फोटो सौजन्य: iStock
संस्ध्या देशभरात नवरात्रीचा जल्लोष पाहायला मिळत आहे. आता कुठे खऱ्या अर्थाने सणासुदीचा काळ चालू झाला आहे. या काळात अनेक जण नवीन कार घेताना दिसतात. यामुळेच अनेक ऑटो कंपनीज आपल्या नवीन कार्स मार्केटमध्ये लाँच करत असतात. तसेच आपल्या कार्सवर विशेष सूट देखील जारी करत असतात.
आपली स्वतःची कार असणे हे प्रत्येक मध्यम वर्गीय व्यक्तीचे स्वप्न असते. हेच स्वप्न कित्येक जण सणासुदीच्या काळात पूर्ण करताना दिसतात. जर तुम्ही सुद्धा नवीन कार घेण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. याचे कारण होंडा कंपनी आपल्या कार्सवर विशेष सूट देत आहे. चला जाणून घेऊया, कोणत्या कार्सवर तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे.
हे देखील वाचा: आजच जाणून घ्या स्टेअरिंग पकडण्याची योग्य पद्धत, अपघाताची शक्यात होईल खूपच कमी
या सणासुदीच्या काळात, Honda Elevate SUV वर एकूण 75,000 रुपयांपर्यंतची सूट उपलब्ध आहे. कंपनीने दिलेली सवलत वेगवेगळ्या मॉडेल्स आणि व्हेरियंट्सनुसार बदलू शकते. याची एक्स-शोरूम किंमत 11.69 लाख ते 16.43 लाख रुपये आहे.
Honda Amaze वर एकूण 1.12 लाख रुपयांपर्यंतची सूट उपलब्ध आहे. ही सवलत त्याच्या टॉप-स्पेक VX आणि एलिट व्हेरियंटवर देखील मिळू शकते. याशिवाय, Amaze च्या बेस-स्पेक E आणि मिड-स्पेक S व्हेरियंटवर अंदाजे 82,000 आणि 92,000 रुपयांपर्यंतची सूट मिळत आहे. या सब-4 मीटर सेडानची एक्स-शोरूम किंमत 7.20 लाख ते 9.96 लाख रुपये आहे.
हे देखील वाचा: BMW M4 CS भारतात झाली लाँच, फक्त 3.4 सेकंदात पकडते 0-100kmph ची स्पीड
Honda Honda City Hybrid वर एकूण 90,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. या सवलतीमध्ये रोख सवलत, कॉर्पोरेट सूट आणि एक्सचेंज बोनस समाविष्ट आहे. Honda City Hybrid ची एक्स-शोरूम किंमत रु. 19 लाख ते रु. 20.55 लाख आहे.
सर्वाधिक सवलत होंडा सिटीच्या पाचव्या जनरेशनवर उपलब्ध आहे. या सेडानवर 1.14 लाख रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. ही ऑफर निवडलेल्या मॉडेल किंवा व्हेरियंटवर अवलंबून असते. पाचव्या पिढीतील Honda City ची एक्स-शोरूम किंमत रु. 11.82 लाख ते रु. 16.35 लाख आहे.