Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हा फिरता सिमेंटचा मिक्सर तुम्ही पाहिलाय का? हा आहे हायड्रॉलिक इंजिनिअरिंग आणि ऑटोमोबाईल तंत्रज्ञानाचा अविष्कार!

ट्रान्झिट मिक्सर हे ऑटोमोबाईल क्षेत्रातील हायड्रॉलिक आणि 'PTO' तंत्रज्ञानाचा वापर करून प्रवासादरम्यान सिमेंटला सतत फिरवत ठेवणारे एक आधुनिक वाहन आहे. ड्रममधील 'स्पायरल ब्लेड्स'च्या मदतीने सिमेंट घट्ट न होऊ देता ते बांधकामाच्या ठिकाणी ताजे पोहोचवणे आणि सुरक्षितपणे बाहेर काढणे हे या यंत्रणेचे मुख्य वैशिष्ट्य आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jun 24, 2026 | 06:09 PM
हा फिरता सिमेंटचा मिक्सर तुम्ही पाहिलाय का? हा आहे हायड्रॉलिक इंजिनिअरिंग आणि ऑटोमोबाईल तंत्रज्ञानाचा अविष्कार!
Follow Us
Follow Us:

ऑटोमोबाईल क्षेत्रात जगातील प्रत्येक उद्योगात कामी येतील अशी वाहने आणि उपकरणे बनवण्यात आली आहेत. त्यापैकीच एक म्हणजे हा सिमेंटचा मिक्सर. रस्त्यावरून जाताना आपण अनेकदा एक मोठा फिरता ड्रम असलेला ट्रक पाहतो, ज्याला ‘ट्रान्झिट मिक्सर’ असं म्हणतात. बांधकाम क्षेत्रात तयार असलेले सिमेंट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेणारे हे वाहन म्हणजे ऑटोमोबाईल आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा एक उत्कृष्ट नमुना आहे असं म्हणायला हरकत नाही.

प्रवासात सिमेंट घट्ट का होत नाही?

सिमेंट, वाळू, खडी आणि पाणी एकत्र आल्यावर रासायनिक प्रक्रियेमुळे ते तासाभरात घट्ट होऊ लागते. पण हा ट्रक सिमेंट कारखान्यापासून बांधकामाच्या जागेपर्यंत तासनतास प्रवास करतो, तरीही त्यातील मिश्रण ताजे राहते. याचे मुख्य कारण म्हणजे या ट्रकचा सतत फिरणारा ड्रम. हा ड्रम सिमेंटला स्थिर राहू देत नाही, ज्यामुळे सिमेंट सेट होण्याची प्रक्रियेला उशीर लागतो.

बोअरवेल मशीन कशी काम करते? ऑटोमोबाईल आणि तंत्रज्ञानाचा हा अविष्कार कसा शोधतो खडकातील पाण्याचा मार्ग?

ऑटोमोबाईल आणि तांत्रिक कार्यपद्धती

हा ट्रक फक्त सिमेंट मिक्स करण्याचे साधन नाही, तर चालता फिरता कारखानाच आहे म्हणायला हवा,

  • पॉवर टेक-ऑफ सिस्टीम: काही ट्रकमध्ये ड्रम फिरवण्यासाठी वेगळे इंजिन असते, तर आधुनिक ट्रकमध्ये मुख्य ट्रकच्या इंजिनचीच शक्ती ‘PTO’ तंत्रज्ञानाद्वारे वापरली जाते. ट्रक चालत असतानाही इंजिनची ऊर्जा ड्रम फिरवण्यासाठी वळवली जाते.
  • हायड्रॉलिक मोटर आणि पंप: इंजिनकडून मिळालेल्या ऊर्जेचा वापर करून हायड्रॉलिक पंप अफाट प्रेशर तयार करतो. हे प्रेशर ड्रमला जोडलेल्या हायड्रॉलिक मोटरला फिरवते, ज्यामुळे जड सिमेंटने भरलेला ड्रम सहज गतीने फिरू शकतो.
  • आतील ‘स्पायरल ब्लेड्स‘: हा या मशीनचा खरा मेंदू आहे. ड्रमच्या आत स्क्रूप्रमाणे फिरणारे ब्लेड्स असतात. जेव्हा ड्रम सरळ फिरतो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, तेव्हा हे ब्लेड्स सिमेंटला आत ढकलतात आणि सतत मिक्स करत राहतात.
  • उलटी दिशा आणि डिस्चार्ज: जेव्हा सिमेंट बांधकामाच्या जागी रिकामे करायचे असते, तेव्हा ड्रमची फिरण्याची दिशा उलटी केली जाते. यामुळे आतले ब्लेड्स सिमेंटला बाहेरच्या बाजूला ढकलतात आणि सिमेंट सहजपणे बाहेर पडते.
घराचा पाया ठरवताना मातीची चाचणी का महत्त्वाची? वेगवेगळ्या मातीनुसार फाउंडेशनची खोली आणि खोदकामाचे नियम; आत्ताच समजून घ्या

येणाऱ्या अडचणी

हा ट्रक चालवणे सोपे नसते. फिरत्या ड्रममुळे गाडीचा ‘सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी’ सतत बदलत असतो. त्यामुळे वळणावर किंवा घाटात ट्रक पलटी होण्याची भीती असते. तसेच, वाहतूक कोंडीत जास्त वेळ अडकल्यास सिमेंट आतच घट्ट होऊन ड्रम खराब होण्याचा धोका असतो.

थोडक्यात सांगायचे तर, ऑटोमोबाईल क्षेत्रातील हायड्रॉलिक शक्ती आणि मेकॅनिकल डिझाईनचा अचूक मेळ घालून ट्रान्झिट मिक्सरच्या रूपाने बांधकामाला गती देणारे एक अप्रतिम वाहन तयार करण्यात आले आहे.

Web Title: Working of transit mixer cement mixer auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 06:05 PM

Topics:  

  • automobile

संबंधित बातम्या

700 किमीपेक्षा जास्त रेंजसह येतायत व्होल्वोच्या २ नव्या ई-कार; १२ ऑक्टोबरला लाँच होणार व्होल्वो EX90 आणि ES90!
1

700 किमीपेक्षा जास्त रेंजसह येतायत व्होल्वोच्या २ नव्या ई-कार; १२ ऑक्टोबरला लाँच होणार व्होल्वो EX90 आणि ES90!

महिंद्राच्या SUV गाड्यांवर ऑगस्ट २०२६ मध्ये मोठी सूट; Scorpio N आणि Thar Roxx वर तब्बल ₹१.२५ लाखांपर्यंतची बचत!
2

महिंद्राच्या SUV गाड्यांवर ऑगस्ट २०२६ मध्ये मोठी सूट; Scorpio N आणि Thar Roxx वर तब्बल ₹१.२५ लाखांपर्यंतची बचत!

नेक्सॉन, ब्रेझाला टक्कर द्यायला येतेय फोक्सवॅगनची नवीन सब- कंपॅक्ट ४ मीटर SUV; कंपनीकडून अधिकृत घोषणा! 2027 मध्ये होणार लाँच!
3

नेक्सॉन, ब्रेझाला टक्कर द्यायला येतेय फोक्सवॅगनची नवीन सब- कंपॅक्ट ४ मीटर SUV; कंपनीकडून अधिकृत घोषणा! 2027 मध्ये होणार लाँच!

गाडी असावी तर सेडानसारखीच! स्कोडा इंडिया ब्रँड डायरेक्टर आशिष गुप्ता यांची भूमिका
4

गाडी असावी तर सेडानसारखीच! स्कोडा इंडिया ब्रँड डायरेक्टर आशिष गुप्ता यांची भूमिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.