नवी मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर सुजाता पाटील यांनी सीबीडी, नेरूळ, आणि ऐरोलीतील महापालिका रुग्णालयाचा पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी या रुग्णालयातील आरोग्य सुविधा बाबत कमतरता लक्षात घेत, त्या लवकरात लवकर कशा पूर्ण होतील याकडे लक्ष देणार असल्याचे सांगितलंय. तसेच बेड आणि पाहिजे असलेल्या आरोग्य सुविधा सोयीस्कर रित्या आणि वेळेवर उपलब्ध होण्यासाठी एक डॅशबोर्ड तयार करणार असल्याची संकल्पना आखली असून, येत्या सोमवार पर्यंत हा डॅशबोर्ड कार्यान्वित होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे देखील महापौर यांनी सांगितलय. तसेच शहरातील नागरी आरोग्य केंद्र व्यतिरिक्त उप आरोग्य केंद्र देखील सुरू करणार आहोत.