Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इलेक्ट्रिक कमर्शियल वाहनांसाठी लीजिंग सुविधा देण्यासाठी ‘ड्रिव्हन’आणि टाटा मोटर्स यांच्यात सामंजस्य करार!

भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनीने एका प्रमुख ईव्ही लीझिंग प्लॅटफॉर्मसोबत नवीन भागीदारीची घोषणा केली आहे. या महत्त्वपूर्ण करारामुळे आगामी काळात वाहतूक क्षेत्रात कोणते क्रांतिकारी बदल होणार आणि फ्लिट ऑपरेटर्ससाठी कोणते नवे पर्याय खुले होणार, याकडे उद्योग जगताचे लक्ष लागले आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 21, 2026 | 03:35 PM
इलेक्ट्रिक कमर्शियल वाहनांसाठी लीजिंग सुविधा देण्यासाठी ‘ड्रिव्हन’आणि टाटा मोटर्स यांच्यात सामंजस्य करार!
Follow Us
Follow Us:
  • टाटा मोटर्स आणि ड्रिव्हन यांच्यात इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहनांच्या तैनातीसाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार झाला आहे.
  • या भागीदारींतर्गत पुढील दोन वर्षांत १,००० पेक्षा जास्त इलेक्ट्रिक ट्रक्स रस्त्यावर उतरवण्याचा मनसुबा आहे.
  • सानुकूलित लीझिंग पर्यायांमुळे फ्लिट ऑपरेटर्सना आता ईव्हीकडे वळणे अधिक सुलभ आणि फायदेशीर ठरणार आहे.

ड्रिव्हन या हेवी कमर्शियल वाहनांच्या ताफ्यासाठी काम करणाऱ्या ईव्ही लीझिंग प्लॅटफॉर्मने भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्ससोबत सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी केली आहे. या कराराचा उद्देश भारतातील फ्लिट ऑपरेटर्ससाठी लीझिंग-आधारित इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहनांच्या तैनातीचा शोध घेणे हा आहे. या सहयोगांतर्गत, ड्रिव्हन टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहन पोर्टफोलिओसाठी सानुकूलित लीझिंग पर्याय प्रदान करेल, ज्यामुळे सोप्या आणि सानुकूलित फायनान्सिंग सोल्यूशन्सद्वारे फ्लिट ऑपरेटर्सना इलेक्ट्रिक वाहनांकडे वळणे सुलभ होईल.

ड्रिव्हन कमर्शियल फ्लिट ऑपरेटर्सच्या गरजांनुसार तयार केलेले ऑपरेटिंग लीझ पर्याय ऑफर करते. फायनान्सिंग, वाहनांची तैनाती आणि चार्जिंग पायाभूत सुविधांमधील दीर्घकालीन त्रुटी दूर करून हे प्लॅटफॉर्म इलेक्ट्रिक वाहनांकडे होणारा बदल अधिक सोपा व व्यावहारिक बनवत आहे, ज्यामुळे संपूर्ण भारतात फ्लिटच्या इलेक्ट्रिककरणाला वेग मिळत आहे.

टाटा मोटर्स पुढच्या महिन्यापासून गाड्यांच्या किंमती २५,००० रुपयांपर्यंत वाढवणार! १ सप्टेंबरपासून दरात वाढ

टाटा मोटर्स सर्वात मोठ्या इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहन पोर्टफोलिओ आणि इलेक्ट्रिककरणाला व्यावहारिक व फायदेशीर बनवणाऱ्या परिसंस्थेसह कमर्शियल मोबिलिटीच्या या बदलाचे नेतृत्व करत आहे. कंपनी वाहनांच्या संपूर्ण कार्यकाळात कामगिरी, अपटाईम, चार्जिंग आणि फायनान्सिंगचा समतोल साधण्यासाठी फ्लिट मालकांसोबत मिळून काम करते. ईव्हीचा स्वीकार वाढत आहे, तसतसे ग्राहकांना शून्य-उत्सर्जन गतीशीलतेकडे आत्मविश्वासाने वळण्यास मदत करण्यासाठी एंड-टू-एंड सोल्यूशन्स प्रदान करण्यावर टाटा मोटर्सचा भर कायम आहे.

या प्रसंगी मत व्यक्त करत टाटा मोटर्स लि. चे व्हाईस प्रेसिडेंट आणि बिझनेस हेड – ट्रक्स, राजेश कौल म्हणाले, “टाटा मोटर्स स्वच्छ गतीशीलतेचे सार्वत्रिकीकरण करण्यासाठी आणि शाश्वत वाहतुकीच्या दिशेने भारताचा प्रवास वेगाने पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे. ड्राइव्हनसोबत सहयोगाने आमच्या ग्राहकांसाठी इलेक्ट्रिक ट्रक्स अधिक सुलभ बनवणे हे आमचे उद्दिष्ट आहे. आमचा इलेक्ट्रिक ट्रक्सचा पोर्टफोलिओ कामगिरी, विश्वासार्हता आणि आर्थिक कार्यक्षमता प्रदान करण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे, जो आमच्या ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करतो आणि त्यांना शून्य-उत्सर्जन तंत्रज्ञानाकडे आत्मविश्वासाने वळण्यास मदत करतो.”

ड्रिव्हनचे सीईओ आणि सह-संस्थापक मानव बंसल म्हणाले, “व्यावसायिक दृष्टिकोनातून इलेक्ट्रिक वाहनांचा ताफा फायदेशीर बनवणे हे मोठ्या प्रमाणावर ईव्हीचा अवलंब करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. फ्लिट ऑपरेटर्सकडून याबद्दल स्वारस्य वाढत असले तरी हा बदल अंतिमतः हे पर्याय किती व्यावहारिक आणि सुलभ आहेत, यावर अवलंबून आहे. टाटा मोटर्ससोबत सहयोगामुळे आम्हाला त्यांच्या प्रबळ वाहन पोर्टफोलिओची सांगड आमच्या लीझिंग मॉडेलशी घालता येत आहे, ज्यामुळे सुरुवातीचा खर्च आणि तैनातीचा वेळ यांसारख्या मुख्य अडचणी दूर होत आहेत. या सहयोगाद्वारे आमचा पुढील दोन वर्षांत १,००० पेक्षा जास्त इलेक्ट्रिक ट्रक्स तैनात करण्याचा मनसुबा आहे. यामुळे फ्लिट ऑपरेटर्सना ईव्हीकडे वळण्याचा स्पष्ट व विस्तारयोग्य मार्ग मिळेल, तसेच भारतातील ईव्ही परिसंस्थेच्या व्यापक वाढीस मदत होईल.”

TVS Apache RTR 160 4V vs Bajaj Pulsar N160 SS: स्पोर्टी लूक आणि हाय-टेक फीचर्स! १.४० लाखांच्या बजेटमध्ये कोणती १६०सीसी बाईक बेस्ट?

ड्रिव्हनच्या सह-संस्थापिका आणि चीफ बिझनेस ऑफिसर अल्पना जैन म्हणाल्या, “समर्थनासाठी योग्य परिसंस्था एकत्र येते, तेव्हा इलेक्ट्रिक वाहनांच्या ताफ्याचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढतो. टाटा मोटर्सच्या बाजारपेठेतील प्रबळ उपस्थितीमुळे फ्लिट ऑपरेटर्सचा विश्वास आणि पोहोच वाढते, कारण ओईएमकडून आम्हाला वाहनांची निगा राखणे आणि अपटाईमची संयुक्त बांधिलकी मिळत आहे, तसेच कार्यक्षमता तपासण्यासाठी तंत्रज्ञानाची सांगड घातली जात आहे.”

टाटा मोटर्स आपल्या प्रबळ पोर्टफोलिओसह देशाच्या इलेक्ट्रिक व्यावयासिक वाहन बदलाचे नेतृत्व करत आहे. कंपनीने टाटा Trucks.ev ब्रँड अंतर्गत नवीन आय-एमओईव्ही (इंटेलिजेंट मॉड्युलर इलेक्ट्रिक वेईकल) आर्किटेक्चरवर आधारित ७ ते ५५ टनांपर्यंतच्या इलेक्ट्रिक ट्रक्सचा सर्वसमावेशक पोर्टफोलिओ नव्याने सादर केला आहे. शाश्वत, कार्यक्षम आणि उच्च-कार्यक्षम ऑपरेशन्ससाठी डिझाइन केलेले हे ट्रक्स ई-कॉमर्स लॉजिस्टिक, बांधकाम साहित्य वाहतूक आणि पोर्ट ऑपरेशन्ससह अनेक क्षेत्रांतील गरजा पूर्ण करतात. वेगाने वाढणाऱ्या ईव्ही चार्जिंग पायाभूत सुविधा आणि देशभरातील सर्व्हिस नेटवर्कच्या पाठिंब्याने टाटा मोटर्स शाश्वत गतीशीलतेला पुढे नेण्यासाठी आणि भारतातील हरित वाहतूक परिसंस्था अधिक दृढ करण्यासाठी आपल्या कटिबद्धतेशी बांधील आहे.

Web Title: Tata motors drivenn electric commercial vehicle auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 03:35 PM

Topics:  

  • automobile
  • finance
  • tata motors

संबंधित बातम्या

रेसिंगची सुरुवात आता लहान वयातच! ओहव्हॅलेच्या मिनी GP बाइक्स भारतात लाँच; किंमत ₹7.30 लाखांपासून सुरु
1

रेसिंगची सुरुवात आता लहान वयातच! ओहव्हॅलेच्या मिनी GP बाइक्स भारतात लाँच; किंमत ₹7.30 लाखांपासून सुरु

सुझुकी V-Strom SX ला नवा अवतार! ₹2.02 लाखांत मिळणार ड्युअल-टोन कलर
2

सुझुकी V-Strom SX ला नवा अवतार! ₹2.02 लाखांत मिळणार ड्युअल-टोन कलर

पेट्रोलही, इलेक्ट्रिकही आणि मेबॅकचा रॉयल थाटही! ₹3.35 कोटींची Mercedes-Maybach S 580e भारतात लाँच!
3

पेट्रोलही, इलेक्ट्रिकही आणि मेबॅकचा रॉयल थाटही! ₹3.35 कोटींची Mercedes-Maybach S 580e भारतात लाँच!

निसानच्या गाड्यांवर घसघशीत सूट! ‘टेक्टन’, ‘मॅग्नाइट’ आणि ‘ग्रॅविटे’वर ७० हजार रुपयांपर्यंतची फेस्टिव्ह ऑफर
4

निसानच्या गाड्यांवर घसघशीत सूट! ‘टेक्टन’, ‘मॅग्नाइट’ आणि ‘ग्रॅविटे’वर ७० हजार रुपयांपर्यंतची फेस्टिव्ह ऑफर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.