Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

टाटा मोटर्सकडून ऑल-न्यू इंट्रा व्‍ही४० लाँच; स्‍मॉल कमर्शियल वेईकल्‍स आणि पिकअप श्रेणीतील पर्यायी इंधन नेतृत्वाला अधिक दृढ केले

टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनीने आज ऑल-न्यू Intra V40 लाँच करत पर्यायी इंधन गतीशीलता क्षेत्रात आपली झेप अधिक वेगवान केली आहे. यासह कंपनीने वेगाने वाढणाऱ्या स्‍मॉल कमर्शियल वेईकल आणि पिकअप सेगमेंटमधील आपले नेतृत्व अधिक दृढ केले आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jun 04, 2026 | 04:09 PM
टाटा मोटर्सकडून ऑल-न्यू इंट्रा व्‍ही४० लाँच; स्‍मॉल कमर्शियल वेईकल्‍स आणि पिकअप श्रेणीतील पर्यायी इंधन नेतृत्वाला अधिक दृढ केले
Follow Us
Follow Us:

टाटा मोटर्सकडून ऑल-न्यू इंट्रा व्‍ही ४० लाँच; स्‍मॉल कमर्शियल वेईकल्‍स आणि पिकअप श्रेणीतील पर्यायी इंधन नेतृत्वाला अधिक दृढ केले

मुंबई, ३ जून २०२६: टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनीने आज ऑल-न्यू Intra V40 लाँच करत पर्यायी इंधन गतीशीलता क्षेत्रात आपली झेप अधिक वेगवान केली आहे. यासह कंपनीने वेगाने वाढणाऱ्या स्‍मॉल कमर्शियल वेईकल आणि पिकअप सेगमेंटमधील आपले नेतृत्व अधिक दृढ केले आहे. अधिक भार वाहून नेण्यासाठी आणि उच्च कार्यक्षमतेसाठी डिझाइन केलेल्‍या Intra V40 मध्‍ये सीएनजी + पेट्रोल बाय-फ्यूइल तंत्रज्ञानाचे संयोजन आहे. या वेईकलमध्ये १,५२५ किलोची श्रेणीतील सर्वोत्तम पेलोड क्षमता आणि २,९६० मिमी (९.७ फूट) लांबीची लोड बॉडी आहे, ज्यामुळे ऑपरेटरना विविध मार्गांवर विनाव्‍यत्‍यय कामासह जास्तीत-जास्त कमाई करणे शक्य होईल.

१.२-लिटर इंजिन असलेले इंट्रा व्‍ही४० ५८ बीएचपीची कमाल शक्ती आणि १०६ एनएमचा कमाल टॉर्क देते. ही वेईकल आव्‍हानात्‍मक लास्ट-माईल उपयोगांसाठी उत्कृष्ट इंधन कार्यक्षमतेसह दमदार कामगिरी करण्यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. या वेईकलमधील 110-लिटरची सीएनजी टाकी अधिक लांब पल्ल्यासाठी मदत करते, तर बाय-फ्यूइल आर्किटेक्चर इंधनाच्या प्रकारांमध्ये स्थिरता आणि विनाव्‍यत्‍यय कार्य सुनिश्चित करते. टाटा मोटर्सच्या विश्वसनीय प्लॅटफॉर्मवर आधारित या वेईकलमध्‍ये आधुनिक वॉक-थ्रू केबिन, कारसारखे ड्रायव्हिंग डायनॅमिक्स आणि सुधारित सुरक्षा व नियंत्रणासाठी फ्रंट डिस्क ब्रेक्स देण्यात आले आहेत, जे ड्रायव्हरला लांबच्या कामाच्या तासांतही आराम देतात. या वेईकलला हायड्रोफॉर्म्ड चेसिसचा आधार देण्यात आला आहे, जो उत्कृष्ट ताकद, स्थिरता आणि सुबकता प्रदान करतो, ज्यामुळे प्रत्यक्ष कामाच्या परिस्थितीत सातत्यपूर्ण आणि विश्वासार्ह कामगिरी मिळते.

Tata Motors च्या EVs खरेदी करण्याची तयारी करताय? पाहिलं समजून घ्या …

या लॉन्चवर भाष्य करताना, टाटा मोटर्स लिमिटेडचे उपाध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख – एससीव्हीपीयू, श्री. पिनाकी हलदार म्हणाले, “कमी परिचालन खर्च आणि अधिक लवचिकतेच्या गरजेमुळे, लास्ट-माईल मालवाहतुकीमध्ये पर्यायी इंधनांकडे होणारा कल अधिक वेगवान होत आहे. लहान व्यावसायिक वाहने (CV) आणि पिकअप सेगमेंटमध्ये सर्वात मजबूत आणि सर्वात व्यापक पर्यायी इंधन पोर्टफोलिओ तयार करण्यावर स्पष्ट लक्ष केंद्रित करून, टाटा मोटर्स या स्थित्यंतरात आघाडीवर आहे. अगदी नवीन इंट्रा V40 सह, आम्ही आमची बाय-फ्यूएल श्रेणी आणखी मजबूत करतो आणि पर्यायी इंधन गतिशीलतेमधील आमचे नेतृत्व अधिक दृढ करतो, तर आमचा विस्तारणारा इलेक्ट्रिक पोर्टफोलिओ अधिक हरित लास्ट-माईल वाहतुकीकडे होणाऱ्या नियोजित स्थित्यंतराला समर्थन देतो.”

या लाँचसह, टाटा मोटर्स आता भारतातील सर्वात व्यापक बाय-फ्यूइल पोर्टफोलिओ ऑफर करत आहे, ज्यामध्ये एस प्रो बाय-फ्यूइल, एस सीएनजी २.०, इंट्रा व्‍ही२० गोल्‍ड आणि ऑल-न्यू इंट्रा व्‍ही४० यांचा समावेश आहे, जे पेलोडच्या सर्व श्रेणींमध्ये उपलब्ध आहेत. यासोबत झपाट्याने विस्तारणारी इलेक्ट्रिक श्रेणी एस प्रो ईव्‍ही, एस ईव्‍ही १००० आणि इंट्रा ईव्‍ही पिकअप ग्राहकांना इंधनाचे प्रकार, पेलोडच्या गरजा आणि कामाच्या परिस्थितीनुसार अतुलनीय पर्याय उपलब्ध करून देते. यामुळे टाटा मोटर्स या सेगमेंटमधील पर्यायी इंधन उपायांची सर्वात व्यापक प्रदाता बनली आहे.

Tata Motors : टाटा मोटर्सची मोठी घोषणा; सनरूफसह नेक्सॉन Pure+ PS …

इंट्रा व्‍ही४० ला टाटा मोटर्सच्या प्रबळ मालकीहक्‍क परिसंस्‍थेचे पाठबळ आहे, ज्यामध्ये एंड-टू-एंड लाइफसायकल सपोर्टसाठी Sampoorna Seva 2,0 आणि रिअल-टाइम माहिती, प्रतिबंधात्मक देखभाल व अपटाइम ऑप्टिमायझेशनसाठी फ्लीट एज टेलिमॅटिक्सचा समावेश आहे. यामुळे ऑपरेटरना आपली उत्पादकता आणि नफा वाढवणे शक्य होते.

Web Title: Tata motors all new intra v 40 launch auto sector

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 04:09 PM

Topics:  

  • automobile news
  • cars
  • tata motors

संबंधित बातम्या

600 एकरात पसरलेला ‘हा’ आहे भारतातील सर्वात मोठा कार मॅन्यूफॅक्चरिंग प्लांट!
1

600 एकरात पसरलेला ‘हा’ आहे भारतातील सर्वात मोठा कार मॅन्यूफॅक्चरिंग प्लांट!

बापरे! 34,000 कामगार असणारा ‘हा’ आहे जगातील सर्वात मोठा कार बनवण्याचा कारखाना!
2

बापरे! 34,000 कामगार असणारा ‘हा’ आहे जगातील सर्वात मोठा कार बनवण्याचा कारखाना!

Rolls Royce च्या कारवरील या लोगोबद्दल तुम्हाला माहिती आहे का? ही आहे ‘Sprit Of Ecstasy’ ची कहाणी
3

Rolls Royce च्या कारवरील या लोगोबद्दल तुम्हाला माहिती आहे का? ही आहे ‘Sprit Of Ecstasy’ ची कहाणी

अँबेसेडरची सुरुवात इथूनच! जुन्या भारताची ओळख बनलेली हिंदुस्तान लँडमास्टर आजही का खास आहे?
4

अँबेसेडरची सुरुवात इथूनच! जुन्या भारताची ओळख बनलेली हिंदुस्तान लँडमास्टर आजही का खास आहे?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.