Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Electric Scooter Fire : इलेक्ट्रिक स्कूटर वापरताय? बॅटरी स्फोटामागील ‘ही’ 7 प्रमुख कारणं जाणून घ्या…

Electric Scooter Fire : इलेक्ट्रिक स्कूटर सुरक्षित असली तरी तिची योग्य देखभाल करणे तितकेच महत्त्वाचे आहे. नियमित सर्व्हिसिंग, योग्य चार्जिंगची पद्धत आणि कंपनीच्या सूचनांचे पालन केल्यास बॅटरी अधिक काळ चांगली टिकते.

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 18, 2026 | 01:31 PM
Electric Scooter Fire (फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Electric Scooter Fire (फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:

सध्या इलेक्ट्रिक स्कूटरचा वापर वाढला

सर्वात सामान्य कारण म्हणजे निकृष्ट दर्जाच्या बॅटरीचा वापर.

बॅटरीमध्ये शॉर्ट सर्किट किंवा जास्त तापमानाची समस्या निर्माण होऊ शकते.

 

गेल्या काही वर्षांत भारतात इलेक्ट्रिक स्कूटरचा वापर झपाट्याने वाढला आहे. पेट्रोलच्या वाढत्या किमती आणि कमी खर्चात होणारा प्रवास यामुळे अनेकांनी ई-स्कूटरला पसंती दिली आहे. मात्र, अधूनमधून समोर येणाऱ्या बॅटरीला आग लागण्याच्या घटनांमुळे अनेकांच्या मनात भीतीही निर्माण झाली आहे. स्कूटर चालू असताना किंवा चार्जिंगदरम्यान असे प्रकार का घडतात, हा प्रश्न अनेकांना पडतो. यामागे काही तांत्रिक कारणे आहेत आणि थोडी काळजी घेतली तर अशा घटना मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकतात.

गाडीच्या बॅटरीचा स्फोट होण्याची शक्यता

इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये लिथियम-आयन बॅटरीचा वापर केला जातो. ही बॅटरी अनेक छोट्या सेल्सपासून तयार केलेली असते. एखादा सेल अचानक जास्त तापू लागला आणि त्यातील उष्णता नियंत्रणाबाहेर गेली, तर संपूर्ण बॅटरीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. तापमान वाढत गेल्यानंतर इतर सेल्सही गरम होतात आणि काही वेळातच धूर, आग किंवा गंभीर परिस्थितीत स्फोट होण्याची शक्यता निर्माण होते. तांत्रिक भाषेत या प्रक्रियेला ‘थर्मल रनअवे’ असे म्हटले जाते.

Volvo: व्हॉल्वोच्या ५ सर्वात आलिशान आणि सुरक्षित कार्स, ज्या देतात ड्रायव्हिंगचा प्रीमियम अनुभव!

चुकीच्या पद्धतीने चार्जिंग केल्यास तिच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो….

बॅटरी गरम (Electric Scooter Fire)  होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. त्यातील सर्वात सामान्य कारण म्हणजे निकृष्ट दर्जाच्या बॅटरीचा वापर. काहीजण खर्च वाचवण्यासाठी स्वस्त किंवा अनधिकृत पार्ट्स बसवतात. अशावेळी सुरक्षिततेची पातळी कमी होते आणि बॅटरीमध्ये बिघाड होण्याचा धोका वाढतो. चार्जिंगची चुकीची सवयही धोकादायक ठरू शकते. अनेकजण रात्री स्कूटर चार्जिंगला लावतात आणि सकाळपर्यंत तशीच ठेवतात. आधुनिक बॅटरीमध्ये सुरक्षा यंत्रणा असली तरी सतत चुकीच्या पद्धतीने चार्जिंग केल्यास तिच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. त्याचप्रमाणे कंपनीने दिलेल्या चार्जरऐवजी दुसरा चार्जर वापरल्यासही बॅटरीवर अतिरिक्त ताण येऊ शकतो. उन्हाळ्यात हा धोका आणखी वाढतो. कडक उन्हात स्कूटर बराच वेळ उभी राहिली किंवा गरम वातावरणात चार्जिंग सुरू केले, तर बॅटरीचे तापमान वेगाने वाढते. अशावेळी सुरक्षिततेची सर्वयंत्रणा योग्य प्रकारे काम करत नसल्यास गंभीर अपघात होऊ शकतो.

बॅटरीमध्ये शॉर्ट सर्किट किंवा जास्त तापमानाची समस्या निर्माण होतात…

स्कूटरमधील बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजेच बीएमएस हा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. ही प्रणाली बॅटरीचे तापमान, व्होल्टेज आणि चार्जिंगवर सतत लक्ष ठेवते. काही अडचण जाणवल्यास ती बॅटरीचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करते. मात्र, ही यंत्रणा खराब झाली किंवा योग्यरीत्या काम केली नाही, तर बॅटरीमध्ये शॉर्ट सर्किट किंवा जास्त तापमानाची समस्या निर्माण होऊ शकते. अपघातानंतरही बॅटरीची तपासणी करणे आवश्यक असते. बाहेरून स्कूटर व्यवस्थित दिसत असली तरी आतल्या सेल्सना इजा झालेली असू शकते. अशा नुकसानाकडे दुर्लक्ष केल्यास काही दिवसांनी किंवा आठवड्यांनीही आग लागण्याची शक्यता असते.

कारचा ‘ऑटोपायलट मोड’ कसा काम करतो? गाडीच्या ‘सेल्फ ड्रायव्हींग’ सिस्टीम मधील या काही गोष्टी तुम्हाला माहित असायला हव्यात!

तज्ज्ञांच्या मते, काही साध्या सवयी अंगीकारल्या तर मोठा धोका टाळता येतो. नेहमी कंपनीचा मूळ चार्जर वापरावा. लांब अंतराचा प्रवास करून आल्यानंतर लगेच चार्जिंग सुरू करू नये. बॅटरी थोडी थंड झाल्यावरच ती चार्ज करावी. शक्यतो सावलीत किंवा हवेशीर ठिकाणी चार्जिंग करणे अधिक सुरक्षित ठरते.

स्वतः दुरुस्ती करण्याचा प्रयत्न न करावा…

चार्जिंगदरम्यान बॅटरीतून वेगळा वास येत असेल, धूर दिसत असेल किंवा बॅटरी फुगल्यासारखी वाटत असेल, तर स्कूटर त्वरित वापरणे बंद करावे. अशा वेळी स्वतः दुरुस्ती करण्याचा प्रयत्न न करता अधिकृत सर्व्हिस सेंटरमध्ये तपासणी करून घेणे योग्य ठरते.

इलेक्ट्रिक स्कूटर सुरक्षित असली तरी तिची योग्य देखभाल करणे तितकेच महत्त्वाचे आहे. नियमित सर्व्हिसिंग, योग्य चार्जिंगची पद्धत आणि कंपनीच्या सूचनांचे पालन केल्यास बॅटरी अधिक काळ चांगली टिकते. त्याचबरोबर आग किंवा स्फोटासारख्या धोकादायक घटनांची शक्यताही मोठ्या प्रमाणात कमी होते. थोडी जागरूकता आणि योग्य काळजी घेतल्यास इलेक्ट्रिक स्कूटरचा प्रवास अधिक सुरक्षित आणि निर्धास्त होऊ शकतो.

Web Title: Using an electric scooter here are 7 key reasons behind battery explosions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 01:31 PM

Topics:  

  • electric scooter
  • Major Explosion

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.