सौजन्य फोटो - AI Gemini
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शेतकऱ्याच्या पत्नीने बचत गटामार्फत कर्ज घेतले होते. या कर्जाचा हप्ता थकल्याने एयु फायनान्सच्या कर्मचाऱ्याने थेट शेतकऱ्याला फोन करून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. “भिकारड्या, लायकी नसेल तर कर्ज घेतलं कशाला?” अशा अतिशय भयंकर आणि शिवराळ शब्दांचा वापर करत कर्मचाऱ्याने शेतकऱ्याचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने, या शेतकऱ्याने हा संपूर्ण फोन कॉल रेकॉर्ड केला असून, ही धक्कादायक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
एकीकडे दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाकडून सक्तीची कर्जवसुली न करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. तरीदेखील खासगी फायनान्स कंपन्या आणि बँका शासकीय नियमांची पायमल्ली करत शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळत असल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे. वसुली कर्मचाऱ्यांच्या अशा त्रासामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येत असल्याचा गंभीर आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे. “महाराष्ट्रात चाललंय तरी काय?” असा थेट सवाल उपस्थित करत दोषी कर्मचाऱ्यावर आणि संबंधित बँकेवर तात्काळ कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
Ans: एयु फायनान्स बँकेच्या (AU Finance Bank) कर्जवसुली कर्मचाऱ्याने फोनवर शेतकऱ्याचा अपमान आणि शिवीगाळ केली.
Ans: बचत गटामार्फत घेतलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी कर्मचाऱ्याने फोन केला होता. या संभाषणाची शिवीगाळ असलेली ऑडिओ क्लिप शेतकऱ्याने रेकॉर्ड केली असून ती व्हायरल झाली आहे.
Ans: सरकारी आदेश असतानाही सक्तीची वसुली करून शेतकऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केले जात असल्याचा आरोप करत संघटनांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.






