्न पडला आहे का की देशातील इलेक्ट्रिक वाहनांची विक्री किती होत असेल. याचे उत्तर आता केंद्र सरकारने दिले आहे.
एप्रिल 2019 ते मार्च 2024 दरम्यान देशभरात किती इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली याची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. चला जाणून घेऊया, ईव्ही विक्रीच्या बाबतीत टॉप-5 मध्ये कोणत्या राज्यांचा समावेश आहे?
एप्रिल 2019 ते मार्च 2024 या पाच वर्षांत किती इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली याची माहिती केंद्र सरकारने संसदेत दिली आहे. यासोबतच या कालावधीत देशातील कोणत्या राज्यांमध्ये किती इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली याचीही माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. माहितीनुसार, या कालावधीत देशभरात ईव्हीच्या एकूण 36,39,617 युनिट्सची विक्री झाली आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने संसदेत दिलेल्या माहितीनुसार, 2019 ते 2024 दरम्यान सिक्कीममध्ये एकाही इलेक्ट्रिक वाहनाची रजिस्ट्रेशन झालेली नाही. याशिवाय लक्षद्वीपमध्ये 19, नागालँडमध्ये 27, अरुणाचल प्रदेशमध्ये 42, लडाखमध्ये 88, अंदमान आणि निकोबारमध्ये 191, दादर नगर हवेली आणि दमण दीवमध्ये 468, मिझोराममध्ये 344, मेघालयमध्ये 572, मणिपूरमध्ये 1273, हिमाचल प्रदेशमध्ये 3043, पुडुचेरी मधील 5933 युनिट्सची नोंदणी झाली आहे.