टाटा मोटर्स १ सप्टेंबर २०२६ पासून भारतातील आपल्या सर्व गाड्यांच्या एक्स-शोरूम किंमतीत २५,००० रुपयांपर्यंत वाढ करणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक अशा सर्व प्रकारच्या गाड्यांच्या सेगमेंटमध्ये हा दरबदल लागू होईल. वाढत्या इनपुट उत्पादन खर्चामुळे आणि महागाईच्या दबावामुळे हा निर्णय घेण्यात आला असून, खर्चातील काही भाग कंपनी स्वतः सहन करणार आहे, असे कंपनीचे म्हणणे आहे.
कंपनीने आपल्या सर्व पॅसेंजर व्हेइकल सेगमेंटसाठी ही घोषणा केली असली, तरी कोणत्या मॉडेलवर नेमकी किती वाढ होईल, याची अधिकृत यादी अद्याप जाहीर केलेली नाही. पहिल्या तिमाहीत कच्च्या मालाच्या किंमतीत ४.५ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली असून, दुसऱ्या तिमाहीत यात आणखी ३ टक्क्यांची भर पडण्याची शक्यता टाटा मोटर्सने वर्तवली आहे.
कोणत्या गाड्यांच्या किंमती वाढणार?
टाटा मोटर्सकडे सध्या बाजारात मोठी उत्पादन श्रेणी उपलब्ध आहे,
सप्टेंबर २०२५ मध्ये लागू झालेल्या जीएसटी २.० (GST 2.0) बदलांमुळे गाड्यांच्या दरात काही प्रमाणात दिलासा मिळाला होता; मात्र वाढत्या उत्पादन खर्चामुळे त्या सवलतीचा फायदा आता मर्यादित होत चालला आहे. याशिवाय बाजारात सुरू असलेल्या मोठ्या डिस्काउंट्समुळे कंपन्यांच्या नफ्यावर ताण पडत असल्याने हा दरबदलाचा निर्णय घेण्यात आला आहे.






