Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Anil Agarwal Success Story : 16 लाख उधार घेत सुरु केला व्यवसाय, आज 3600000000000 चे मालक! अनिल अग्रवाल यांनी कसा बदलला गेम?

Anil Agarwal Success Story : उद्योग विश्वातील दिग्गज उद्योगपती आणि वेदांता ग्रुपचे संस्थापक अनिल अग्रवाल यांनी आपल्या ₹३.६ लाख कोटींच्या व्यवसाय साम्राज्याची यशोगाथा अवघ्या २३७ शब्दांत शेअर केली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 26, 2026 | 01:25 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • 16 लाख उधार घेत सुरु केला व्यवसाय
  • आज 3600000000000 चे मालक!
  • अनिल अग्रवाल यांनी कसा बदलला गेम?
Anil Agarwal Success Story : भारतीय उद्योग विश्वातील दिग्गज उद्योगपतींपैकी एक नाव म्हणजे अनिल अग्रवाल. वेदांता ग्रुपचे संस्थापक होण्यापासून ते संपूर्ण जगाच्या कोपऱ्या कोपऱ्यात नाव पोहोचलण्याचा प्रवास फार रंजक होता. नुकतंच त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावरुन त्यांच्या भूतकाळातील आठवणी आणि व्यावसायिक प्रवासाबाबतचा रंजक किस्सा शेअर केला आहे. यावेळी त्यांनी आपला अनुभव आलेल्या अडचणी या सगळ्याचा उल्लेख केला. यात सांगताना ते प्रकर्षाने म्हणाले की व्यवसायातील प्रत्येक प्रयत्न यशस्वी होतोचं असं नाही. कधीकधी अपयशच हा पर्याय पुढे जाण्याचा महत्त्वाचा मार्ग दाखवतो. नेमका कसा होता प्रवास? कसा उधारीतून एवढं मोठं साम्राज्य उभं केलं जाणून घेऊयात. ( Anil Agarwal Success Story ) 

Multibagger Penny Stock : ‘या’ शेअरमध्ये तुफान तेजी! गुंतवणूकदारांचे पैसे झाले डबल? कंपनीने दिला 2 वेळा बोनस

कशी झाली वेदांताची सुरुवात?

वेदांता ग्रुपचे चेअरमन आणि अब्जाधीश उद्योगपती अनिल अग्रवाल हा ब्राँड काही सहज बनला नाही. त्याच्या मागे बरीच मोठी गोष्ट आहे. खडतर प्रवास आणि अत्यंत गरिबीतून सुरु झालेली ही वाट अथक प्रयत्नानंतर श्रीमंतीच्या वाटेवर पोहोचली. ही वाटचाल सर्वात प्रेरणादायी कथांपैकी एक आहे. त्यांनी आपला प्रवास अक्षरशः शून्य भांडवलातून सुरू केला होता. पण आपल्या पहिल्या मोठ्या अधिग्रहणासाठी कर्ज आणि उधारीतून त्यांनी ₹१.६ दशलक्ष उभे केले आणि इथून सुरु झाला प्रवास पुढे ब्राँड बनण्याचा.

‘वीर भोग्य वसुंधरा’चं उदाहरण

या सगळ्या प्रवासाबद्दल सांगताना अनिल अग्रवाल यांनी एक विशिष्ट म्हणीचा वापर केला. ‘वीर भोग्य वसुंधरा’ ही संस्कृत म्हण खूप काही सांगून जाते. याचा अर्थ असा आहे की, जे धाडसी आहेत, जोखीम पत्करतात आणि ते आपल्या क्षेत्रात चिकाटीने काम करतात, तेच भविष्यात यश मिळवतात. या ती शब्दाच्या म्हणीमध्ये आयुष्यात पाहिलेला सगळा प्रवास आणि नवीन उद्योग जगतात पाऊल ठेवणाऱ्या प्रत्येकासाठी संदेश ठरतो. त्यांच्या मते, व्यवसायात केवळ आयडिया पुरेशी नसते. तर ती आयडिया सत्यात उतरवण्यासाठी अंगी धाडस आणि कठीण काळात चिकाटीने काम करण्याची क्षमता, या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या ठरतात.

अक्सर लोग मुझसे पूछते हैं कि, सर, आप जीवन में बड़े-बड़े रिस्क लेते आए हैं, क्या आपको कभी डर नहीं लगा? सच कहूँ तो शुरुआती दिनों में कई बार मुझमें भी यह भावना आई कि अगर मैं वो नहीं कर पाया जो मैं चाहता हूँ, तो क्या होगा? पर तभी याद आ जाती थी बाऊजी से सुनी एक संस्कृत की कहावत – वीर… pic.twitter.com/Y8BA9yGv46 — Anil Agarwal (@AnilAgarwal_Ved) August 25, 2026

एका पराभवाने शिकवली मोठी शिकवण

अनिल अग्रवाल यांनी त्यांच्या एका जुन्या व्यावसायिक अनुभवाची आठवण सांगितली. त्यांनी त्यांना सुरुवातीला आलेल्या अपयशाचा प्रकर्षाने उल्लेख केला. ज्यात त्यांचा एक सौदा यशस्वी झाला होता. वरवर पाहता, हे नुकसान किंवा अपयश वाटू शकले असते, पण त्यांनी तेवढ्यावरच समाधान मानले नाही. या अनुभवातून त्यांनी बोध घेतला ते शिकले आणि पुढच्या वेळी संधी कशी साधावी, कोणती तयारी करावी आणि अधिक चांगल्या रणनीतीवर काम करत पुढचा टप्पा गाठावा याचं प्लानिंग केलं. या शिकवणीमुळे ते त्यांच्या पुढच्या सौद्यासाठी अधिक चांगल्या प्रकारे तयार झाले.

महिलांची प्रगती

आपल्या यशाबद्दल बोलताना अनिल अग्रवाल यांनी महिलांचादेखील महत्त्वपूर्ण उल्लेख केला. त्यांनी लिहिले, “जेव्हा जेव्हा मी मेहनती तरुण, उद्योजक आणि महिलांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळवताना पाहतो, तेव्हा त्यांच्यावरील माझा विश्वास अधिकच दृढ होत जातो.”

जगभर पसरला व्यवसाय

एके काळी ८x९ फूटच्या खोलीतून सुरु झालेला हा व्यवसाय जागतिक स्तरावर पोहोचला. वेदांता ग्रुपला एका जागतिक नैसर्गिक संसाधन समूहात रूपांतरित केले आहे. वेदांताचा व्यवसाय धातू, खाणकाम, तेल आणि वायू, ऊर्जा आणि इतर नैसर्गिक संसाधने यांसारख्या क्षेत्रांमध्ये पसरलेला आहे. भारतीय शेअर बाजारात लिस्टेड असलेल्या वेदांता ग्रुपच्या कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल सध्या सुमारे ₹३.६० लाख कोटी (रु. ३,६०,००० कोटी) आहे.

ऑफिस, रिटेल, F&B अन् अर्बन लॉजिस्टिक्स एकाच छताखाली; ठाण्यात उभारतेय भारतातील पहिले एकात्मिक शहरी व्यावसायिक केंद्र

Web Title: Anil agarwal success story 16 lakh loan to 3 6 lakh crore vedanta empire journey

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 01:24 PM

Topics:  

  • Business News
  • success tips
  • Vedant Agarwal
  • Vedanta Foxconn

संबंधित बातम्या

CJP Protests चा मोठा फटका व्यापाराला! दिल्लीत 2000 कोटी रुपयांचा दणका, पेट्रोल पंपावर शुकशुकाट; सर्वसामान्यांचे प्रचंड हाल
1

CJP Protests चा मोठा फटका व्यापाराला! दिल्लीत 2000 कोटी रुपयांचा दणका, पेट्रोल पंपावर शुकशुकाट; सर्वसामान्यांचे प्रचंड हाल

व्हिस्की शौकीनांसाठी दिवाळीची खास भेट! Indri चे दुर्मिळ Ruby Port Cask व्हर्जन लाँच; लंडननंतर आता भारतात उपलब्ध
2

व्हिस्की शौकीनांसाठी दिवाळीची खास भेट! Indri चे दुर्मिळ Ruby Port Cask व्हर्जन लाँच; लंडननंतर आता भारतात उपलब्ध

M1xchange Maharashtra: महाराष्ट्रातील छोट्या उद्योगांसाठी खुशखबर, आता पैशांची अडचण होणार नाही
3

M1xchange Maharashtra: महाराष्ट्रातील छोट्या उद्योगांसाठी खुशखबर, आता पैशांची अडचण होणार नाही

Share Market: शेअर बाजारात चहूबाजूने हाहाःकार! तेलापासून RBI पर्यंत 5 मोठे आघात
4

Share Market: शेअर बाजारात चहूबाजूने हाहाःकार! तेलापासून RBI पर्यंत 5 मोठे आघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.