Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 4 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेझॉनतर्फे नवी फायर टीव्ही स्टिक एचडी लाँच; किंमत किती? जाणून घ्या सविस्तर

अमेझॉनने भारतीय बाजारपेठेत नवी ‘फायर टीव्ही स्टिक एचडी’ सादर करत घरगुती मनोरंजन क्षेत्रातील स्पर्धा अधिक तीव्र केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 19, 2026 | 03:55 PM
अमेझॉनतर्फे नवी फायर टीव्ही स्टिक एचडी लाँच; किंमत किती? जाणून घ्या सविस्तर

अमेझॉनतर्फे नवी फायर टीव्ही स्टिक एचडी लाँच; किंमत किती? जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:

पुणे : अमेझॉनने भारतीय बाजारपेठेत नवी ‘फायर टीव्ही स्टिक एचडी’ सादर करत घरगुती मनोरंजन क्षेत्रातील स्पर्धा अधिक तीव्र केली आहे. आधीच्या पिढीच्या तुलनेत ही नवी साधनसामग्री सरासरी ३० टक्के अधिक वेगाने कार्य करत असल्याचा दावा कंपनीने केला असून, ग्राहकांना अधिक जलद, अखंड आणि सुलभ चित्रप्रवाहाचा अनुभव देण्यावर भर देण्यात आला आहे. पूर्ण एचडी दर्जातील चित्रप्रवाह, अधिक स्थिर बिनतारी जाळे जोडणी, वेगवान प्रतिसाद क्षमता आणि नव्या स्वरूपातील वापर प्रणाली ही या उत्पादनाची प्रमुख वैशिष्ट्ये मानली जात आहेत.

 

कंपनीच्या मते, ही आतापर्यंतची सर्वात सडपातळ आणि हलकी ‘फायर टीव्ही स्टिक’ असून ती थेट दूरचित्रवाणी संचाच्या ‘यूएसबी’ जोडणीद्वारे चालवता येते. त्यामुळे स्वतंत्र विद्युत जोडणी किंवा अतिरिक्त तारा वापरण्याची गरज राहत नाही. आकाराने लहान असल्याने ती प्रवासादरम्यान सहज बरोबर नेता येणार असून ग्राहकांना कुठेही त्यांच्या आवडत्या मालिका, चित्रपट किंवा थेट कार्यक्रमांचा आनंद घेता येणार आहे.

नव्या प्रणालीमध्ये चित्रपट, मालिका, थेट कार्यक्रम आणि विनामूल्य सामग्रीसाठी स्वतंत्र विभाग देण्यात आले आहेत. त्यामुळे ग्राहकांना हवे असलेले मनोरंजन कमी वेळेत शोधणे शक्य होणार आहे. याशिवाय, घरातील वातानुकूलन यंत्रणा, पंखे, दिवे आणि इतर स्मार्ट उपकरणांचे नियंत्रणही या प्रणालीद्वारे करता येणार आहे. आवाजाद्वारे आदेश देण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली असून त्यामुळे कार्यक्रम शोधणे आणि सुरू करणे अधिक सोपे होणार आहे. अमेझॉनने यंदाच्या सुरुवातीला भारतात ‘फायर टीव्ही’साठी नव्या स्वरूपातील भ्रमणध्वनी अनुप्रयोगही सादर केला होता. या माध्यमातून ग्राहकांना भ्रमणध्वनीवरूनच कार्यक्रम शोधणे, पाहण्याची यादी तयार करणे आणि दूरचित्रवाणीवर थेट कार्यक्रम सुरू करणे शक्य झाले आहे.

मनोरंजनाबरोबरच खेळप्रेमी ग्राहकांनाही लक्षात घेऊन या साधनामध्ये मेघाधारित खेळांचा पर्याय देण्यात आला आहे. त्यामुळे स्वतंत्र खेळयंत्रांशिवाय विविध खेळांचा अनुभव घेता येणार आहे. अमेझॉनच्या ‘फायर टीव्ही’ विभागाच्या प्रमुख सयंतनी चौधरी म्हणाल्या, “ग्राहकांना अधिक वेगवान आणि प्रतिसादक्षम मनोरंजन अनुभव अपेक्षित असतो. चित्रफिती जलद सुरू होणे, कार्यक्रम सहज शोधता येणे आणि अडथळामुक्त चित्रप्रवाह मिळणे या गरजा लक्षात घेऊन आम्ही नवी ‘फायर टीव्ही स्टिक एचडी’ विकसित केली आहे. ही आमची आतापर्यंतची सर्वात सडपातळ आणि सोयीस्कर साधनसामग्री असून ती दूरचित्रवाणीच्या मागे सहज बसते. कार्यक्षमता, रचना आणि वापरातील सुलभता यांचा समतोल साधत भारतीय ग्राहकांसाठी हे उत्पादन सादर करताना आम्हाला आनंद होत आहे.”

नवी ‘फायर टीव्ही स्टिक एचडी ४ हजार ९९९ रुपयांत उपलब्ध करण्यात आली असून, ग्राहकांना ती अमेझॉनसह विविध ऑनलाइन खरेदी आणि त्वरित वितरण मंचांवरून खरेदी करता येणार आहे. लवकरच ती किरकोळ विक्री केंद्रांमध्येही उपलब्ध होणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा : खिशात नाही आणा अन्…; कमाई घटत चालल्याने Loan काढत भागवावा लागतोय खर्च, Corona नंतर कर्जाचा बोजा थेट अडीच पटीवर

Web Title: Amazon has launched the new fire tv stick hd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 03:55 PM

Topics:  

  • amazon
  • Business
  • maharashtra

संबंधित बातम्या

मान्सूनच्या पार्श्वभूमीवर NDRF अलर्ट मोडवर! महाराष्ट्र आणि गोव्यातील ‘या’ संवेदनशील जिल्ह्यांमध्ये पाचवी बटालियन तैनात
1

मान्सूनच्या पार्श्वभूमीवर NDRF अलर्ट मोडवर! महाराष्ट्र आणि गोव्यातील ‘या’ संवेदनशील जिल्ह्यांमध्ये पाचवी बटालियन तैनात

सावध राहा! राज्यात ७ जुलैपर्यंत पावसाचा जोर; मुंबई, ठाणे, पालघरला रेड अलर्ट; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
2

सावध राहा! राज्यात ७ जुलैपर्यंत पावसाचा जोर; मुंबई, ठाणे, पालघरला रेड अलर्ट; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

शिक्षक बदलीचा वाद चिघळला; शिक्षण विभागाविरोधात संतप्त पालकांची आक्रमक भूमिका
3

शिक्षक बदलीचा वाद चिघळला; शिक्षण विभागाविरोधात संतप्त पालकांची आक्रमक भूमिका

Shevgaon News : शेवगावातील गुटखा कारवाईवर संशय; ५६ हजारांचा मुद्देमाल दाखवून लाखोंचा साठा लपवल्याची चर्चा
4

Shevgaon News : शेवगावातील गुटखा कारवाईवर संशय; ५६ हजारांचा मुद्देमाल दाखवून लाखोंचा साठा लपवल्याची चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.