Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मान्सूनच्या पार्श्वभूमीवर NDRF अलर्ट मोडवर! महाराष्ट्र आणि गोव्यातील ‘या’ संवेदनशील जिल्ह्यांमध्ये पाचवी बटालियन तैनात

मान्सून २०२६ च्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफची ५ वी बटालियन अलर्ट मोडवर असून महाराष्ट्र आणि गोव्यातील मुंबई, ठाणे, कोल्हापूरसह १२ संवेदनशील जिल्ह्यांमध्ये जवानांची पूर्वतैनाती करण्यात आली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 03, 2026 | 07:17 PM
मान्सूनच्या पार्श्वभूमीवर NDRF अलर्ट मोडवर! (Photo Credit- X)

मान्सूनच्या पार्श्वभूमीवर NDRF अलर्ट मोडवर! (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • मान्सूनच्या पार्श्वभूमीवर NDRF अलर्ट मोडवर!
  • महाराष्ट्र आणि गोव्यातील ‘या’ संवेदनशील जिल्ह्यांमध्ये पाचवी बटालियन तैनात
  • वाचा संपूर्ण बातमी!
मान्सून २०२६ (Monsoon 2026) दरम्यान अतिवृष्टी आणि संभाव्य पुराचा धोका लक्षात घेता राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल म्हणजेच एनडीआरएफ (NDRF) संपूर्णपणे अलर्ट मोडवर आले आहे. मान्सूनच्या काळात उद्भवणाऱ्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी एनडीआरएफच्या पुणे (Pune) येथील ५व्या वाहिनीने (5th Battalion) महाराष्ट्र आणि गोव्यातील विविध संवेदनशील जिल्ह्यांमध्ये आपल्या तुकड्यांची पूर्वतैनाती (Pre-deployment) केली आहे.

आपत्कालीन वेळेत होणार बचत; आधुनिक उपकरणांसह जवान सज्ज

पुणे येथील एनडीआरएफच्या ५व्या बटालियनचे कमांडेंट संतोष बहादूर सिंह यांनी या तैनातीबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “महाराष्ट्र आणि गोवा हे ५व्या वाहिनीचे प्राथमिक कार्यक्षेत्र आहे. संबंधित भागांची भौगोलिक संवेदनशीलता, मागील वर्षांमधील पुराचा अनुभव आणि भारतीय हवामान विभागाचा (IMD) अंदाज या सर्व गोष्टींचा सखोल अभ्यास करूनच ही रणनीतिक पूर्वतैनाती करण्यात आली आहे.”

सावध राहा! राज्यात ७ जुलैपर्यंत पावसाचा जोर; मुंबई, ठाणे, पालघरला रेड अलर्ट; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

या पूर्वतैनातीमुळे आपत्तीच्या वेळी घटनास्थळी पोहोचण्याच्या वेळेत (Response Time) मोठी बचत होणार आहे, ज्यामुळे बचाव आणि राहत कार्य तातडीने सुरू करता येईल. एनडीआरएफच्या सर्व तुकड्या अत्याधुनिक शोध व बचाव उपकरणे , पूर नियंत्रण साधने आणि प्रशिक्षित जवानांसह सज्ज आहेत.

नागरिकांच्या सुरक्षेसाठी NDRF कटिबद्ध

एनडीआरएफची ही सर्व पथके स्थानिक जिल्हा प्रशासन आणि इतर संबंधित आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांच्या (SDMA) सतत संपर्कात असून त्यांच्यात उत्तम समन्वय राखला जात आहे. कमांडेंट संतोष बहादूर सिंह यांनी नागरिकांना आश्वस्त केले आहे की, नैसर्गिक किंवा मानवनिर्मित, कोणत्याही प्रकारच्या आपत्तीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी एनडीआरएफ पूर्णपणे तयार आहे. वेळेत मदतकार्य पोहोचवून नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी दल सदैव कटिबद्ध आहे.

मुंबईत पावसाचा हाहाकार! शाळा-कॉलेजेस बंद करा आणि कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ द्या; शिंदेंच्या ‘या’ बड्या नेत्याचे BMC ला आवाहन

Web Title: Ndrf 5th battalion pre deploys teams in maharashtra and goa for monsoon 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 07:16 PM

Topics:  

  • Goa
  • maharashtra
  • Monsoon News

संबंधित बातम्या

Pratap Sarnaik: ॲप टॅक्सी चालकांसाठी मोठी बातमी! कंपन्यांना 3 महिन्यांत द्यावी लागणार चालकांची संपूर्ण माहिती
1

Pratap Sarnaik: ॲप टॅक्सी चालकांसाठी मोठी बातमी! कंपन्यांना 3 महिन्यांत द्यावी लागणार चालकांची संपूर्ण माहिती

Gondiya News: रोजगाराचा शोध काळाने रस्त्यावरच संपवला!  गोंदियामध्ये ट्रकच्या धडकेत मध्य प्रदेशातील ६ मजुरांचा मृत्यू
2

Gondiya News: रोजगाराचा शोध काळाने रस्त्यावरच संपवला!  गोंदियामध्ये ट्रकच्या धडकेत मध्य प्रदेशातील ६ मजुरांचा मृत्यू

Maratha Reservation Protest: ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा; तहसीलदारांची खुर्ची बाहेर आणून जाळली, उमरग्यात चार जण ताब्यात
3

Maratha Reservation Protest: ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा; तहसीलदारांची खुर्ची बाहेर आणून जाळली, उमरग्यात चार जण ताब्यात

Dharashiv News: मराठवाड्याची तहान भागणार! कृष्णेचे पाणी रामदरा तलावात; महिनाभरात चाचणी होणार : राणा पाटील
4

Dharashiv News: मराठवाड्याची तहान भागणार! कृष्णेचे पाणी रामदरा तलावात; महिनाभरात चाचणी होणार : राणा पाटील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.