Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिक्षक बदलीचा वाद चिघळला; शिक्षण विभागाविरोधात संतप्त पालकांची आक्रमक भूमिका

तोंडवळी खालची येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेतील शिक्षकाच्या बदलीचा वाद चिघळला असून, संतप्त पालकांनी शिक्षण विभागाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 03, 2026 | 06:20 PM
शिक्षक बदलीचा वाद चिघळला; शिक्षण विभागाविरोधात संतप्त पालकांची आक्रमक भूमिका

शिक्षक बदलीचा वाद चिघळला; शिक्षण विभागाविरोधात संतप्त पालकांची आक्रमक भूमिका

Follow Us
Follow Us:

मालवण : तोंडवळी खालची येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेतील शिक्षकाच्या बदलीचा वाद चिघळला असून, संतप्त पालकांनी शिक्षण विभागाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. गेल्या पाच दिवसांपासून विद्यार्थ्यांनी शाळेवर बहिष्कार टाकला असून, संबंधित शिक्षकाची पुनर्नियुक्ती न झाल्यास सोमवारपासून सर्व विद्यार्थ्यांचे शाळेतून दाखले काढून घेण्याचा इशारा पालकांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी परागिनी पाटील, गटशिक्षणाधिकारी संजय माने आणि पंचायत समिती सदस्य गणेश तोंडवळकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीत पालकांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आणत प्रशासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त केली.

 

शाळेत एकूण २८ विद्यार्थी शिक्षण घेत असून, पूर्वी तीन शिक्षकांची नियुक्ती होती. मात्र, समायोजन प्रक्रियेत एका शिक्षकाची बदली झाल्यानंतर सध्या केवळ मुख्याध्यापक आणि एक सहशिक्षक यांच्या माध्यमातून अध्यापन सुरू आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचे पालकांनी सांगितले. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून उपशिक्षकाचे पद रिक्त असल्याने शाळेला शिक्षकांच्या कमतरतेचा सातत्याने सामना करावा लागत असल्याची बाबही त्यांनी निदर्शनास आणून दिली. विद्यार्थ्यांशी सुसंवाद निर्माण करून प्रभावी अध्यापन करणाऱ्या शिक्षकाचीच बदली झाल्याने मुलांवर मानसिक परिणाम होईल, असे पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे बदली रद्द करून संबंधित शिक्षकाला पुन्हा तोंडवळी खालची शाळेत नियुक्त करावे, अशी त्यांची ठाम मागणी आहे.

बैठकीस शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा जानव्ही पराडकर, सुरेंद्र मालंडकर, नंदा कोचरेकर, दिपेश मायबा, केतकी मायबा, मनोज चोडणेकर, मनस्वी चोडणेकर, संजय केळूसकर, भूपाल मालंडकर, विजय खवणेकर, संजय अंकुश तारी, स्वप्नील तारी, संजय जुवाटकर, अनिरुद्ध जुवाटकर, अनुष्का जुवाटकर, प्रमोद तोरसकर, प्रिया तोरसकर, दुर्वा मायबा, पुंडलिक मालंडकर, पूर्वा मालंडकर, प्रगती जुवाटकर, स्नेहल केळूसकर, दिक्षा कोचरेकर, अक्षरा कोचरेकर, नम्रता कोचरेकर, स्नेहा कांदळगावकर, नीलिमा रेवंडकर, शमिका धुरी, सांची चोडणेकर, घनश्याम चोडणेकर यांच्यासह मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा : अकरावी प्रवेशाची विशेष गुणवत्ता यादी जाहीर! कॉलेज मिळालंय की नाही? त्वरित तपासा ‘हा’ पर्याय

प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेण्याचे आश्वासन

यावेळी गटशिक्षणाधिकारी संजय माने यांनी संबंधित बदली शासनाच्या धोरणानुसार आणि समायोजन प्रक्रियेअंतर्गत झाल्याचे स्पष्ट केले. तर गटविकास अधिकारी परागिनी पाटील यांनी शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेण्याचे आश्वासन दिले. मात्र, पालकांनी हे आश्वासन अपुरे असल्याचे सांगत, “प्रशासनाने पाहणीसाठी येताना संबंधित शिक्षकालाही सोबत आणावे. अन्यथा सोमवारपासून सर्व विद्यार्थ्यांचे दाखले काढून पुढील आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जाईल,” असा स्पष्ट इशारा दिला.

Web Title: Angry parents have adopted an aggressive stance against the education department

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 06:20 PM

Topics:  

  • maharashtra
  • Malvan News
  • Teachers

संबंधित बातम्या

Manoj Jarange Patil: ‘…तर १० मिनिटांत महाराष्ट्र बंद पडला पाहिजे’; जरांगे पाटलांचा इशारा
1

Manoj Jarange Patil: ‘…तर १० मिनिटांत महाराष्ट्र बंद पडला पाहिजे’; जरांगे पाटलांचा इशारा

Nashik News: रस्त्यांची दुर्दशा अन् पोलिसांची परीक्षा! खड्ड्यांतून भाविकांचा प्रवास, त्र्यंबकेश्वर मार्गावर हजारो भाविकांची गर्दी
2

Nashik News: रस्त्यांची दुर्दशा अन् पोलिसांची परीक्षा! खड्ड्यांतून भाविकांचा प्रवास, त्र्यंबकेश्वर मार्गावर हजारो भाविकांची गर्दी

Gondiya News: कान्होबा विसर्जन; जवानाचा बुडून मृत्यू! बेरडीपार येथील घटना; लष्करी इतमामात होणार आज अंत्यसंस्कार
3

Gondiya News: कान्होबा विसर्जन; जवानाचा बुडून मृत्यू! बेरडीपार येथील घटना; लष्करी इतमामात होणार आज अंत्यसंस्कार

Bhandara News: बनावट डिझेल एक्झॉस्ट फ्लूइड विक्रीचा पर्दाफाश! तब्बल ७६,९०० हजारांचा मुद्देमाल जप्त
4

Bhandara News: बनावट डिझेल एक्झॉस्ट फ्लूइड विक्रीचा पर्दाफाश! तब्बल ७६,९०० हजारांचा मुद्देमाल जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.