Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 17 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मूल्यवर्धित ॲल्युमिनियम उत्पादन परिसंस्थेला बळकटी देण्यासाठी ‘ॲल्युमिनियम भारत-२०२६’ उपक्रमाची घोषणा

Aluminium india Amanirbhar Bharat initiative 2026: ॲल्युमिनियम एक्सट्रुजन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया (अलेमाई)ने देशातील मूल्यवर्धित ॲल्युमिनियम मिडस्ट्रीम आणि डाउनस्ट्रीम उत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘ॲल्युमिनियम भारत-२०२६’ या राष्ट्रीय उपक्रमाची घोषणा केली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 17, 2026 | 06:35 PM
मूल्यवर्धित ॲल्युमिनियम उत्पादन परिसंस्थेला बळकटी देण्यासाठी ‘ॲल्युमिनियम भारत-२०२६’ उपक्रमाची घोषणा
Follow Us
Follow Us:
  • ॲल्युमिनियम भारत-२०२६’ उपक्रमाची घोषणा
  • ॲल्युमिनियम उत्पादन परिसंस्थेला मिळणार बळ
  • धोरणकर्त्यांसमोर चार महत्त्वाच्या बाबी
मुंबई : ॲल्युमिनियम एक्सट्रुजन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आॅफ इंडिया (अलेमाई)ने देशातील मूल्यवर्धित ॲल्युमिनियम मिडस्ट्रीम आणि डाउनस्ट्रीम उत्पादन परिसंस्थेला बळकटी देण्यासाठी ‘ॲल्युमिनियम भारत-२०२६’ या राष्ट्रीय उपक्रमाची घोषणा केली आहे. केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारत २०४७ या संकल्पनांना बळ देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. गांधीनगर येथे होणाऱ्या प्रमुख प्रदर्शनापूर्वी उद्योग आणि माध्यमांना या उपक्रमाची माहिती देण्यासाठी मुंबईत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली.

Business Ideas : गावातून लक्षाधीश बना! कमी गुंतवणुकीत सुरू करा ‘हे’ 20 बिझनेस; 16 व्या नंबरची भन्नाट आयडिया

भारताकडे मोठ्या प्रमाणावर बॉक्साइटचे साठे असून, ॲल्युमिना उत्पादन करणाऱ्या अग्रगण्य देशांमध्ये भारताचा समावेश होतो. त्यामुळे ॲल्युमिनियम उत्पादन क्षेत्रात भारताला नैसर्गिक स्पर्धात्मक लाभ प्राप्त आहे.

मात्र, एवढा मजबूत कच्चा माल उपलब्ध असूनही, विशेषत: सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) प्राथमिक आणि दुय्यम ॲल्युमिनियम कच्चा माल जगातील अनेक विकसनशील देशांच्या तुलनेत अधिक किमतीत खरेदी करावा लागत आहे. वाढलेले व्याजदर, ऊर्जा खर्च आणि विविध करांमुळे कच्च्या मालाचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे अलेमाईने नमूद केले.

या पार्श्वभूमीवर २६ ते २९ सप्टेंबर २०२६ या कालावधीत गुजरातमधील गांधीनगर (अहमदाबाद) येथील हेलिपॅड एक्झिबिशन सेंटरमध्ये ‘ॲल्युमिनियम भारत-२०२६’ आणि ‘अल्युमेक्स इंडिया-२०२६’ या प्रदर्शनांचे आयोजन करण्यात येणार आहे. संपूर्ण ॲल्युमिनियम मूल्यसाखळीला एकाच व्यासपीठावर आणणारा भारतातील हा पहिलाच व्यापक उपक्रम ठरणार आहे.

या प्रदर्शनात प्राथमिक ॲल्युमिनियम उत्पादक, एक्सट्रुजन व रोलिंग उद्योग, पुनर्वापर क्षेत्रातील कंपन्या, तंत्रज्ञान व यंत्रसामग्री पुरवठादार, धोरणकर्ते, वित्तीय संस्था आणि जागतिक खरेदीदार सहभागी होणार आहेत. भारतातील डाउनस्ट्रीम उद्योगाची क्षमता वाढविण्यासाठी आवश्यक सुधारणा, गुंतवणूक आणि सहकार्य यावर या व्यासपीठावर चर्चा होणार आहे.

या उपक्रमाद्वारे अलेमाईने उद्योग आणि धोरणकर्त्यांसमोर चार महत्त्वाच्या बाबी मांडल्या आहेत :

  • प्राथमिक ॲल्युमिनियम आणि कच्च्या मालावरील शुल्काचा फेरविचार करून मुक्त व्यापार करारांमुळे (एफटीए) शून्य शुल्कात होणाऱ्या डाउनस्ट्रीम उत्पादनांच्या आयातीचे पुनर्मूल्यांकन करणे, जेणेकरून देशांतर्गत उद्योगांना समान स्पर्धेची संधी मिळेल.
  • ऊर्जा आणि वित्तपुरवठ्याचा खर्च कमी करून भारतीय ॲल्युमिनियम एमएसएमई उद्योगांना जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनविणे.
  • देशातील तीन दशलक्ष टन एक्सट्रुजन क्षमतेचा पूर्ण वापर होण्यासाठी मूल्यवर्धित ॲल्युमिनियम उत्पादनांच्या देशांतर्गत वापराला प्रोत्साहन देणे.
  • केवळ प्राथमिक धातूच्या निर्यातीऐवजी उच्च मूल्यवर्धित डाउनस्ट्रीम उत्पादनांच्या निर्यातीवर भर देणाºया जागतिक प्रवाहाशी भारताचे ॲल्युमिनियम धोरण सुसंगत करणे.
कच्चा माल आणि मूल्यवर्धित तयार उत्पादनांवरील शुल्कातील असमतोल हा उद्योगासमोरील मोठा प्रश्न असल्याचे अलेमाईने नमूद केले आहे. आसियान, संयुक्त अरब अमिरातीसह इतर देशांबरोबर झालेल्या मुक्त व्यापार करारांमुळे मोठ्या प्रमाणावर डाउनस्ट्रीम ॲल्युमिनियम उत्पादने भारतात शून्य किंवा अत्यल्प आयात शुल्कात येत आहेत. त्यामुळे देशांतर्गत मूल्यवर्धित उत्पादन क्षेत्रावर मोठा दबाव निर्माण झाला आहे.

दुसरीकडे, प्राथमिक ॲल्युमिनियम (एचएस ७६०१) आयातीवर ७.५ टक्के मूलभूत सीमाशुल्क तसेच अधिभार लागू होत असून, प्रभावी शुल्क आठ टक्क्यांहून अधिक आहे. कच्च्या मालाच्या इतर अनेक प्रकारांवरही अशाच प्रकारचे शुल्क लागू आहे. परिणामी, भारतातील कच्च्या मालाचा खर्च अनेक स्पर्धक विकसनशील देशांच्या तुलनेत जास्त आहे, तर तयार उत्पादने शुल्कमुक्त आयात होत असल्याने देशातील मिडस्ट्रीम आणि डाउनस्ट्रीम उद्योगांना देशांतर्गत तसेच निर्यात बाजारपेठेत मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

भारतातील ॲल्युमिनियम एक्सट्रुजन उद्योगाची वार्षिक स्थापित क्षमता सुमारे ३० लाख टन आहे. मात्र, सध्या केवळ १२ ते १३ लाख टन उत्पादन होत आहे. उर्वरित मागणी भागविण्यासाठी सुमारे १५ लाख टन डाउनस्ट्रीम ॲल्युमिनियम उत्पादनांची आयात केली जात असल्याचा अंदाज आहे.

ही क्षमता पूर्णपणे वापरली जात नसण्यामागे मागणीचा अभाव नसून, कच्च्या मालाचा वाढलेला खर्च, शुल्कातील विसंगती, महागडी ऊर्जा आणि मुक्त व्यापार करारांतर्गत अनुदानित आयातीमुळे निर्माण झालेली स्पर्धा ही प्रमुख कारणे असल्याचे अलेमाईने स्पष्ट केले आहे.

या परिस्थितीमुळे उद्योगातील गुंतवणुकीवर परिणाम होत असून, विशेषत: एमएसएमई उद्योग केवळ अस्तित्व टिकविण्यापुरतेच मर्यादित राहिले आहेत. परिणामी, मूल्यवर्धित ॲल्युमिनियम उत्पादनांच्या जागतिक केंद्र म्हणून विकसित होण्याची भारताची क्षमता पूर्णपणे वापरली जात नसल्याचेही अलेमाईने नमूद केले.

जागतिक स्तरावर अग्रगण्य ॲल्युमिनियम उत्पादक देश प्राथमिक धातूऐवजी मूल्यवर्धित तयार उत्पादनांच्या निर्मिती आणि निर्यातीला प्राधान्य देत आहेत. व्यापार आणि औद्योगिक धोरणांच्या माध्यमातून उच्च मूल्याच्या उत्पादनांना प्रोत्साहन दिले जात आहे.

उदाहरणार्थ, चीनने प्राथमिक धातूऐवजी प्रक्रिया केलेल्या आणि अभियांत्रिकी आधारित ॲल्युमिनियम उत्पादनांच्या निर्यातीवर भर देत अधिक मूल्यनिर्मिती, रोजगार आणि तंत्रज्ञान विकासाला चालना दिली आहे.

भारतीय उद्योग क्षेत्राचे मत आहे की, भारतानेही प्राथमिक धातूच्या निर्यातीऐवजी मूल्यवर्धित ॲल्युमिनियम उत्पादने आणि प्रगत डाउनस्ट्रीम उत्पादन उद्योगाला प्राधान्य देणारे धोरण स्वीकारण्याची आवश्यकता आहे.

ॲल्युमिनियम भारत-२०२६’ या उपक्रमाच्या माध्यमातून भारतातील समृद्ध बॉक्साइट आणि ॲल्युमिना साठ्याच्या बळावर जागतिक दर्जाची मूल्यवर्धित ॲल्युमिनियम उत्पादने विकसित करण्यासाठी सक्षम मिडस्ट्रीम आणि डाउनस्ट्रीम उत्पादन परिसंस्था उभारण्याबाबत व्यापक राष्ट्रीय चर्चा सुरू करण्याचे आवाहन अलेमाईने केले आहे.

RBI चा मोठा निर्णय! भारतात प्लास्टिकच्या नोटा येण्याची तयारी पूर्ण, रिझर्व्ह बँकेने जारी केले ग्लोबल EOI

Web Title: Aluminium india 2026 msme downstream industry atmanirbhar bharatindia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 06:35 PM

Topics:  

  • Business News
  • International Trade
  • Viksit Bharat

संबंधित बातम्या

Business Ideas : गावातून लक्षाधीश बना! कमी गुंतवणुकीत सुरू करा ‘हे’ 20 बिझनेस; 16 व्या नंबरची भन्नाट आयडिया
1

Business Ideas : गावातून लक्षाधीश बना! कमी गुंतवणुकीत सुरू करा ‘हे’ 20 बिझनेस; 16 व्या नंबरची भन्नाट आयडिया

संपले… Free UPI चे दिवस संपले? 2000 पेक्षा जास्त व्यवहारांवर द्यावा लागणार अतिरिक्त चार्ज? सरकार आणतंय नवा नियम
2

संपले… Free UPI चे दिवस संपले? 2000 पेक्षा जास्त व्यवहारांवर द्यावा लागणार अतिरिक्त चार्ज? सरकार आणतंय नवा नियम

Amitabh Bachchan CA: कधीकाळी सांभाळायचे अमिताभ बच्चन यांचे अकाउंट; आज स्वतः 15000 कोटींचे मालक! कोण आहेत प्रेमचंद गोधा?
3

Amitabh Bachchan CA: कधीकाळी सांभाळायचे अमिताभ बच्चन यांचे अकाउंट; आज स्वतः 15000 कोटींचे मालक! कोण आहेत प्रेमचंद गोधा?

LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी! सिलिंडरमध्ये शिल्लक राहणाऱ्या गॅसवर निघाला तोडगा; वाचतील ₹21900 कोटी रुपये
4

LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी! सिलिंडरमध्ये शिल्लक राहणाऱ्या गॅसवर निघाला तोडगा; वाचतील ₹21900 कोटी रुपये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.