फोटो साैजन्य: @BunnyPunia (X.com)
भारतीय बाजारात अनेक उत्तम कार उत्पादक कंपन्या आहेत. त्यातीलच एक कंपनी म्हणजे टाटा मोटर्स. या ऑटो कंपनीने नेहमीच ग्राहकांच्या डिमांडनुसार उत्तम कार ऑफर केल्या आहेत. यामुळेच तर ग्राहक देखील कार खरेदी करताना नेहमीच टाटाच्या कार्सना पहिले प्राधान्य देत असतात.
टाटा मोटर्सने अनेक सेगमेंटमध्ये उत्तम कार ऑफर केल्या आहेत. यातच आता कंपनी इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये आपले विशेष लक्ष केंद्रित करत आहे. याव्यतिरिक्त कंपनी, आपल्या इतर कारमध्ये वेळोवेळी बदल करताना दिसत आहे. यातच, टाटा मोटर्स त्यांच्या आणखी एका कारचे फेसलिफ्ट व्हर्जन आणण्याची तयारी करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टाटा कोणत्या सेगमेंटच्या वाहनाचे फेसलिफ्ट व्हर्जन आणू शकतो? याबाबत कोणती माहिती समोर आली आहे. त्याबद्दल आज आपण जाणून घेऊया.
Sonu Sood च्या पत्नीचा समृद्धी महामार्गावर अपघात ! ‘या’ इलेक्ट्रिक कारमधून सुरु होता प्रवास
मीडिया रिपोर्ट्सनुसार, टाटा मोटर्स त्यांच्या सध्याच्या कारचे फेसलिफ्ट व्हर्जन आणण्याची तयारी करताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी आपल्या अल्ट्रोज कारचे फेसलिफ्ट व्हर्जन लवकरच करू शकते.
रिपोर्ट्सनुसार, लाँच होण्यापूर्वी कंपनीकडून या कारच्या फेसलिफ्ट मॉडेलची टेस्टिंग सुरु आहे. नुकतेच ही कार टेस्टिंग दरम्यान स्पोर्ट झाली आहे, ज्यामुळे पुढील काही महिन्यांत ही कार लाँच होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
टेस्टिंग दरम्यान दिसणाऱ्या टाटा अल्ट्रोजच्या पुढील, मागील व अलॉय व्हील्समध्ये बदल केले जाण्याची शक्यता आहे. एक्सटिरिअर सोबतच कारच्या इंटिरिअरमध्येही बदल केले जाऊ शकतात आणि काही नवीन फीचर्स देखील दिले जाऊ शकतात. कारमध्ये छोटे बदल करण्यात येतील. त्याच्या इंजिनमध्ये कोणताही बदल होण्याची आशा फारच कमी आहे.
Tata Harrier च्या सर्वात स्वस्त मॉडेलची किंमत किती? डिझाइनपासून ते फीचर्सपर्यंत जाणून घ्या सर्वकाही
टाटा अल्ट्रोझ फेसलिफ्टमध्ये देखील सध्याच्या व्हेरियंटमध्ये दिले जाणारे 1.2 -लिटर इंजिन वापरले जाईल. याशिवाय, त्यात 1.5 लिटर टर्बो डिझेल इंजिन देखील दिले जाईल. ज्यासोबत सिक्स स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय देखील दिला जाईल.
टाटा मोटर्सने अल्ट्रोजच्या फेसलिफ्ट व्हर्जनच्या लाँचिंगबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. परंतु अशी अपेक्षा आहे की ही कार सणासुदीच्या काळात भारतीय बाजारपेठेत अधिकृतपणे लाँच केली जाऊ शकते.
टाटा मोटर्सकडून प्रीमियम हॅचबॅक कार सेगमेंटमध्ये अल्ट्रोझ ऑफर केली जात आहे. या सेगमेंटमध्ये, मारुती बलेनो, टोयोटा ग्लांझा आणि ह्युंदाई आय20 विकते. या कार्ससोबतच, अल्ट्रोझ फेसलिफ्टला चार मीटरपेक्षा कमी असलेल्या एसयूव्हींकडूनही आव्हान मिळेल.