(फोटो सौजन्य:Chatgpt)
पंतप्रधाम मोदींनी एक मोठी घोषणा केली आहे. गुंतवणूक योजनेबाबत ही घोषणा असलेला व्हिडीओ तुमच्याही फीडवर आला असेल तर आताच सावध व्हा. सोशल मीडियाच्या या युगात माहिती झपाट्याने पसरते आणि दिशाभूल करणारी खोटी माहितीही लोकांपर्यंत वेगाने पोहोचते. याच संदर्भात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते एका गुंतवणूक प्लॅटफॉर्मचा प्रचार करताना दिसत आहेत. नेमकं काय आहे या व्हिडीओ मागे समजून घेऊयात.
एका व्हायरल व्हिडिओमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, ‘क्वांटम एआय’ नावाचे एक गुंतवणूक प्लॅटफॉर्म केवळ २१,०००-२२,००० रुपयांच्या सुरुवातीच्या गुंतवणुकीतून दरमहा ३.५ लाख रुपयांपर्यंतची भरीव कमाई करून देऊ शकते. भारत सरकारची अधिकृत तथ्य-तपासणी शाखा असलेल्या पीआयबी फॅक्ट चेकने या व्हायरल व्हिडिओची तपासणी केली असता, तो AI द्वारे तयार केलेला डीपफेक असल्याचे आढळले. PIB च्या तथ्य-तपासणी युनिटने हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला असून, याला एक ऑनलाइन गुंतवणूक घोटाळा म्हटले आहे.
🚨 Don’t Fall for ‘Easy Money’ Investment Scams‼️ A manipulated video circulating online falsely shows Prime Minister @narendramodi endorsing an investment platform and claiming returns of up to ₹3.5 lakh per month on an investment of ₹22,000.#PIBFactCheck ❌ This video is… pic.twitter.com/NWQgGH9Z2X — PIB Fact Check (@PIBFactCheck) June 19, 2026
‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात, PIB फॅक्ट चेकने म्हटले आहे की, हा व्हिडिओ बनावट असून तो AI वापरून तयार करण्यात आला आहे. भारत सरकारने अशा कोणत्याही गुंतवणूक प्लॅटफॉर्म किंवा योजनेला मान्यता दिलेली नाही. संशयास्पद लिंक्सवर कधीही क्लिक करू नका किंवा तुमची वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती शेअर करू नका. गुंतवणूक करण्यापूर्वी नेहमी अधिकृत स्रोतांकडून माहितीची पडताळणी करा.
जर तुम्हाला सोशल मीडियावर दिशाभूल करणारी सरकारी माहिती आढळल्यास, तुम्ही थेट PIB फॅक्ट चेकला त्यांच्या व्हॉट्सॲप नंबर – +91 8799711259 वर किंवा factcheck@pib.gov.in वर ईमेल करून तक्रार करू शकता.
आजकाल डीपफेक तंत्रज्ञानाच्या गैरवापराची प्रकरणे वाढत आहेत. घोटाळेबाज व्यक्तींचे व्हिडिओ अशा प्रकारे तयार करण्यासाठी AI चा वापर करतात की त्यांचे स्वरूप, उंची, आवाज आणि बोलणे पूर्णपणे खरे वाटावे. अशा प्रकारे, घोटाळेबाज निष्पाप लोकांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक करतात.






