फोटो सौजन्य: iStock
भारतीय मार्केटमध्ये प्रीमियम बाईक्सची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. आजही रस्त्यांवरून एखादी प्रीमियम बाईक फिरताना दिसली की अनेकांच्या नजरा त्यावर रोखल्या जातात. देशात अनेक अशा दुचाकी उत्पादक कंपन्या आहेत, ज्या बेस्ट प्रीमियम बाईक ऑफर करत असतात. Harley-Davidson ही त्यातीलच एक कंपनी आहे, ज्यांच्या दमदार बाईक्स तरुणांना भुरळ पाडत आहे. आता कंपनी आपल्या दोन बाईकवर दमदार डिस्काउंट देत आहे.
ऑगस्ट 2025 मध्ये हार्ले-डेव्हिडसन त्यांच्या दोन्ही बाईक्सवर मोठी सूट देत आहे. या दोन्ही क्रूझर बाईक आहेत आणि त्यात अनेक उत्तम फीचर्स आहेत. इतकेच नाही तर त्यांचे इंजिन खूप पॉवरफुल आहे. Harley-Davidson Fat Boy आणि Fat Bob असे या बाईकचे नाव आहेत. हार्ले डेव्हिडसनच्या या दोन्ही बाईकवर किती सूट दिली जात आहे आणि दोन्हीमध्ये कोणते खास फीचर्स आहेत त्याबद्दल जाणून घेऊयात.
कशाला पेट्रोलच्या नादी लागावं ! आता फक्त 13 हजार रुपयांच्या EMI वर मिळेल देशातील सर्वात स्वस्त EV
हार्ले डेव्हिडसनच्या फॅट बॉय आणि फॅट बॉबवर ऑगस्ट 2025 मध्ये सुमारे 2 लाख रुपयांची सूट दिली जात आहे. काही शोरूममध्ये या दोन्ही बाईक्सवर अतिरिक्त ऑफर्ससह, ही सूट 3 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकते. ही सूट दोन्हीच्या 2024 मॉडेल्सवर उपलब्ध आहे. या दोन्ही बाईक शक्तिशाली इंजिनसह प्रीमियम फीचर्ससह सुसज्ज आहेत.
2024 Harley-Davidson Fat Bob भारतात 21.49 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे. 2025 साठी फॅट बॉब बंद करण्यात आला आहे. त्याची जागा Street Bob ने त्याची जागा घेतली आहे. यात 1,868 सीसी मिलवॉकी-एट 117सीआय इंजिन वापरले आहे. हे इंजिन 93 एचपी पॉवर आणि 155 एनएम टॉर्क जनरेट करते.
2024 Harley Davidson Fat Boy ही बाईक भारतीय बाजारात 25.69 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे, जी 2025 च्या मॉडेलपेक्षा फक्त 21,000 रुपयांनी स्वस्त आहे. यात 2 सिलेंडर, 1,868 सीसी, मिलवॉकी-एट 114 इंजिन वापरले आहे, जे 94 एचपी पॉवर आणि 155 एनएम टॉर्क जनरेट करते.
यात पूर्णपणे एलईडी हेडलाइट आहे, ज्यामध्ये लो बीम, हाय बीम आणि स्पेशल सिग्नेचर पोझिशन लाइटिंगचा समावेश आहे. यात इंटिग्रेटेड आणि मल्टी-फंक्शनल एलईडी स्टॉप/टेल/टर्न सिग्नल आणि इनकॅन्डेसेंट बुलेट टर्न सिग्नल देखील आहेत. बाईकमध्ये 5-इंचाचा ॲनालॉग स्पीडोमीटर आहे, जो डिजिटल डिस्प्लेवर गियर, ओडोमीटर, इंधन पातळी, ट्रिप, रेंज आणि टॅकोमीटरचि माहिती दर्शवितो.