Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सावध राहा! राज्यात ७ जुलैपर्यंत पावसाचा जोर; मुंबई, ठाणे, पालघरला रेड अलर्ट; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

राज्यात ७ जुलैपर्यंत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. कोकण, घाटमाथा आणि विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 03, 2026 | 06:33 PM
राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाची शक्यता; पुणे, सांगली, कोल्हापूरसह अनेक भागांत विजांसह पाऊस होणार

राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाची शक्यता; पुणे, सांगली, कोल्हापूरसह अनेक भागांत विजांसह पाऊस होणार

Follow Us
Follow Us:
  • राज्यात ७ जुलैपर्यंत पावसाचा जोर
  • कोकण-घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा इशारा
  • नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
  • विदर्भासह राज्यभर मुसळधार पावसाची शक्यता
  • ७ जुलैपर्यंत हवामान विभागाचा इशारा
Maharashtra Rain Alert News Marathi : राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून ७ जुलैपर्यंत अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विशेषतः कोकण किनारपट्टी, घाटमाथा तसेच मुंबई महानगर परिसरात पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण आणि घाटमाथ्यावरील काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. त्यामुळे नद्या, ओढे आणि धरणांतील पाण्याची पातळी झपाट्याने वाढण्याची शक्यता असून पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका नाकारता येत नाही. प्रशासनाने नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

Wardha flood alert : नदीकाठच्या २९३ गावांवर पुराचे सावट, २७ गावांचा संपर्क तुटण्याचा धोका!

दरम्यान, विदर्भातही ७ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही भागांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्याने शेतकरी आणि नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये अतिवृष्टीमुळे सखल भागांमध्ये पाणी साचणे, वाहतुकीवर परिणाम होणे, झाडे कोसळणे तसेच वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता लक्षात घेऊन महानगरपालिका आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क करण्यात आल्या आहेत.

प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे, समुद्रकिनाऱ्यावर जाणे टाळण्याचे तसेच हवामान विभाग आणि स्थानिक प्रशासनाकडून जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. मच्छीमारांनाही समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला असून किनारपट्टी भागात विशेष सतर्कता बाळगण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यातील अनेक धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पावसाची शक्यता असल्याने जलसंपदा विभाग परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहून सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

नैऋत्य मान्सूनने देशभरात आणखी वेग घेतला असून उत्तर अरबी समुद्राच्या काही भागांमध्ये, गुजरात, मध्य प्रदेशच्या उर्वरित भागांमध्ये तसेच राजस्थान आणि हरियाणाच्या काही भागांमध्ये मान्सूनची पुढील वाटचाल झाली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, उत्तर कोकण, गुजरात प्रदेश आणि सौराष्ट्र-कच्छ परिसरात मान्सून सक्रिय असून या भागांमध्ये पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Mumbai Rain Update : मुंबईकरांनो तयार राहा! दोन दिवस पावसाची विश्रांती, पण 1 जुलैनंतर पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता

Web Title: Maharashtra heavy rain red alert mumbai thane palghar till 7 july

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 06:33 PM

Topics:  

  • maharashtra
  • Monsoon Update
  • Mumbai Rain

संबंधित बातम्या

Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धेत सोनाली कुमारीची अंबिका हरिथवर पुन्हा मात
1

Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धेत सोनाली कुमारीची अंबिका हरिथवर पुन्हा मात

Navarashtra Impact: नवराष्ट्राच्या बातमीची दखल; शिवसैनिकांच्या दणक्यानंतर रामलीला गार्डनमध्ये आता रोज पोलिसांची गस्त
2

Navarashtra Impact: नवराष्ट्राच्या बातमीची दखल; शिवसैनिकांच्या दणक्यानंतर रामलीला गार्डनमध्ये आता रोज पोलिसांची गस्त

Wai Mahaganpati Ghat: महागणपती घाटावर पार्किंगचा ‘खासगी’ कारभार; वाहनांच्या रांगा, पालिकेकडे अधिकृत व्यवस्थेची मागणी
3

Wai Mahaganpati Ghat: महागणपती घाटावर पार्किंगचा ‘खासगी’ कारभार; वाहनांच्या रांगा, पालिकेकडे अधिकृत व्यवस्थेची मागणी

Hingoli Earthquake: गडगडाट अन् जमीन हादरली! हिंगोलीत दोन तासांत दोन भूकंपाचे धक्के; 4.5 तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये भीती
4

Hingoli Earthquake: गडगडाट अन् जमीन हादरली! हिंगोलीत दोन तासांत दोन भूकंपाचे धक्के; 4.5 तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये भीती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.