फोटो सौजन्य: iStock
भारतीय ऑटो बाजारात अनेक उत्तम ऑटो कंपन्या आहेत. यातीलच एक आघाडीची कार उत्पादक कंपनी म्हणजे टाटा मोटर्स. आजही कार खरेदी करताना ग्राहकांची पहिली पसंती ही टाटाच्या कार्सना असते. कंपनी नेहमीच ग्राहकाच्या मागणी आणि आवश्यकतेनुसार बेस्ट कार ऑफर करत असते. तसेच त्यांना आकर्षित करण्यासाठी दमदार डिस्कॉऊंट सुद्धा देते.
अशातच आता कंपनीने आपल्या 4 दमदार कार थेट साऊथ आफ्रिकेत लाँच केल्या आहेत. कंपनीने दक्षिण आफ्रिकेत Harrier, Curvv, Punch आणि Tiago या चार नवीन मॉडेल्स लाँच केल्या आहेत. जोहान्सबर्गमधील सँडटन येथे झालेल्या या कार्यक्रमातून स्पष्ट झाले की कंपनी आता भारताबाहेरही आपली उपस्थिती मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.
आता Mahindra Bolero Neo मिळेल खिश्याला परवडणाऱ्या किमतीत, जाणून घ्या फीचर्स
टाटा मोटर्सने दक्षिण आफ्रिकेतील सर्वात मोठी ऑटोमोबाईल डिस्ट्रिब्युशन कंपनी Motus Holdings सोबत भागीदारीत या कार्सचे लाँचिंग केले आहे. ग्राहकांच्या गरजा आणि तेथील रस्ते लक्षात घेऊन ही वाहने विशेषतः डिझाइन केली आहेत. Harrier ही एक पॉवरफुल आणि प्रीमियम एसयूव्ही आहे, Curvv तिच्या स्पोर्टी डिझाइन आणि प्रगत फीचर्ससह ग्राहकांना आकर्षित करते, Punch ही एक कॉम्पॅक्ट आणि स्टायलिश एसयूव्ही आहे, तर टियागो ही शहरांसाठी एक स्मार्ट आणि परवडणारी हॅचबॅक आहे.
भारतात गेल्या 5 वर्षांत टाटा मोटर्सच्या विक्रीत तब्बल 350 टक्क्याने वाढ झाली आहे. आता कंपनीचा उद्देश हा यशस्वी मॉडेल दक्षिण आफ्रिकेतही राबवण्याचा आहे. सध्या तिथे कंपनीकडे 40 डीलरशिप्स आहेत, ज्यांची संख्या 2026 पर्यंत 60 करण्याची योजना आहे. यामुळे ग्राहकांपर्यंत पोहोच अधिक सोपी होईल आणि त्यांना दर्जेदार आफ्टरसेल्स सर्व्हिस मिळेल.
टाटा मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्रा यांनी सांगितले की, दक्षिण आफ्रिकेतील हे लाँच त्यांच्या जागतिक प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. तर Motus Holdings चे सीईओ ओकेर्ट जॅन्स व्हॅन रेनस्बर्ग यांनी म्हटले की, ही भागीदारी केवळ कार्स विकण्यापुरती मर्यादित नाही, तर ती स्थानिक नागरिकांसाठी विश्वास आणि चांगल्या मोबिलिटीचे भविष्य निर्माण करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे.
टाटा मोटर्स फक्त कार्सच्या विक्रीवर भर देणार नाही, तर स्थानिक लोकांसाठी रोजगार निर्मिती, कौशल्यविकास आणि प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये गुंतवणूक करणार आहे. याशिवाय, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनी किफायतशीर फायनान्सिंगचे पर्याय उपलब्ध करून देईल, ज्यामुळे अधिकाधिक लोक सहजपणे नवीन कार्स खरेदी करू शकतील.