Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

करोडपती सोडून चाललेत स्वतःचाच देश; यावर्षी तब्बल 1.65 लाख लोकांनी शोधला नवा ठिकाणा, पण का?

'हेनली प्रायव्हेट वेल्थ मायग्रेशन रिपोर्ट २०२६' च्या ताज्या अहवालानुसार, यावर्षी जगभरातील तब्बल १.६५ लाख करोडपती आपला स्वतःचा देश सोडून दुसऱ्या देशात स्थायिक होण्याच्या तयारीत आहेत. श्रीमंतांच्या या विक्रमी स्थलांतराने जागतिक बाजारपेठेत मोठी खळबळ उडाली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 21, 2026 | 07:20 PM
जगातील अनेक कोट्यधीश आपला देश सोडून ग्रीसच्या वाटेवर

जगातील अनेक कोट्यधीश आपला देश सोडून ग्रीसच्या वाटेवर

Follow Us
Follow Us:

Millionaires Migration: पैसा असेल तर माणूस काहीही करु शकतो. असं प्रत्येकवेळी आपल्याला सांगितलं जातं. पण ते खरंच आहे! बघाना नव्या रिपोर्टनुसार ही बातमीच तशी आहे. जगभरात असे अनेक श्रीमंत लोक आहेत जे स्वतःचाच देश सोडून दुसऱ्या देशात स्थलांतर करत आहेत. पण का? फक्त पैसा आणि आलिशान जीवन हीच कारणं आहेत का? की आणखी काही महत्त्वाचे बदल यांस कारणीभूत ठरताहेत. सविस्तर जाणून घेऊयात.

पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! गुंतवणूक योजनेवर मिळणार 3.5 लाख रुपये? तुम्हालाही असा मॅसेज आलाय तर सावध व्हा…

तर हे आहे कारण!

फक्त पैसा आणि आलिशान जीवन ही तर कारणं आहेतच. पण आता चांगल्या सुविधा आणि उज्ज्वल भविष्याच्या शोधात आपले देश सोडून दुसऱ्या देशांमध्ये जाण्याची तयारी करत आहेत. कोट्यवधी आणि अब्जावधींची मालमत्ता असलेले अनेक लक्षाधीश आता दुसऱ्या देशांमध्ये आपले नवीन घर वसवताहेत.
हेनलेच्या २०२६ च्या अंदाजानुसार, अंदाजे १.६५ लाख लक्षाधीश, संपत्ती, प्रतिष्ठा आणि आलिशान जीवन असूनही, या वर्षी आपला देश सोडून दुसऱ्या देशांमध्ये स्थलांतरित होणार आहेत. श्रीमंतांचे आपले देश सोडून जाण्याचा हा कल जगभरात वेगाने दिसून येत आहे.

श्रीमंतांचे स्थलांतर विक्रमी पातळीवर

अलीकडच्या वर्षांत इतर देशांमध्ये स्थलांतरित होणाऱ्या लक्षाधीशांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. अहवालानुसार…
२०२६: या वर्षी १.६५ कोटी श्रीमंत व्यक्ती आपले देश सोडून जाण्याचा अंदाज आहे.
२०२५: गेल्या वर्षी १.४२ कोटी लक्षाधीशांनी आपले देश सोडले.
२०२४: २०२४ मध्ये १.३४ कोटी लक्षाधीशांनी आपले देश सोडले.
२०१३: २०१३ च्या तुलनेत ही संख्या केवळ ५१,००० च्या आसपास होती.
याचा अर्थ आज स्थलांतर करणाऱ्या श्रीमंत व्यक्तींची संख्या तिप्पटीहून अधिक वाढत चालली आहे.

श्रीमंतांसाठी UAE हे नवीन ठिकाण

असे वृत्त आहे की, संयुक्त अरब अमिरात UAE हे जगभरातील श्रीमंत व्यक्तींसाठी पसंतीचे ठिकाण बनले आहे. तेथील उत्कृष्ट जीवनशैली आणि व्यावसायिक वातावरण हे श्रीमंतांसाठी एक प्रमुख आकर्षण आहे. UAE चा संपत्ती गतिशीलतेचा म्हणजेच wealth mobility चा स्कोअर ८५.३ असल्याचे वृत्त आहे, ज्यामुळे ते सर्वाधिक पसंतीच्या देशांपैकी एक बनले आहे. अमेरिकेचा स्कोअर ६२.३ आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, अमेरिकेपेक्षा जास्त लोक दुसरे नागरिकत्व आणि नवीन ठिकाणांच्या शोधात आहेत.

अमेरिका आणि युकेसारख्या देशांवर परिणाम

श्रीमंत व्यक्तींच्या देश सोडून जाण्याच्या या प्रवृत्तीचा आता जगभरातील प्रमुख अर्थव्यवस्थांवर परिणाम होत आहे. अमेरिका आणि युकेसारखे देश सोडून जाणाऱ्या श्रीमंत व्यक्तींची संख्याही वाढत आहे. सध्या युके हे श्रीमंत व्यक्तींसाठी जगातील प्रमुख ठिकाणांपैकी एक आहे. तथापि, युके सोडून जाणाऱ्यांपैकी लक्षणीय संख्येने लोक स्वतः ब्रिटिश नागरिक आहेत.

श्रीमंत भारतीय देश का सोडून जात आहेत?

या अहवालानुसार, भारताबाबतही अनेक महत्त्वाचे निष्कर्ष समोर आले आहेत. भारताचा संपत्ती गतिशीलतेचा गुणांक ५६.५ असल्याचे म्हटले जाते. मर्यादित भांडवली नियंत्रण आणि कठोर कर नियम ही भारतीय श्रीमंतांच्या इतर देशांमध्ये होणाऱ्या स्थलांतरामागील प्रमुख कारणांपैकी आहेत.

IPO Alert: धमाक्यासाठी तयार राहा… Share Market मध्ये तब्बल 40000 कोटींचा महा-आयपीओ येतोय; सेबीकडे DRHP दाखल

Web Title: 1 65 lakh millionaires leaving their country henley wealth report but why see details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • Business News
  • Marathi News
  • Migraine news
  • millionaires

संबंधित बातम्या

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
1

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
2

भारतातील Data Center विस्तारामुळे रोजगाराची मोठी संधी! 1 लाख इंजिनिअरिंग नोकऱ्या अन् 300 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!
4

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.