फोटो सौजन्य: iStock
ऑगस्ट 2025 मध्ये अनेक मोठ्या कंपन्या भारतात त्यांच्या नवीन कार लाँच करणार आहेत. या लाँचमध्ये पेट्रोल, डिझेल तसेच इलेक्ट्रिक सेगमेंटमधील कारचा समावेश आहे. म्हणून जर तुम्हीही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे. या महिन्यात लाँच होणाऱ्या वाहनांची संपूर्ण यादी पाहूया.
स्वीडिश लक्झरी कार ब्रँड व्होल्वो ऑगस्ट 2025 मध्ये त्यांच्या लोकप्रिय SUV XC60 चे फेसलिफ्ट मॉडेल सादर करणार आहे.माहितीनुसार, ही कार येत्या 1 ऑगस्ट रोजी भारतीय बाजारात लाँच केली जाईल. या अपडेटेड मॉडेलमध्ये स्टाईलिंग बदलांसोबतच, काही नवीन टेक्नॉलॉजी फीचर्स देखील जोडले जातील, ज्यामुळे ही कार आणखी प्रीमियम वाटेल.
Mercedes-Benz या ऑगस्ट महिन्यात त्यांची स्पोर्ट्स कार AMG CLE 53 Coupe लाँच करणार असून, ती अधिकृतपणे 12 ऑगस्ट 2025 रोजी सादर केली जाणार आहे. ही कूप स्टाइल कार उत्तम परफॉर्मन्स आणि हाय क्वालिटीच्या फीचर्ससह येईल. या कारचे डिझाइन आणि इंजिन यामुळे ती प्रीमियम स्पोर्ट्स कार सेगमेंटमध्ये एक मजबूत स्पर्धक बनेल.
व्हिएतनामची ऑटो कंपनी VinFast ऑगस्ट 2025 च्या मध्यापर्यंत भारतात त्यांची पहिली कार VF 7 लाँच करण्याची तयारी करत आहे. ही इलेक्ट्रिक SUV पहिल्यांदा जानेवारी 2025 मध्ये ऑटो एक्स्पोमध्ये सादर करण्यात आली होती. त्यात आधुनिक फीचर्स, लांब पल्ल्याची आणि स्मार्ट तंत्रज्ञान असण्याची अपेक्षा आहे. भारताच्या वेगाने वाढणाऱ्या EV मार्केटमध्ये ती एक नवीन आणि मजबूत पर्याय बनू शकते.
Harley-Davidson च्या ‘या’ 2 बाईकवर तब्बल 3 लाख रुपयांची सूट, लूक आणि डिझाइनमध्ये सगळ्यांमध्ये खास
Renault ऑगस्टच्या शेवटी त्यांची कॉम्पॅक्ट SUV Kiger नवीन फेसलिफ्ट स्वरूपात सादर करणार आहे. ही सब-4 मीटर SUV आता पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक डिझाइन, सुधारित इंटीरियर आणि आधुनिक तंत्रज्ञान सुविधांसह येण्याची शक्यता आहे. स्टायलिश पण बजेटमध्ये बसणारी SUV शोधणाऱ्या ग्राहकांसाठी हा अपडेट नक्कीच आकर्षक ठरेल.
महिंद्रा या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्ट 2025 रोजी त्यांच्या व्हिजन सिरीजमधील 4 नवीन एसयूव्ही सादर करणार आहे. यामध्ये महिंद्रा व्हिजन एस, व्हिजन एसएक्सटी, व्हिजन टी आणि व्हिजन एक्स यांचा समावेश आहे. सध्या या वाहनांबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही, परंतु कंपनीने सोशल मीडियावर टीझर जारी केला आहे, ज्यामुळे काहीतरी मोठे येणार याची खात्री पटते. या एसयूव्ही मॉडेल्समध्ये नवीन डिझाइन, पॉवरफुल इंजिन आणि प्रगत फीचर्स असू शकतात.