फोटो सौजन्य: Social Media
दिवाळीचा सण म्हणजे आनंदाचा व चैत्यनाचा सण. या शुभ काळात आपण आपल्या नातेवाईकांना, मित्र मैत्रिणींना भेटत असतो. त्यांच्यासाठी मिठाई व अन्य भेटवस्तू घेऊन जात असतो. कित्येक जण या शुभ काळात आपली हक्काची कार किंवा बाईक घेऊन नवी सुरुवात करत असतात.
सध्या भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनं मोठ्या प्रमाणात लाँच होताना दिसत आहे. येणारा काळ हा इलेक्ट्रिक वाहनांचा असल्यामुळे अनेक ऑटो कंपनीज या वाहनांच्या उत्पादनावर विशेष लक्ष केंद्रित करत आहे. ग्राहक सुद्धा या वाहनांना चांगला प्रतिसाद देत आहे.
हे देखील वाचा: 18 कॅरेट सोन्याने बनली आहे ‘ही’ लक्झरी कार, जेम्स बाँड चित्रपटाशी आहे खास संबंध
सध्या मार्केटमध्ये अनेक इलेक्ट्रिक स्कूटर आहे. पण त्यातील लोकप्रिय स्कूटर म्हणजे टीव्हीएसचा आयक्यूब इलेक्ट्रिक स्कूटर. या स्कूटरचे मार्केटमध्ये अनेक व्हेरियंट उपलब्ध आहे. जर तुम्ही सुद्धा ही स्कूटर विकत घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. या स्कूटरसाठी दहा हजार रुपये डाऊन पेमेंट केल्यावर तुम्हाला महिन्याला किती हप्ता भरावा लागेल याबद्दल जाणून घेऊया.
TVS ने ऑफर केलेल्या iQube या इलेक्ट्रिक स्कूटरचा बेस व्हेरियंट म्हणून 2.2 kWh उपलब्ध करून दिला आहे, ज्याची एक्स-शोरूम किंमत 117299 रुपये आहे. मात्र ईव्हीवर सबसिडी सरकारकडून दिली जात असल्यामुळे राजधानी दिल्लीत त्याची प्रभावी किंमत 107299 रुपये होईल. यावर आरटीओ म्हणून 9384 रुपये, आरटीओ चार्ज म्हणून 300 रुपये, स्मार्ट कार्डसाठी 200 रुपये, विम्यासाठी 5626 रुपये आणि हँडलिंग चार्ज म्हणून 500 रुपये आकारले जातात. त्यानंतर त्याची ऑन रोड किंमत 123309 रुपये होईल. ही किंमत तुमच्या जवळील शोरुमनुसार बदलू शकते.
हे देखील वाचा: बाईकचा ब्रेक अचानक फेल झाल्यास तिला थांबवावे कसे? सुरक्षित प्रवासासाठी जाणून घ्या
दिवाळीच्या निमित्ताने TVS iQube चे बेस व्हेरियंट 2.2 kWh विकत घेतल्यास, बँकेकडून फक्त एक्स-शोरूम किंमतीवर फायनान्स केला जाईल. अशा परिस्थितीत, 10 हजार रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला सुमारे 113309 रुपयांची रक्कम बँकेकडून फायनान्स करावी लागेल. जर बँक तुम्हाला 11 टक्के व्याजासह तीन वर्षांसाठी 113309 रुपये देत असेल, तर तुम्हाला पुढील तीन वर्षांसाठी दरमहा केवळ 3710 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल.
तुम्ही 11 टक्के व्याजदरासह तीन वर्षांसाठी बँकेकडून 113309 रुपयांचे टू व्हीलर लोन घेतले तर तुम्हाला तीन वर्षांसाठी दरमहा 3710 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. अशा स्थितीत, तीन वर्षांत तुम्ही TVS iQube च्या 2.2 kWh व्हेरियंटसाठी सुमारे 20 हजार रुपये व्याज द्याल. त्यानंतर तुमच्या इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स-शोरूम, ऑन-रोड आणि व्याजासह एकूण किंमत सुमारे 1.43 लाख रुपये असेल.