फोटो सौजन्य: www.hyundai.com
भारतीय मार्केटमध्ये अनेक उत्तम कार्स उपलब्ध आहेत. पण भारतीय ग्राहकांना फक्त कारचे फीचर्सच नाही तर त्यावरील डिस्काउंट देखील आकर्षित करत असतात. म्हणूनच तर अनेक ऑटो कंपन्या आपल्या कारवर दमदार डिस्काउंट ऑफर करत असतात. ह्युंदाई देखील आता आपल्या एका कारवर दमदार डिस्काउंट ऑफर करत आहे.
ह्युंदाईने देशात ग्राहकांच्या मागणी आणि आवडीनुसार बेस्ट कार ऑफर केल्या आहेत. यातच आता कंपनीने या महिन्यात Hyundai i20 वर जास्तीत जास्त 55 हजार रुपयांचे डिस्काउंट ऑफर जाहीर केली आहे. यामध्ये कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट डिस्कॉउंट्सचा समावेश आहे. i20 ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 7.04 लाख रुपये आहे, जी टॉप स्पेक व्हेरियंटसाठी 11.25 लाख रुपये आहे. चला या कारबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
Royal Enfield ला विसरा ! TVS करणार ‘ही’ खास बाईक लाँच, किलर लूकची सगळीकडेच होतेय चर्चा
Hyundai i20 मध्ये इलेक्ट्रिक सनरूफ, 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 7-स्पीकर बोस साउंड सिस्टम, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, वायरलेस फोन चार्जर आणि एअर प्युरिफायर आणि USB टाइप-सी फास्ट चार्जिंगसह अनेक प्रगत फीचर्स आहेत. लवकरच त्याचे फेसलिफ्ट व्हर्जन मिळण्याची अपेक्षा आहे. परंतु, कंपनीने अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत अंतिम मुदत दिलेली नाही.
सुरक्षेची विशेष काळजी घेत, Hyundai i20 मध्ये स्टॅंडर्ड 6 एअरबॅग्ज, ISOFIX चाइल्ड सीट अँकरेज, ESC, हिल असिस्ट कंट्रोल, डे-नाईट IRVM, व्हेईकल स्टॅब्लिटी मॅनेजमेंट, रिअर पार्किंग कॅमेरा, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि सर्व प्रवाशांसाठी तीन-पॉइंट सीटबेल्ट प्रदान केले आहेत. परंतु, ग्लोबल एनसीएपीमध्ये त्याला फक्त 3-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे.
MG Windsor Pro Vs Tata Curvv EV: फीचर्स, बॅटरी आणि रेंजच्या बाबतीत कोणती कार आहे वरचढ?
ह्युंदाईची ही लोकप्रिय हॅचबॅक 1.2-लिटर पेट्रोल इंजिनसह खरेदी करता येते. हे इंजिन 83 पीएस पॉवर आणि 115 एनएम टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. ग्राहक ते 5-स्पीड मॅन्युअल आणि CVT ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह खरेदी करू शकतात. एका लिटर पेट्रोलमध्ये ही कार सुमारे 20 किमी धावू शकते.
भारतीय मार्केटमध्ये Hyundai i20 ही मारुती सुझुकी बलेनो आणि टाटा अल्ट्रोझ सारख्या सेगमेंटमधील इतर हॅचबॅकशी स्पर्धा करते. जर तुम्हाला येत्या काळात परवडणारी पेट्रोल हॅचबॅक खरेदी करायची असेल, तर हा एक चांगला पर्याय असू शकतो, कारण कंपनी सध्या i20 ची विक्री 50,000 रुपयांच्या डिस्काउंट सह करत आहे.