फोटो सौजन्य: Freepik
इलेक्ट्रिक कार्सचे वारे सगळीकडे पसरले असताना आजही भारतीय मार्केटमध्ये आपल्याला जास्त करून पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या कार्स विक्रीसाठी दिसतील. सध्या पेट्रोल आणि डिझेलचे भाव कडाडले असताना, या दोघांच्या किंमतीत थोडा फार फरक आहे. सध्या पेट्रोलची किमंत जास्त आहे तर डिझेलची किमंत स्वस्त आहे.
अनेक जण आपल्या बजेटनुसार, पेट्रोल किंवा डिझेल कार्स घेत असतात. पण जर चुकून तुमच्या पेट्रोल कारमध्ये डिझेल गेले तर काय होईल? असा प्रश्न काही कार मालकांच्या मनात नक्कीच येत असेल. चला या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया.
कारमध्ये चुकीचे इंधन जाणे ही एक गंभीर समस्या आहे आणि त्यामुळे तुमच्या कारचे बरेच नुकसान होऊ शकते. पेट्रोल आणि डिझेल हे वेगवेगळ्या प्रकारचे इंधन आहेत, ज्यांची इंजिनेही वेगळी असतात. पेट्रोल इंजिन असणारी कार डिझेल पचवू शकत नाही. यामुळे फ्युएल फिल्टर खराब होऊ शकतो. डिझेलऐवजी पेट्रोल वापरले किंवा पेट्रोलऐवजी डिझेल वापरले तर गाडी स्टार्ट होण्यास प्रॉब्लम होऊ शकतो.
ताबडतोब कार थांबवा: सर्व प्रथम, कार थांबवा आणि ती सुरू करण्याचा प्रयत्न करू नका.
कंपनीच्या सर्विस सेंटरशी संपर्क साधा: जर तुमच्या कारमध्ये चुकीचे इंधन वापरले जात असेल, तर कार उत्पादक कंपनीच्या ग्राहक सेवेशी संपर्क साधा आणि त्यांना संपूर्ण परिस्थिती सांगा.
टोइंग करा: यानंतर, तुमची कार टो करून घ्या आणि तिला जवळच्या सर्विस सेंटरमध्ये घेऊन जा.
इंधन टाकी रिकामी करा: मेकॅनिककडून कारची फ्युएल टाकी पूर्णपणे रिकामी करा. इंधन काढून टाकल्यानंतर, मेकॅनिक फ्युएल लाइन देखील साफ करेल.