महाड तालुक्यातील कोथेरी धरण प्रकल्पावर सुरू असलेल्या घळभरणीच्या कामाला मंगळवारी स्थानिक प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवत काम बंद पाडले आहे. कोथेरी धरण हा सिंचनासाठीचा महत्त्वाचा प्रकल्प असला तरी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना अपेक्षित फायदे आणि शंभर टक्के पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय घळभरणीचे काम करू नये, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. प्रकल्पग्रस्तांनी याबाबत संबंधित लघु पाटबंधारे विभागाशी पत्रव्यवहार करूनही प्रशासनाने घळभरणीचे काम सुरू केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.घळभरणी पूर्ण झाल्यानंतर पाणीसाठा होईल आणि त्यानंतर प्रशासन मागण्यांकडे दुर्लक्ष करेल, अशी भीती प्रकल्पग्रस्तांकडून व्यक्त होत आहे.