Sunil Grover कडून Land Rover Defender 130 खरेदी
Land Rover Defender 130 च्या विविध व्हेरिएंट्सची एक्स-शोरूम किंमत सुमारे 1.41 कोटी रुपयांपासून सुरू होऊन 1.82 कोटी रुपयांपर्यंत जाते. शहरानुसार ऑन-रोड किंमत जवळपास 2 कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते. सुनील ग्रोव्हर सॅन्टोरिनी ब्लॅक रंगातील Defender 130 मध्ये दिसला आहे, जी अत्यंत आकर्षक आणि दमदार रोड प्रेझेन्स असलेली एसयूव्ही आहे.
लाडकी Hyundai Creta एका क्षणार्धात होईल तुमची! जाणून घ्या Down Payment आणि एमी
Defender 130 ची सर्वात मोठी वैशिष्ट्य म्हणजे याची लांबी. कंपनीने तिला Defender 110 पेक्षा 340 मिमीने अधिक लांब बनवले आहे, ज्यामुळे केबिनमध्ये अधिक जागा उपलब्ध होते. यामध्ये राऊंड एलईडी हेडलाइट्स, एलईडी डीआरएल, मजबूत बोनट, एलईडी टेललाइट्स आणि मागील दरवाजावर फुल-साइज स्पेअर व्हील देण्यात आले आहे. 290 मिमी ग्राउंड क्लिअरन्स आणि 900 मिमीपर्यंत पाण्यातून चालण्याची क्षमता यामुळे ही खरी ऑफ-रोड एसयूव्ही ठरते.
Defender 130 ही 8-सीटर कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध असून 2+3+3 सीटिंग लेआउट मिळतो. तिसऱ्या रांगेतही आरामदायी बसण्याची सोय आहे. यात 11.4 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, पॅनोरॅमिक सनरूफ, मेरिडियन साउंड सिस्टम, 3-झोन क्लायमेट कंट्रोल, 360-डिग्री कॅमेरा आणि 6 एअरबॅग्ससारखी आधुनिक फीचर्स देण्यात आली आहेत. या एसयूव्हीला Euro NCAP कडून 5-स्टार सेफ्टी रेटिंगही मिळाली आहे. बूट स्पेस 389 लिटर असून सीट्स फोल्ड केल्यास ती 2,516 लिटरपर्यंत वाढवता येते.
Defender 130 मध्ये तीन इंजिन पर्याय उपलब्ध आहेत.
विशेष म्हणजे, सुनील ग्रोव्हरच्या गॅरेजमध्ये आधीपासूनच Mercedes-Benz CLA 200, Audi Q5 आणि Audi A3 Cabriolet सारख्या लक्झरी गाड्या आहेत. आता Defender 130 त्यांच्या शानदार कलेक्शनमधील आणखी एक दमदार कार ठरली आहे.






