19 फेब्रुवारी हा दिवस विशेषतः महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे महाराष्ट्रातील बँका गुरुवारी,19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बंद राहतील. सर्व राष्ट्रीयीकृत, खाजगी आणि सहकारी बँका बंद राहण्याची शक्यता आहे. ज्यात एसबीआय, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, पीएनबी आणि अॅक्सिस बँक यासह सर्व सार्वजनिक आणि खाजगी बँकांना बँक सुट्टी असेल. तसेच काही इतर राज्यांमध्येही स्थानिक निर्णयानुसार सुट्टी लागू होऊ शकते. बँक सुट्ट्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे निश्चित केल्या जातात, जिथे बँका प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला जारी केलेल्या आरबीआयच्या बँक सुट्टीच्या कॅलेंडरचे पालन करतात.
बँकांची शाखा बंद असली तरी नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, UPI, एटीएम सेवा सुरळीत सुरू राहतील. त्यामुळे तातडीचे व्यवहार डिजिटल पद्धतीने करता येतील. मात्र चेक क्लिअरन्स, डिमांड ड्राफ्ट, कॅश डिपॉझिट किंवा मोठ्या रकमेचे व्यवहार पुढील कामकाजाच्या दिवशीच पूर्ण होतील.
प्रत्येक प्रदेशात बँकांच्या सुट्ट्या वेगवेगळ्या असू शकतात. उदाहरणार्थ, मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बँकांना सुट्टी आहे. पण भारताच्या इतर भागात शाखा खुल्या राहतील. आरबीआय बँकांच्या सुट्ट्या प्रादेशिक आणि राष्ट्रीय सुट्ट्यांमध्ये विभागलेल्या असतात. प्रादेशिक सुट्ट्यांच्या दिवशी, विशिष्ट प्रदेशांमध्ये आणि राज्यांमध्ये बँका बंद असतात. जिथे लोक विशिष्ट सण साजरे करतात. राष्ट्रीय सुट्ट्यांच्या दिवशी, भारतातील सर्व बँका बंद असतात. दरवर्षी सुट्टीचे कॅलेंडर आधीच जाहीर केले जात असले तरी अनेक ग्राहकांना शेवटच्या क्षणी अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे 19 फेब्रुवारीला बँकेत जाण्याचा विचार करत असाल, तर आधी आपल्या शहरातील बँक शाखा उघडी आहे का याची खात्री करूनच घराबाहेर पडा.






