Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amrit Bharat 3.0 : आता सर्वसामान्यांना मिळणार वंदे भारतचा अनुभव, भारतीय रेल्वेची मोठी घोषणा! अमृत भारत 3.0 मध्ये काय खास?

Amrit Bharat 3.0 : सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेने एक अत्यंत आनंदाची बातमी आणली आहे. बजेट प्रवासासाठी लोकप्रिय ठरलेल्या 'अमृत भारत' ट्रेनच्या ३.० व्हर्जनमध्ये आता AC कोचचाही समावेश केला जाणार आहे. अत्यंत कमी तिकिटात 'वंदे भारत' एक्सप्रेससारख्या सुविधा देण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 23, 2026 | 03:02 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • आता सर्वसामान्यांना मिळणार वंदे भारतचा अनुभव
  • भारतीय रेल्वेची मोठी घोषणा!
  • अमृत भारत 3.0 मध्ये काय खास?
Amrit Bharat 3.0 : प्रवास म्हटला की प्रत्येकाला वेगवेगळे पर्याय आपलेसे वाटतात. पण जर जलद आणि बजेट फ्रेंडली पर्याय म्हणून जर पाहायचं असेल तर नेहमी रेल्वे प्रवासाकडे पाहिलं जातं. त्याच अत्यंत सोयीच्या पर्याय असलेल्या रेल्वे कडून सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आली आहे. बजेट प्रवासासाठी लोकप्रिय ठरलेल्या ‘अमृत भारत’ ट्रेनच्या ३.० मध्ये आता एसी कोचचाही समावेश केला जाणार आहे. भारतीय रेल्वेने नेमकी काय घोषणा केली आहे? काय बदल होणार आहे? ( Amrit Bharat 3.0 )

Gold Loan Business : सोन्यावर कर्ज देण्याच्या धंद्यात एवढी कमाई? टाटा, गोदरेज, बिर्ला… समुहांची धडाधड एन्ट्री, नेमका काय प्लॅन?

अमृत भारत एक्सप्रेस ही आतापर्यंत एक नॉन-एसी लांब पल्ल्याची प्रवासी ट्रेन होती. ज्यामध्ये जनरल क्लास आणि स्लीपर क्लासचे डबे होते. सर्वसामान्यांसाठी असलेल्या इतर एक्सप्रेस गाड्यांच्या तुलनेत अमृत भारत एक्सप्रेस सुपरफास्ट प्रवास करते आणि याचा प्रवास फार इतर एक्स्प्रेसच्या तुलनेत सुखद आणि आरामदायी आहे. पण या सगळ्यात आता एसीच्या सुखद प्रवासाची भर पडणार आहे. त्यामुळे बजेट फ्रेंडली एसी प्रवासाचा अनुभव सामान्यांनाही घेता येणार आहे.

या ट्रेनला बराच प्रतिसाद

२०२३ मध्ये सुरू झालेल्या अमृत भारत ट्रेनपैकी ६० पेक्षा जास्त ट्रेन या भारतीय रेल्वेच्या नेटवर्कवर धावत आहेत. स्लीपर क्लासचा दर प्रति १००० किलोमीटर अंदाजे मध्ये अंदाजे ₹५०० इतका आहे. प्रवास परवडणारा असावा हा यामागील उद्देश आहे. या ट्रेनला बराच प्रतिसाद मिळत असलेला दिसून येतो. भारतीय रेल्वेच्या आकडेवारीनुसार, अमृत भारत ट्रेनच्या स्लीपर क्लासमधील सरासरी प्रवासी संख्या जवळजवळ १००% पेक्षा जास्त आहे.

लोकोमोटिव्ह इंजिनमुळे प्रवासाचा वेग जलद

अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांना दोन्ही टोकांना लोकोमोटिव्ह इंजिन असतात. त्यामुळे गती आणि वेगाचा संगम नियंत्रित करण्यास मदत होते. वेग वाढवण्यासाठी व कमी करण्यासाठी पुश-पुल तंत्रज्ञानाचा इथे वापर केला जातो. यामुळे प्रवाशांचा एकूण प्रवासाचा वेळ कमी होतो. ट्रेनचा कमाल वेग ताशी १३० किमीपर्यंत असू शकतो. अमृत भारत एक्सप्रेस सामान्य नागरिक, मजून आणि इतर राज्यांमध्ये काम करणाऱ्या प्रवाशांसाठीचा देखील महत्त्वाचा भाग आहे. सणासुदीच्या दिवसांतील गर्दीचे व्यवस्थापन करणे आणि आधुनिक, काही प्रमाणात प्रीमियम प्रवासी सेवा प्रदान करणे हे देखील या गाडीचे उद्दिष्ट आहे.

वंदे भारत एक्सप्रेससारखी अनेक वैशिष्ट्ये

भारतीय रेल्वे आता अमृत भारत एक्सप्रेससाठी एसी डबे विकसित करत आहे. सूत्रांनी सांगितलेल्या माहितीनुसार, प्रवाशांना एक उत्तम अनुभव देण्यासाठी वातानुकूलित अमृत भारतच्या डब्यांमध्ये वंदे भारत स्लीपर आणि राजधानी एक्सप्रेससारखी अनेक वैशिष्ट्ये असतील.त्यांनी सांगितले की, लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी एसी फर्स्ट क्लास, एसी-२ टियर आणि एसी-३ टियर अशा तीन प्रकारच्या एसी डब्यांची योजना आखण्यात आली आहे.

अमृत भारत ३.० साठी एसी डब्यांच्या एकूण १४ रेक्सची ऑर्डर देण्यात आली आहे.एसी डब्यांच्या अमृत भारत एक्सप्रेस गाड्या इतर लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांसारख्याच असतील, पण त्यात वंदे भारत आणि राजधानी एक्सप्रेसप्रमाणे आधुनिक प्रवासी सुविधा आणि सोयीदेखील असतील.

TikTok Privacy Fine : टिकटॉकला मोठा दणका! भरावा लागणार 3300 कोटींचा दंड, लहान मुलांच्या प्रायव्हसीसोबत छेडछाड? प्रकरण काय?

Web Title: Amrit bharat 3 0 train to get ac coaches vande bharat facilities and features details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2026 | 03:02 PM

Topics:  

  • amrit bharat express
  • Business News
  • Indian Railway
  • Marathi News
  • vande bharat
  • vande bharat express

संबंधित बातम्या

Russia-Ukraine :धक्कादायक ;युक्रेनवर रशियाचा मोठा मिसाईल-ड्रोन हल्ला ;२४ जणांचा मृत्यू
1

Russia-Ukraine :धक्कादायक ;युक्रेनवर रशियाचा मोठा मिसाईल-ड्रोन हल्ला ;२४ जणांचा मृत्यू

World News:तेलाचा भाव १०० डॉलरपार,जगाला महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेलपासून वाहतुकीपर्यंत वाढणार दबाव
2

World News:तेलाचा भाव १०० डॉलरपार,जगाला महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेलपासून वाहतुकीपर्यंत वाढणार दबाव

Taiwan-China : तैवानजवळ चीनची लष्करी हालचाल; १४ लढाऊ विमानांसह ८ जहाजांची घुसखोरी, तणाव वाढला
3

Taiwan-China : तैवानजवळ चीनची लष्करी हालचाल; १४ लढाऊ विमानांसह ८ जहाजांची घुसखोरी, तणाव वाढला

West Bank News : ऑलिव्हच्या शेतात रक्तपात; वसाहतवाद्यांच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी नागरिक ठार
4

West Bank News : ऑलिव्हच्या शेतात रक्तपात; वसाहतवाद्यांच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी नागरिक ठार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.