• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Blogs »
  • Ancient And Modern History Of World Tourism

जागतिक पर्यटनाचा प्राचीन आणि आधुनिक इतिहास

२७ सप्टेंबर..! जागतिक पर्यटन दिवस १९८० पासून याच दिवशी साजरा करण्यात येतो. कारण संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संस्थेची स्थापना १९७० मध्ये याच दिवशी झालेली होती. याच दिवशी संघटनेच्या कायद्याचा स्वीकार करण्यात आला. त्यामुळे पर्यटनाकरिता या दिवसाचे विशेष महत्व आहे. यावर्षीच्या म्हणजे २०२३ च्या पर्यटनाचे घोषवाक्य आहे 'पर्यटन आणि हरित निवेश'. सतत विकासाचे  लक्ष्य साध्य करण्याकरिता अधिकाधिक निवेश करणे हा या घोष वाक्याचा उद्देश आहे.    

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Oct 01, 2023 | 06:00 AM
जागतिक पर्यटनाचा प्राचीन आणि आधुनिक इतिहास
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये पर्यटनाच्या बाबतीत जागरुकता वाढविणे, जगभरात सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक मूल्यांवर होणार्‍या परिणामांचा अभ्यास करणे हा जागतिक पर्यटन दिनाचा मुख्य उद्देश आहे. अनेक देश या निमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम, निवास, सुविधा याचे नियोजन आणि असंख्य कार्यक्रम आयोजित करतात. दळणवळणाच्या सुविधा वाढल्याने मुक्त संचार करणे आता अत्यंत सोपे झालेले आहे. त्यामुळे देश- विदेशातल्या वार्‍या आता वाढु लागल्याने दरवर्षी पर्यटनात २० ते २५ टक्के वाढ होत आहे. जगभरच्या उलाढालीमध्ये पर्यटनाचा तिसरा क्रमांक लागतो. यामुळे रिसॉर्ट्स, हॉटेल्स आणि विमान कंपन्यांचा प्रचंड फायदा होत आहे. अनेक विद्यापीठात पर्यटनाचे व्यवस्थापन आणि नियोजन, ट्रॅवल अँड टुरिझम याचे पदविका, पदवी आणि पदव्युत्तर हे अभ्यासक्रम  सुरू झालेले असून तो आता महाविद्यालयीन शिक्षणाचा एक भाग झालेला आहे. टुर ऑपरेटर, गाईड, ट्रॅवल एजन्सी, निवास, आतिथ्य, आरक्षण, विपणन, विक्री, गुंतवणुक, वाहतूक, अन्न, समारंभ, साहसी पर्यटन हे आज सेवा देणारे क्षेत्र झालेले आहे. यामुळे देश- विदेशात खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रात रोजगाराच्या संधी मोठ्याप्रमाणात उपलब्ध झालेल्या आहेत हे सत्य नाकारता येत नाही.
पर्यटन हे आज प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचे आधुनिक अंग झालेले असल्याने आणि संस्कृतीचा भाग आहे. जंगल, समुद्र, आकाश कुठेही पर्यटन करता येते. हजारो ट्रॅव्हल्स कंपन्या, त्यांचे प्रचंड मार्केटिंग, आधुनिक सोयी सुविधांच्या वर्तमान पत्रातल्या पानपान भरच्या जाहिराती, लाखो रुपयांचे पॅकेजेस आणि तणावरहित प्रवासामुळे आज प्रवासात एक प्रकारची निश्चिंतता आलेली आहे. पैसे भरले, बॅग भरली आणि भरपूर वेळ काढला तर कुठलाही प्रवास हा सुखकर होतो. कारण पॅकेजच्या प्रवासात जेवण्या- खाण्याची आणि राहण्याची अजिबात चिंता नसते. त्यामुळे पर्यटनातल्या प्रवासाचा भरपूर आनंद घेता येतो आणि शरीर आणि मनाला एक नवीन ऊर्जा प्राप्त होते. अनेक पर्यटक नुसते भटकण्याकरिता आणि मनाला वाटणार्‍या उभारीचा आनंद घेण्याकरिता जातात. मात्र यातले मोजकेच पर्यटक सखोल निरीक्षण करणारे असून चिकित्सक अभ्यास करणारे असतात.
आज पर्यटनाचे विश्व प्रचंड प्रमाणात वाढलेले असले तरी याचा प्राचीन इतिहासात पर्यटन हे कितीतरी कष्टदायक होते हे दिसून येते. पर्यटनाचा आजपर्यंतचा इतिहास खरोखरच मनोरंजक आहे. त्या असुविधेच्या काळात पर्यटन ही आवड नसून गरज होती असे दिसून येते. तेराव्या शतकात म्हणजे १२८८ ते १२९२ या दरम्यान इटलीच्या व्हेनिसचा यात्री आणि इटलीचा व्यापारी, संशोधक मार्को पोलोचे भारतात दोन वेळा आगमन झाले आणि त्याने दक्षिणेतल्या पांड्य साम्राज्याला भेट दिली. हा इतिहासातला सर्वात प्रसिद्ध पर्यटक आहे. पर्यटनाच्या संकल्पनेला चालना देण्याचे श्रेय रोमन साम्राज्याला दिले जाते. कारण जीवनात आनंद अनुभवण्या करिता समुद्र सफरीच्या पर्यटनाची ‘ग्रँड टुर’ ही कल्पना त्यांनी मांडली. त्यानंतर मोठ्या जहाजाचा कमांडर/ नावाडी असलेल्या ‘वास्को द गामा’ हा पहिला पोर्तुगीज खलाशी १७० व्यापार्‍यांना आणि यात्रेकरूंना घेऊन भारताचा शोध घेण्याकरिता चार जहाजातून ८ जुलै १४९७ लिस्बेनवरुन निघाला आणि  २० मे १४९८ ला म्हणजे जवळपास एक वर्षांनंतर केरळच्या कोझिकोड जिल्ह्यातल्या कालिकतच्या समुद्र तटावर दाखल झाला. समुद्रातून व्यापारी मार्ग शोधणारा हा पहिला युरोपियन होता. मसाल्याच्या व्यापारावर एकाधिकार स्थापित करण्याकरिता  एकूण तीन वेळा वास्को द गामा हा भारतात आला आणि भारतातल्याच कोच्ची येथे २४ मे १५२४ ला त्याचा मृत्यू झाला. कोच्ची आणि लिस्बेन येथे वास्को- द गामची स्मारके आजही आहेत. या साहसी पर्यटनामुळे युरोपियन बाजार आणि पश्चिमी देशाकरिता भारताचे दरवाजे खुले झाले. त्यानंतर युरोपिय लोक भारताचे मुरीद झाले. प्राचीन भारतीय कला संस्कृती, खानपान, येथले नैसर्गिक सौंदर्य यांची चांगलीच भुरळ पडली.
सतरावे शतक संपता संपता युरोपमध्ये वार्षिक सुट्टी देण्याची परंपरा सुरू झाली. या सुट्ट्यांच्यादरम्यान प्रवासाकरिता मोठ्या प्रमाणावर लोक घरबाहेर पडु लागले आणि येथुनच पर्यटनाच्या व्यवसायाला सुरवात झाली आणि हे शतक ‘प्रवासाचे शतक’ मानले गेले. जवळपास एकोणविसावे शतक पूर्ण बघितलेल्या इंग्लंडचा संशोधक  थॉमस कुक याने ‘थॉमस कुक अँड सन’ ही पहिली प्रवासी कंपनी स्थापन केली आणि ‘पॅकेज टुर’चा जगात उदय झाला. २२ नोव्हेंबर १८०८ ला इंग्लंड येथील डर्बशायर येथे जन्म झालेल्या थॉमस कुकने व्यावसायिक पर्यटनात अभुतपूर्व क्रांती करून १८ जुलै १८९२ ला म्हणजे वयाच्या ८३ व्यावर्षी जगाचा निरोप घेतला. १८४१ ला एकोणीसाव्या शतकाच्या सुरवातीला थॉमस कुक याने ‘लिसेस्टर ते लॉगबॅरो’ हा पहिली जागतिक लक्ष वेधून घेणारा पहिला व्यावसायिक प्रवास केला. या प्रवासात एकूण ५७० पर्यटक होते आणि खुल्या रेल्वे गाडीतून प्रत्येकाकडून एक शिलिंग हे जाण्यायेण्याचे प्रवासी भाडे घेतले गेले. या प्रवासाच्या मार्गात  लागलेल्या शिखराच्या बोगद्यातून गाडीच प्रवेश होण्यापुर्वी पर्यटकांच्या मनोरंजाकरिता संगीत आणि गाण्याची मेजवानीसुद्धा आयोजित करण्यात आलेली होती. थोडक्यात थॉमस कुकला त्या काळात व्यावसायिक पर्यटनाकरिता जे काही करता येणे शक्य होते ते सर्व केले आणि येथुनच पर्यटनाच्या व्यावसायिकतेला जगात प्रारंभ झाला. यानंतर थॉमसने नवी संकल्पनेसह अनेक प्रवासी पर्यटन आयोजित केले.  यात प्रवास, निवास आणि आवडीचे ठिकाण याचा समावेश होता. व्यवसायासोबतच थॉमस कुकने पर्यटकांना मनोरंजन आणि विरंगुळासुद्धा दिला. नवीन संस्कृती, नवीन लोक, नवीन ज्ञान आणि साहस कण्याची संधी सर्वप्रथम लोकांना मिळाली. आजही भारतासह जगामध्ये ‘थॉमस कुक’ ही प्रसिद्ध ट्रॅवल कंपनी आहे. आकर्षण, सुलभता, निवास, सुविधा आणि उपक्रम यांचा समावेश असलेल्या ‘थॉमस कुक’ यांना आधुनिक पर्यटनाचे जनक म्हटले जाते.
भारताबाबत विचार करायचा झाल्यास प्रवास आणि पर्यटना करिता आजही भारताची फार मोठी बाजारपेठ उपलब्ध  आहे. दरवर्षी करोडो पर्यटक भारताच्या विविध ठिकाणी भेटी देतात. ऐतिहासिक स्थळे,राष्ट्रीय महापुरुषांची निवासस्थाने, अतिप्राचीन मंदिरे, प्राचीन  किल्ले, समुद्रतट,  आकर्षक महाल आणि हवेल्या, महाराष्ट्र आणि राजस्थान येथील किल्ले , फतेहपूर सिक्री , ताजमहाल, चारमिनार, हम्पी , दिल्ली आणि आग्र्याचा लाल किल्ला अशी शेकडो स्थळे बघण्याकरिता जगभरातुन पर्यटक आणि अभ्यासक भारतात येत असतात आणि समृद्धीचा खजिना आपल्या देशात घेऊन जातात. समुद्र पर्यटन, व्यवसाय पर्यटन, सामान्य पर्यटन, क्रीडा पर्यटन, साहस पर्यटन, वैद्यकीय पर्यटन, इको आणि जंगल पर्यटन, या सोबतच धार्मिक आणि कृषी पर्यटन यासह अनेक पर्यटन प्रकारच्या व्याख्या प्रस्थापित आणि लोकप्रिय होत आहेत. देशात आणि परदेशात पर्यटकां करिता ‘आध्यात्मिक पर्यटन’ ही सुद्धा भारताची ओळख आहे.
ही ओळख पटविण्याकरिता आता ‘हॉलिडे पॅकेजेस’च्या  संकल्पनेने चांगलाच जोर धरला आहे. रिसॉर्ट, हॉटेल, शिकारा, विमान बुकिंग, टुर मॅनेजर, ट्रॅवल एजंट, गाईड हे देश-विदेशात एकाच पॅकेजमध्ये मिळू लागले आहे. या पर्यटनाच्या बळावर शेकडो कोटींची उलाढाल होत आहे आणि देशाच्या सकल उत्पन्नात पर्यटन वाढीचा भरपूर वाटा आहे असे दिसून येते.

– श्रीकांत पवनीकर

Web Title: Ancient and modern history of world tourism

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2023 | 06:00 AM

Topics:  

  • World Tourism

ताज्या बातम्या

पुढे वाचा
आतड्यांच्या कॅन्सरची लागण झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, वारंवार दुर्लक्ष केल्यास कोणत्याही क्षणी होईल मृत्यू

आतड्यांच्या कॅन्सरची लागण झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, वारंवार दुर्लक्ष केल्यास कोणत्याही क्षणी होईल मृत्यू

Jan 04, 2026 | 05:30 AM
Lifestyle Tips :साठीत वाटाल तिशीतले, ‘या’ गोष्टी आहारात समाविष्ट करा

Lifestyle Tips :साठीत वाटाल तिशीतले, ‘या’ गोष्टी आहारात समाविष्ट करा

Jan 04, 2026 | 04:15 AM
“गृहनिर्माण प्रकल्पांमुळे पोलिसांच्या जीवनात…”; काय म्हणाले मुख्यमंत्री Devendra Fadnavis?

“गृहनिर्माण प्रकल्पांमुळे पोलिसांच्या जीवनात…”; काय म्हणाले मुख्यमंत्री Devendra Fadnavis?

Jan 04, 2026 | 02:35 AM
राहुल गांधी बनले राम; कॉंग्रेस नेते नाना पटोलेंनी उपमा देऊन केला सन्मान की अपमान?

राहुल गांधी बनले राम; कॉंग्रेस नेते नाना पटोलेंनी उपमा देऊन केला सन्मान की अपमान?

Jan 04, 2026 | 01:14 AM
Vaibhav Suryavanshi च्या कॅप्टन्सीमध्ये Under 19 भारतीय टीमला मिळाले पहिले यश, SA ला नमवले; 25 रन्सने हरवले

Vaibhav Suryavanshi च्या कॅप्टन्सीमध्ये Under 19 भारतीय टीमला मिळाले पहिले यश, SA ला नमवले; 25 रन्सने हरवले

Jan 03, 2026 | 10:34 PM
‘मी लाचार आहे…’ टीममधून बाहेर काढल्यानंतर मुस्तफिजुरची पहिली प्रतिक्रिया, BCCI च्या निर्णयाने झाला उद्ध्वस्त

‘मी लाचार आहे…’ टीममधून बाहेर काढल्यानंतर मुस्तफिजुरची पहिली प्रतिक्रिया, BCCI च्या निर्णयाने झाला उद्ध्वस्त

Jan 03, 2026 | 10:05 PM
Ola Uber चा बाजार उठवण्यासाठी आली Bharat Taxi! किती असेल भाडं? जाणून घ्या

Ola Uber चा बाजार उठवण्यासाठी आली Bharat Taxi! किती असेल भाडं? जाणून घ्या

Jan 03, 2026 | 09:52 PM

व्हिडिओ

पुढे बघा
‘सरनाईक झाले भाईजान’-भाजप नेते नरेंद्र मेहता यांचा शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल

‘सरनाईक झाले भाईजान’-भाजप नेते नरेंद्र मेहता यांचा शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल

Jan 03, 2026 | 07:50 PM
Akola : वडील चौकीदार आई करते धुणीभांडी वीज बिल वाटणाऱ्या मंगेश झिनेला मिळाली उमेदवारी

Akola : वडील चौकीदार आई करते धुणीभांडी वीज बिल वाटणाऱ्या मंगेश झिनेला मिळाली उमेदवारी

Jan 03, 2026 | 07:31 PM
Panvel : विश्वासाने दिलेली उमेदवारी मागे घेणे शोकांतिका आहे – बाळाराम पाटील

Panvel : विश्वासाने दिलेली उमेदवारी मागे घेणे शोकांतिका आहे – बाळाराम पाटील

Jan 03, 2026 | 07:24 PM
Kolhapur Satej Patil : “बच्चा कोण आणि शेर कोण हे इचलकरंजीची जनता निकालातून दाखवेल” – राहुल आवाडे

Kolhapur Satej Patil : “बच्चा कोण आणि शेर कोण हे इचलकरंजीची जनता निकालातून दाखवेल” – राहुल आवाडे

Jan 03, 2026 | 07:12 PM
Navi Mumbai :  पनवेलमध्ये भाजप उमेदवाराची माघार, अपक्ष उमेदवार स्नेहल ढमाले पाटील विजयी

Navi Mumbai : पनवेलमध्ये भाजप उमेदवाराची माघार, अपक्ष उमेदवार स्नेहल ढमाले पाटील विजयी

Jan 03, 2026 | 05:39 PM
Beed : श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावर संत वामन भाऊंच्या उत्सवाला सुरुवात

Beed : श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावर संत वामन भाऊंच्या उत्सवाला सुरुवात

Jan 03, 2026 | 05:33 PM
Nanded Election : शहराचा विकास झालाच नाही, तत्कालीन सत्ताधा-यांनी विकासाच्या नावाखाली मलिदा लाटला

Nanded Election : शहराचा विकास झालाच नाही, तत्कालीन सत्ताधा-यांनी विकासाच्या नावाखाली मलिदा लाटला

Jan 03, 2026 | 04:41 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.