फोटो सौजन्य: Social Media
भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये अनेक विदेशी आणि स्वदेशी कार उत्पादक कंपन्या आहेत. यातीलच एक महत्वाची आणि अग्रगण्य ऑटो कंपनी म्हणजे टाटा मोटर्स. कंपनी नेहमीच ग्राहकांच्या मागणी आणि आवश्यकतेनुसार मार्केटमध्ये उत्तम कार ऑफर करत असते. म्हणूनच तर आजही ग्राहक नवीन कार खरेदी करताना सर्वात आधी टाटा मोटर्सच्या कारचा विचार करतात. कंपनीने आतापर्यंत वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये कार्स ऑफर केल्या आहेत. यात इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये सध्या कंपनी अनेक उत्तम कार आण्याच्या तयारीत आहे.
इलेक्ट्रिक कार्स व्यतिरिक्त, कंपनीने आपल्या पोर्टफोलिओमध्ये शक्तिशाली कारचा समावेश आहे पण जेव्हा एसयूव्हीचा विषय येतो तेव्हा टाटा हॅरियर आपसूकच डोळ्यांसमोर येते. अनेक कार खरेदीदार या कारच्या मस्क्युलर डिझाइन आणि मजबूत पॉवरमुळे ही एसयूव्ही मोठ्या संख्येने खरेदी करतात. परंतु, काही लोकांना या कारची किंमत जास्त वाटू शकते. जर तुम्हीही बजेटअभावी ही एसयूव्ही खरेदी करू शकत नसाल, तर त्याचे बेस मॉडेल तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते. चला या बेस मॉडेलबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
खरंतर, जेव्हाही लोक एसयूव्ही खरेदी करतात तेव्हा ते क्वचितच बेस मॉडेल खरेदी करतात. परंतु, जर तुम्ही टाटा हॅरियरचे बेस मॉडेल खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हॅरियर 3 मॉडेल आणि 27 व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये जर आपण बेस मॉडेलबद्दल बोललो तर हे स्टॅंडर्ड मॉडेलचे स्मार्ट व्हेरियंट आहे.
टाटा हॅरियरच्या स्टॅंडर्ड स्मार्ट मॉडेलची किंमत इतर मॉडेल्सच्या तुलनेत सर्वात कमी आहे. ही कार खरेदी करण्यासाठी ग्राहकांना 14,99,990 रुपये (एक्स-शोरूम) द्यावे लागतील. ही किंमत तुमच्या जवळील शोरुमनुसार बदलू शकते.
फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाले तर, ग्राहकांना R17 अलॉय व्हील्स, 6 एअरबॅग्ज,16 फंक्शनॅलिटीसह ESP, LED प्रोजेक्टर हेडलॅम्प, फ्रंट LED DRL, सर्व प्रवाशांसाठी रिमाइंडरसह 3 PT ELR बेल्ट, आणि पूर्णपणे ऑटोमॅटिक टेम्परेचर कंट्रोल सारखे फीचर्स मिळतात.
हॅरियरच्या बेस मॉडेलमध्ये ग्राहकांना 6-स्पीड ऑटो ट्रान्समिशन 2.0 लीटर क्रियोटेक इंजिन मिळते. या इंजिनच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, तुम्ही पुढच्या जनरेशनमधील KRYOTEC 170 PS टर्बोचार्ज्ड BS6 फेज 2 डिझेल इंजिनसह तुमचे ड्रायव्हिंग अनुभव अधिक चांगला करू शकता, जे 170 PS पॉवर आणि 350 Nm टॉर्क जनरेट करते.