Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tata चा वेगळाच डाव! दाखवली खास AI आधारित टेक्नॉलॉजी, कारमध्ये मिळणार मोबाईलसारखी अपडेट सुविधा

टाटा नेहमीच त्यांच्या कारमध्ये प्रगत फीचर्स समाविष्ट करत असते. नुकतेच टाटाने Software Defined Vehicle या खास फिचरची झलक दाखवली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 23, 2026 | 06:03 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:
  • टाटा मोटर्स ही देशातील एक आघाडीची ऑटो कंपनी
  • TCS ने दाखवली Software Defined Vehicle ची झलक
  • कंपनीचा AI Technology वर भर
भारतीय ऑटो बाजारात Tata Motors च्या अनेक कार लोकप्रिय आहेत. कंपनी नेहमीच त्यांच्या कारमध्ये प्रगत फीचर्स समाविष्ट करत असते. सध्या सगळीकडे AI चा बोलबाला दिसत आहे. हीच बाब लक्षात घेत, अनेक कार उत्पादक कंपन्या काही खास AI आधारित फीचर्सवर लक्षकेंद्रित करत आहेत. टाटाने देखील अशाच एका फिचरची झलक दाखवली आहे.

ऑटो उद्योग वेगाने Software Defined Vehicles (SDVs) कडे वाटचाल करत आहे. याचा अर्थ भविष्यातील कार प्रत्यक्षात मोबाइलसारख्या स्मार्ट डिव्हाइस असतील. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने AI इम्पॅक्ट समिटमध्ये TCS DriveSphere नावाचे एक तंत्रज्ञान प्रदर्शित केली. कंपनीच्या तज्ञांच्या मते, भविष्यात, एकदा खरेदी केलेली कार वर्षानुवर्षे तशीच राहणार नाही; त्याऐवजी, ती कालांतराने स्वतःला अपडेट करत राहील. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

Maruti Fronx Vs Nissan Magnite: इंजिन, मायलेज, फीचर्स आणि किमतीच्या बाबतीत कोणती SUV ठरते बेस्ट?

खरं तर, पूर्वीच्या कार्समध्ये प्रत्येक कामासाठी वेगळे छोटे कम्प्युटर (ECU) होते. ब्रेक, एअरबॅग्ज आणि इन्फोटेनमेंटसाठी स्वतंत्र सिस्टीम बसवण्यात आल्या होत्या. आता, कंपन्या या ECU च्या जागी एक मजबूत सेंट्रल कम्प्युटर आणत आहेत जे संपूर्ण वाहन नियंत्रित करेल. यामुळे कारची सिस्टीम जलद आणि अधिक बुद्धिमान होईल.

AI मुळे कार होईल अजूनच फास्ट

नवीन जनरेशनच्या गाड्या कॅमेरे, रडार, लिडार आणि असंख्य सेन्सर्सने सुसज्ज असतील. हे सर्व सतत रस्ता आणि आजूबाजूच्या परिसराची माहिती देत राहतील. AI या डेटाचा अर्थ लावेल आणि निर्णय लवकर घेईल. उदाहरणार्थ, जर अचानक समोरून एखादी बाईक दिसली तर सिस्टम ताबडतोब ब्रेक लावू शकते. कार तिच्या लेनमधून बाहेर पडली तर ती चेतावणी देऊ शकते. ट्रॅफिकनुसार वेग देखील आपोआप ॲडजस्ट केला जाऊ शकतो. एआयच्या मदतीने, ड्रायव्हिंग पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित आणि सोपे होईल. या तंत्रज्ञानामुळे कार परिस्थितीनुसार विचार करण्यास आणि कृती करण्यास सक्षम होईल.

पगार 25 हजार तरी सुद्धा घ्याल Maruti Swift कार! EMI तर 10 हजारांपेक्षा कमी, जाणून घ्या सोपा आणि सरळ हिशोब

मोबाईलप्रमाणे मिळणार OTA अपडेट्स

आता कारमध्ये सर्वात मोठा बदल म्हणजे ती मोबाईल फोनप्रमाणे ओव्हर-द-एअर (OTA) अपडेट्सद्वारे सतत नवीन होत राहील. एखादे नवीन फीचर लाँच झाले तर त्यासाठी नवीन कार खरेदी करण्याची गरज भासणार नाही. कार इंटरनेटशी जोडलेली असल्यामुळे रात्रीच नवीन फीचर डाउनलोड करून अपडेट पूर्ण करू शकेल. उदाहरणार्थ, AI आधारित पार्किंग असिस्ट किंवा अधिक प्रगत व्हॉईस कमांड सिस्टम उपलब्ध झाल्यास ते थेट सॉफ्टवेअर अपडेटद्वारे तुमच्या कारमध्ये जोडले जाईल. क्लाउड आणि AI यांच्या मदतीने कार वेळोवेळी अधिक स्मार्ट आणि सक्षम होत जाईल.

बिघाड होण्यापूर्वीच मिळणार इशारा

या नव्या तंत्रज्ञानामुळे कार स्वतःच संभाव्य बिघाडाची पूर्वसूचना देऊ शकेल. कारमधील डेटा कंपनीच्या क्लाउड सिस्टीमकडे पाठवला जाईल, जिथे AI त्याचे विश्लेषण करून बॅटरी, ब्रेक किंवा इतर पार्टसमध्ये अडचण निर्माण होण्याची शक्यता ओळखेल. त्यामुळे वेळेवर सर्व्हिस करून मोठा खर्च टाळता येईल.

याशिवाय, AI तुमच्या कारमधील सवयीही लक्षात ठेवेल. उदाहरणार्थ, सीटची पोझिशन, म्युझिकची आवड किंवा एसीची सेटिंग — कार प्रत्येकवेळी सुरू होताच ही सर्व सेटिंग आपोआप पूर्ववत करेल, ज्यामुळे अधिक सोयीस्कर आणि वैयक्तिकृत ड्रायव्हिंग अनुभव मिळेल.

Web Title: Tcs shows glimpse of software defined vehicle tcs drivesphere ai based technology

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 06:03 PM

Topics:  

  • ai
  • automobile
  • tata motors

संबंधित बातम्या

मारुती सुझुकीचा मोठा प्लॅन! टाटा टियागो इव्हीला टक्कर देण्यासाठी १० लाखांच्या बजेटमध्ये आणणार नवीन इलेक्ट्रिक कार
1

मारुती सुझुकीचा मोठा प्लॅन! टाटा टियागो इव्हीला टक्कर देण्यासाठी १० लाखांच्या बजेटमध्ये आणणार नवीन इलेक्ट्रिक कार

Honda August 2026 Sales: ऑगस्ट २०२६ मध्ये होंडा टू-व्हीलर्सचा जलवा! विक्रीत ८% वाढ, एकूण ५.७९ लाख गाड्यांची विक्री
2

Honda August 2026 Sales: ऑगस्ट २०२६ मध्ये होंडा टू-व्हीलर्सचा जलवा! विक्रीत ८% वाढ, एकूण ५.७९ लाख गाड्यांची विक्री

Bajaj Auto Sale In August: ऑगस्ट २०२६ मध्ये बजाज ऑटोच्या विक्रीत २८ टक्क्यांची वाढ; निर्यातीत ५१ टक्क्यांची मोठी झेप
3

Bajaj Auto Sale In August: ऑगस्ट २०२६ मध्ये बजाज ऑटोच्या विक्रीत २८ टक्क्यांची वाढ; निर्यातीत ५१ टक्क्यांची मोठी झेप

न्यू जनरेशन Audi Q3 चे बुकिंग भारतामध्ये अधिकृतपणे सुरू! लाँचपूर्वीच सुरू झाली प्रक्रिया
4

न्यू जनरेशन Audi Q3 चे बुकिंग भारतामध्ये अधिकृतपणे सुरू! लाँचपूर्वीच सुरू झाली प्रक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.