Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

8th Pay Commission: 1 जानेवारीपासून लागू होणार 8 वा वेतन आयोग? सरकारने संसदेत दिली पूर्ण माहिती, कुठपर्यंत पोहलची मजल

सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक आठव्या वेतन आयोगाची आतुरतेने वाट पाहत आहेत. सरकारने संसदेत त्यासंबंधीच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. खरंच १ जानेवारीपासून लागू होणार का? जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Dec 09, 2025 | 04:56 PM
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार (फोटो सौजन्य - iStock)

८ वा वेतन आयोग कधी लागू होणार (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:
  • ८ वा वेतन आयोग कधी लागू होणार
  • १ जानेवारीपासून ८ वा वेतन आयोग लागू होऊ शकतो का 
  • केंद्र सरकारने संसदेत दिले उत्तर 
केंद्र सरकारने नोव्हेंबरच्या सुरुवातीला आठव्या वेतन आयोगाची स्थापना केली आहे आणि त्याच्या संदर्भ अटी (ToR) मंजूर केल्या आहेत. तेव्हापासून, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी कधी होणार हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. सरकारने आठव्या वेतन आयोगाला अहवाल सादर करण्यासाठी १८ महिन्यांची अंतिम मुदत दिली आहे, परंतु प्रत्यक्षात तो कधी लागू होईल हे सांगितलेले नाही.

आठव्या वेतन आयोगाशी संबंधित हा प्रश्न सोमवार, ८ डिसेंबर रोजी संसदेत उपस्थित करण्यात आला. चार खासदारांनी अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांना आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी कधी होणार असे विचारले. खासदारांना हेदेखील जाणून घ्यायचे होते की सरकार २०२६-२०२७ च्या अर्थसंकल्पात आठव्या वेतन आयोगासाठी निधी देणार का?सरकारने संसदेत या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली, नक्की काय आहेत उत्तरं घ्या जाणून 

आठव्या वेतन आयोगाची सध्याची स्थिती काय आहे?

संसदेत एका तारांकित प्रश्नाच्या उत्तरात खासदार एन.के. प्रेमचंद्रन, थिरु थांगा तमिळसेल्वन, पी. गणपती राजकुमार आणि धर्मेंद्र यादव यांनी आठव्या वेतन आयोगाच्या सद्यस्थितीबद्दल विचारणा केली. चौधरी यांनी त्यांना माहिती दिली की, आठवा वेतन आयोग स्थापन करण्यात आला आहे आणि त्याचा कार्यविधी (TOR) मंजूर करण्यात आला आहे. चौधरी म्हणाले की आठवा केंद्रीय वेतन आयोग आधीच स्थापन करण्यात आला आहे. ३ नोव्हेंबर २०२५ रोजीच्या अर्थ मंत्रालयाच्या ठरावाद्वारे ८ व्या केंद्रीय वेतन आयोगाचा कार्यविधी (TOR) अधिसूचित करण्यात आला आहे.

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट, महागाई भत्ता आणि आठवा वेतन आयोगात होणार ‘इतकी’ वाढ!

८ वा वेतन आयोग आपला अहवाल कधी सादर करेल?

केंद्र सरकार आपल्या शिफारसी कधी सादर करेल आणि त्या कधी लागू करेल असा प्रश्न खासदारांनी विचारला. ३ नोव्हेंबर २०२५ रोजी अधिसूचित केलेल्या ठरावात नमूद केल्याप्रमाणे, आठवा केंद्रीय वेतन आयोग त्याच्या स्थापनेच्या तारखेपासून १८ महिन्यांच्या आत आपल्या शिफारसी करेल असे चौधरी यांनी उत्तर दिले.

कधी लागू करण्यात येईल?

केंद्र सरकार १ जानेवारी २०२६ पासून आठवा वेतन आयोग लागू करण्याचा प्रस्ताव ठेवत आहे का, असा प्रश्न चौधरी यांना विचारण्यात आला. त्यांच्या उत्तरात चौधरी यांनी आठवा वेतन आयोग लागू करण्याची विशिष्ट तारीख स्पष्ट केली नाही. त्यांनी सांगितले की, आठवा केंद्रीय वेतन आयोग लागू करण्याची तारीख सरकार ठरवेल.

सरकार निधी पुरवणार

राज्यमंत्र्यांना विचारण्यात आले की, २०२६-२०२७ च्या अर्थसंकल्पात आठवा वेतन आयोग लागू करण्यासाठी सरकार निधीची तरतूद करण्याची योजना आखत आहे का, तेव्हा चौधरी म्हणाले की, वेतन आयोगाच्या स्वीकृत शिफारसी लागू करण्यासाठी सरकार पुरेसा निधी उपलब्ध करून देईल.

8th Pay Commission: ₹18000 चा पगार वाढणार ₹44280 इतका, का लागतोय वेळ? 8वा वेतन आयोग ToR च्या जाळ्यात अडकला

कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांची संख्या किती आहे?

केंद्र सरकारमध्ये एकूण कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांची संख्या किती आहे, याबद्दलही मंत्र्यांना विचारण्यात आले. चौधरी यांनी सांगितले की, केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या ५०.१४ लाख आहे आणि निवृत्तीवेतनधारकांची संख्या अंदाजे ६९ लाख आहे. त्यांचा पगारवाढ होणे शक्य आहे की नाही हेदेखील पहावे लागेल. 

Web Title: 8th pay commission will be implemented on 1st january 2026 government cleared in parliament updates inside

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 04:56 PM

Topics:  

  • 8th pay commission
  • Business News
  • Central government

संबंधित बातम्या

Jai Anmol Ambani: अनिल अंबानीचा मुलगा जय अनमोलवर FIR दाखल, तब्बल 228 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप
1

Jai Anmol Ambani: अनिल अंबानीचा मुलगा जय अनमोलवर FIR दाखल, तब्बल 228 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप

Sugar Tax: दुबईत साखर महागणार! २०२६ पासून साखरयुक्त पेयांवर ५०% कर
2

Sugar Tax: दुबईत साखर महागणार! २०२६ पासून साखरयुक्त पेयांवर ५०% कर

Shipwaves Online IPO: डिजिटल लॉजिस्टिक्स कंपनी शिपवेव्सचा IPO होणार खुला, १० डिसेंबरला उघडणाऱ्या IPO कडे गुंतवणूकदारांचे लक्ष
3

Shipwaves Online IPO: डिजिटल लॉजिस्टिक्स कंपनी शिपवेव्सचा IPO होणार खुला, १० डिसेंबरला उघडणाऱ्या IPO कडे गुंतवणूकदारांचे लक्ष

Digital Stamping : भाडेकरूंना मोठा दिलासा! डिजिटल स्टॅम्पिंग अनिवार्य; दोन महिन्यात न केल्यास ५,००० दंड
4

Digital Stamping : भाडेकरूंना मोठा दिलासा! डिजिटल स्टॅम्पिंग अनिवार्य; दोन महिन्यात न केल्यास ५,००० दंड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.