ऑडी इंडियाद्वारे ग्राहकांसाठी नव्या योजनांची घोषणा, मिळणार 10 वर्षांची एक्स्टेंडेड वॉरेंटेड आणि बरंच काही
जर्मन लक्झरी कार उत्पादक ऑडी इंडियाने ग्राहकांच्या फायद्यासाठी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. कंपनीने उद्योगात आघाडी घेणारा 10 वर्षांपर्यंतचा एक्स्टेंडेड वॉरंटी प्रोग्राम आणि 15 वर्षांचा ऑडी रोडसाइड असिस्टन्स (RSA) प्रोग्राम सादर केला आहे. ही योजना भारतातील सर्व ऑडी उत्पादनांवर लागू असून ग्राहकांच्या दीर्घकालीन विश्वासाला बळकटी देणार आहे.
एक्स्टेंडेड वॉरंटी प्रोग्राम वाहनाच्या उत्पादन तारखेपासून जवळपास 10 वर्षांपर्यंत सर्वसमावेशक संरक्षण प्रदान करतो. ग्राहकांना प्रमाणित वॉरंटीच्या समान अटींनुसार 1 वर्ष किंवा 2 वर्षांच्या विस्ताराचा पर्याय निवडता येतो. या वॉरंटीमध्ये 200000 किलोमीटरपर्यंत मायलेज संरक्षण उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, नवीन कार खरेदी करताना किंवा विद्यमान वॉरंटी समाप्त होण्यापूर्वी ही वॉरंटी घेतली जाऊ शकते. त्यामुळे ग्राहकांना अधिक काळ वाहनाच्या दुरुस्तीसाठी चिंता न करता निश्चिंतपणे अनुभव घेता येतो.
Harley-Davidson च्या ‘या’ 2 बाईकवर तब्बल 3 लाख रुपयांची सूट, लूक आणि डिझाइनमध्ये सगळ्यांमध्ये खास
ऑडी इंडियाचे प्रमुख, बलबीर सिंग धिल्लों म्हणाले, “ग्राहकांसोबतचे आमचे नाते केवळ खरेदीपुरते मर्यादित नसते. ही नवीन वॉरंटी आणि रोडसाइड असिस्टन्स योजना ग्राहक समाधानी ठेवण्याच्या आमच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. या योजनांमुळे आम्ही भारतात लक्झरी ऑटो क्षेत्रासाठी नवे उद्योगमानक निर्माण करत आहोत.”
याशिवाय, ऑडीचा रोडसाइड असिस्टन्स (RSA) प्रोग्राम आता 15 वर्षांपर्यंतचा पर्याय देतो. यात 24/7 आपत्कालीन सेवा उपलब्ध असून, वाहन ब्रेकडाऊन, अपघात किंवा अचानक थांबल्यास वाहनाला नजीकच्या अधिकृत वर्कशॉपमध्ये पोहोचवण्याची सुविधा आहे. यामध्ये किरकोळ यांत्रिक व विद्युत दोषांसाठी त्वरित तांत्रिक सहाय्यही दिले जाते. हा प्रोग्राम भारतातील राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि प्रमुख शहरी भागांमध्ये लागू आहे.
कशाला पेट्रोलच्या नादी लागावं ! आता फक्त 13 हजार रुपयांच्या EMI वर मिळेल देशातील सर्वात स्वस्त EV
RSA प्रोग्राम विविध वैधता कालावधीसाठी आणि वाहनाच्या वयानुसार 3,999 ते 8,000 दरम्यान उपलब्ध आहे. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार फ्लेक्सिबिलिटी मिळते.
ऑडीच्या या नव्या योजनांमुळे ग्राहकांना दीर्घकालीन मन:शांती मिळेल आणि त्यांचा ऑडी अनुभव अधिक विश्वासार्ह आणि आनंददायी बनेल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.