फोटो सौजन्य: @Parth_Go (X.com)
भारतीय मार्केटमध्ये विविध ऑटो कंपन्या कार्यरत आहेत, ज्या बेस्ट कार्स ऑफर करत असतात. यात विदेशी ऑटो कंपन्यांचा देखील समावेश आहे. Skoda ही त्यातीलच एक कंपनी. नुकतेच भारतीय मार्केटमध्ये कंपनीने Skoda Kodiaq लाँच केली होती. ही कार लाँच होताच कंपनीने मार्केटमध्ये आपली हवा केली आहे. आता या कारची डिलिव्हरी देखील 12 मे 2025 सुरु झाली आहे. या एसयूव्हीमध्ये कोणत्या प्रकारचे फीचर्स देण्यात आले आहेत? यात किती पॉवरफुल इंजिन आहे? या कारची किंमत किती आहे? बाजारात कोणत्या एसयूव्हींना ही कार आव्हान देते? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत.
स्कोडा कंपनीने काही काळापूर्वी लाँच केलेल्या स्कोडा कोडियाकची डिलिव्हरी आजपासून देशभरात सुरू झाली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या जनरेशनची एसयूव्ही आजपासून घरी नेली जाऊ शकते.
6 एअरबॅग्स, वायरलेस चार्जर, आणि सनरूफ असणाऱ्या ‘या’ कारवर मिळते आहे 50,000 रुपयांचे डिस्काउंट
स्कोडा कोडियाक एसयूव्हीमध्ये अनेक उत्तम फीचर्स देण्यात आले आहेत. यात एलईडी लाईट्स, एलईडी डीआरएल, एलईडी टेल लाईट्स, अँबियंट लाईट्स, ब्लॅक इंटीरियर, 32.77 सेमी इन्फोटेनमेंट सिस्टम, 13 स्पीकर कॅन्टन ऑडिओ सिस्टम, पॅनोरॅमिक सनरूफ, मल्टी झोन क्लायमेट कंट्रोल, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स, कीलेस एंट्री, पुश बटण स्टार्ट/स्टॉप, वायरलेस चार्जर, क्रूझ कंट्रोल, मल्टी फंक्शन स्टीअरिंग व्हील, 360 डिग्री कॅमेरा, ड्रायव्हिंग मोड्स, एबीएस, ईबीडी, नऊ एअरबॅग्ज अशी वैशिष्ट्ये आहेत.
स्कोडाची ही नवीन एसयूव्ही दोन लिटर क्षमतेच्या इंजिनने सुसज्ज आहे. जे टर्बोसह आणले गेले आहे. या इंजिनसह, एसयूव्हीला 201 बीएचपीची पॉवर आणि 320 न्यूटन मीटरचा टॉर्क मिळतो. यात 7-स्पीड डीसीटी ट्रान्समिशन देण्यात आले आहे. यासोबतच, त्यात 4X4 देखील देण्यात आले आहे. स्कोडाच्या मते, ही एसयूव्ही एका लिटरमध्ये 14.86 किलोमीटर चालवता येते.
महाराष्ट्र सरकारचा वाहन चालकांना दणका ! ‘हे’ सर्टिफिकेट नसल्यास मिळणार नाही पेट्रोल
नवीन जनरेशनमधील स्कोडा कोडियाकची किंमत 46.89 लाख रुपये आहे. यासोबतच, पाच वर्षांची किंवा 1.25 लाख किलोमीटरची स्टॅंडर्ड वॉरंटी देखील दिली जाते. याव्यतिरिक्त, एसयूव्हीसोबत 10 वर्षांचा रोड साईड असिस्टन्स देखील दिला जात आहे.
स्कोडाची कोडियाक एसयूव्ही डी सेगमेंट एसयूव्ही म्हणून ऑफर केली जात आहे. मार्केटमध्ये, ही कार टोयोटा फॉर्च्युनर, एमजी ग्लोस्टर, फोक्सवॅगन टिगुआन आर लाइनशी थेट स्पर्धा करते. याशिवाय, त्याला अनेक लक्झरी एमपीव्हींकडूनही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो.