Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Suzukiची मोठी घोषणा! ठाण्यात भारतातील पहिले ‘Suzuki Lounge’ चे उद्घाटन; ग्राहकांना मिळणार प्रीमियम सर्व्हिस

Suzuki India Launch ‘Suzuki Lounge’Thane : सुझुकी मोटरसायकल इंडियाने ठाण्यातील भिवंडी-पिंपळघर येथे भारतातील पहिले ‘Suzuki Lounge’ सुरू केले असून, ग्राहकांना आधुनिक आणि पारदर्शक सर्व्हिसिंगचा प्रीमियम अनुभव मिळणार आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 27, 2026 | 07:43 PM
Suzuki Lounge’Thane

Suzuki Lounge’Thane

Follow Us
Follow Us:
  • Suzukiची मोठी घोषणा
  • ठाण्यात भारतातील पहिले ‘Suzuki Lounge’
  • सर्व्हिसिंगचा अनुभव होणार प्रीमियम
सुझुकी मोटरसायकल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एसएमआयपीएल) या सुझुकी मोटर कॉर्पोरेशन, जपानच्या दुचाकी उपकंपनीने आज भारतातील पहिल्या ‘सुझुकी लाउंज’चे उद्घाटन केले. हे नवीन एकात्मिक सेवा व ग्राहक अनुभव केंद्र वर्कशॉप भेटी अधिक आरामदायक, पारदर्शक आणि आनंददायी बनवण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. ठाणे (महाराष्ट्र) मधील भिवंडी, पिंपळघर येथील रिद्धी ऑटो एजन्सीज एलएलपी (रिद्धी सुझुकी) या पहिल्या सुझुकी लाउंजचे उद्घाटन श्री. विवेक जैन (असिस्टंट व्हाईस-प्रेसिडंट – आफ्टर सेल्स, एसएमआयपीएल) आणि श्री. ओसामू ताणी (ऑपरेशन मॅनेजर – आफ्टर सेल्स, एसएमआयपीएल) यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी एसएमआयपीएल आणि रिद्धी सुझुकीचे अधिकारी देखील उपस्थित होते.

Yamaha R2 भारतात २.३० लाखात लाँच; २६.५ पीएस पॉवर आणि क्विकशिफटरसह अनेक दमदार फीचर्स!

या उद्घाटनाबद्दल मत व्यक्त करत सुझुकी मोटरसायकल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे सेल्स अँड आफ्टर-सेल्सचे एक्झिक्युटिव्ह ऑफिसर श्री. हरी कृष्ण के. म्हणाले, “सुझुकी लाउंज आमच्या ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनातील महत्त्वाचे पाऊल आहे आणि सर्व्हिस अनुभवामध्ये ‘बाय युअर साईड’ (तुमच्या सोबत) ची भावना घेऊन येते. आजच्या ग्राहकांना केवळ सेवेपेक्षा अधिक अपेक्षा आहे. त्यांना पारदर्शकता, आराम आणि प्रीमियम अनुभवाची गरज आहे. सुझुकी लाउंजच्या माध्यमातून आम्ही उत्तम वातावरण निर्माण करत आहोत, जिथे ग्राहक विश्रांती घेऊ शकतात, कनेक्टेड राहू शकतात आणि त्यांच्या वाहनांच्या सर्व्हिसिंगमध्ये घेतली जाणारी काळजी आणि तज्ज्ञता आत्मविश्वासाने पाहू शकतात.”

सुझुकी लाउंज: जिथे सर्व्हिस आणि ग्राहक अनुभवाचा संगम

सुझुकी लाउंज एका विचारपूर्वक डिझाइन केलेल्या वातावरणात आधुनिक सर्व्हिस वर्कशॉप, प्रीमियम ग्राहक लाउंज आणि नवीन वाहनांचे समर्पित प्रदर्शन क्षेत्र एकत्र आणते, ज्यामुळे ग्राहकांना पारंपरिक वर्कशॉप भेटीपेक्षा वेगळा आणि उत्तम अनुभव मिळतो.

ग्राहक लाउंजमध्ये आदरातिथ्य-केंद्रित दृष्टिकोन दिसून येतो, ज्यामध्ये आधुनिक अंतर्गत रचना (इंटेरियर्स), आकर्षक लाकडी डिझाइन अनुभव आणि लक्षवेधक, योग्य रीतीने संतुलित केलेली प्रकाशयोजना यांचा समावेश आहे. सर्व्हिस भेटीदरम्यान ग्राहकांचे स्वागत करण्यासाठी कॅफे-शैलीतील रिसेप्शन, आरामदायक बसण्याची व्यवस्था आणि संभाषणासाठी खास जागा तयार करण्यात आल्या आहेत. सर्व्हिस क्षेत्र खुली जागा (ओपन लेआऊट) आणि ग्लास पार्टिशन्समुळे लाउंजशी थेट जोडलेले दिसते. सुझुकीचे प्रशिक्षित तंत्रज्ञ वाहनांची दुरुस्ती करत असताना ग्राहकांना वर्कशॉपमधील सर्व हालचाली लाउंजमध्ये बसून स्पष्टपणे पाहता येतात. ठाण्यातील हे आऊटलेट चार सर्व्हिस बे सह सज्ज आहे.

सर्व्हिस आणि लाउंज क्षेत्राला जोडून समर्पित नवीन वाहन प्रदर्शन क्षेत्र तयार करण्यात आले आहे. येथे ग्राहक त्यांच्या भेटीदरम्यान सुझुकीच्या अद्ययावत मोटरसायकल आणि स्कूटर्स पाहू शकतात, तसेच त्यांच्या वैशिष्ट्यांबद्दल अधिक माहिती मिळवू शकतात. सर्व्हिस प्रक्रियेतील पारदर्शकता, नवीन उत्पादने जाणून घेण्याची संधी आणि आदरातिथ्य-प्रेरित जागा यांचा मेळ घालून सुझुकी लाउंज ग्राहकांना अधिक विश्वासार्ह आणि आनंददायी अनुभव प्रदान करते. सुझुकी लाउंजच्या उद्घाटनासह एसएमआयपीएल सर्व्हिस प्रवासाला अधिक समकालीन स्वरूप देत आपले विक्री-पश्चात्त नेटवर्क आणि ग्राहक टचपॉइंट्स अधिक दृढ करत आहे

पुढच्या ४५ दिवसांत लाँच होणार बजाज ऑटोच्या ६ नवीन पॉवरफुल बाईक्स! पाहा कोणत्या बनतील तुमच्या आवडीच्या!

Web Title: Suzuki launch india launch thane premium service

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2026 | 07:43 PM

Topics:  

  • bike
  • Maruti Suzuki
  • Suzuki
  • thane

संबंधित बातम्या

Thane News: ईद-ए- मिलादच्या मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग
1

Thane News: ईद-ए- मिलादच्या मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

ऑफिस, रिटेल, F&B अन् अर्बन लॉजिस्टिक्स एकाच छताखाली; ठाण्यात उभारतेय भारतातील पहिले एकात्मिक शहरी व्यावसायिक केंद्र
2

ऑफिस, रिटेल, F&B अन् अर्बन लॉजिस्टिक्स एकाच छताखाली; ठाण्यात उभारतेय भारतातील पहिले एकात्मिक शहरी व्यावसायिक केंद्र

Thane News: दहीहंडीपूर्वी ‘ठाण्याचा राजा’चा दमदार सराव; ९ थरांची यशस्वी सलामी देत रचला इतिहास
3

Thane News: दहीहंडीपूर्वी ‘ठाण्याचा राजा’चा दमदार सराव; ९ थरांची यशस्वी सलामी देत रचला इतिहास

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधन जवळ येताच बाजारपेठेत राख्यांची रेलचेल; कार्टून राख्यांची क्रेझ कायम
4

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधन जवळ येताच बाजारपेठेत राख्यांची रेलचेल; कार्टून राख्यांची क्रेझ कायम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.