Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PepsiCo Pune Plant : पेप्सिको इंडियाच्या पुणे प्लांटचे रौप्य महोत्सवी वर्ष! 25 वर्षांचा यशस्वी प्रवास, शेकडो शेतकऱ्यांना बळ!

PepsiCo Pune Plant : स्नॅक्स आणि पेये क्षेत्रातील अग्रगण्य पेप्सिको इंडियाच्या पुण्यातील उत्पादन प्रकल्पाने यशस्वी २५ वर्षे पूर्ण केली आहेत. तब्बल ₹६०० कोटींहून अधिकची गुंतवणूक असलेल्या या १५ एकरांतील कारखान्यातून वर्षाला ६२,१०० टन उत्पादन घेतले जाते.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 25, 2026 | 02:19 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • पेप्सिको इंडियाच्या पुणे प्लांटचे रौप्य महोत्सवी वर्ष!
  • 25 वर्षांचा यशस्वी प्रवास
  • शेकडो शेतकऱ्यांना बळ!
PepsiCo Pune Plant : स्नॅक्स आणि पेये क्षेत्रातील प्रमुख कंपनी पेप्सिको इंडियाने आज आपल्या पुणे उत्पादक प्लांटच्या कामाची 25 वर्षे पूर्ण केली. या कालावधीत 600 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीचे पाठबळ असलेला हा प्लांट पेप्सिकोच्या ‘इन इंडिया, फॉर इंडिया’ या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. खाद्यपेये क्षेत्रातील जागतिक स्तरावरील आघाडीची कंपनी ‘पेप्सिको इंडिया’च्या पुण्यातील उत्पादन कारखान्याने नुकतीच आपल्या यशस्वी कामकाजाची २५ वर्षे पूर्ण केली आहेत. या प्लांटमध्ये आतापर्यंत ६०० कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करण्यात आली आहे. ( PepsiCo Pune Plant ) 

Cheap Onion Scheme : सरकारची मोठी घोषणा! ‘या’ 5 शहरांत 35 रुपये किलोने मिळणार कांदा? लिस्टमध्ये तुमचं शहर आहे का?

वार्षिक ६२ हजार टनांहून अधिक उत्पादन क्षमता

२००१ मध्ये सुरू झालेला हा १५ एकरांचा परिसर आज देशातील एक प्रमुख उत्पादन केंद्र बनला आहे. वर्षाला 62,100 टन उत्पादन क्षमतेसह हा एक महत्त्वाचा उत्पादन केंद्र बनला आहे. 2001 मध्ये सुरू झालेला हा 15 एकरचा प्लांट लेज, कुरकुरे, चीटोस, सॉलिड मस्ती आणि अंकल चिप्सचे उत्पादन करतो. उत्पादन झालेला हा माल पश्चिम आणि दक्षिण भारतातील ग्राहकांना पुरवले जातात.

1400 लोकांना रोजगाराची संधी आणि स्थानिक उद्योगांना बळ

हा प्लांट पेप्सिकोच्या ‘पार्टनरशिप ऑफ प्रोग्रेस’ या विचाराचे एक उत्तम उदाहरण आहे. या संकल्पनेवर आधारित हा प्लांट स्थानिक आर्थिक विकासाला सातत्याने गती देत आहे. शेतकरी, समुदाय, कर्मचारी, उद्योग भागीदार आणि महाराष्ट्र सरकारच्या कित्येक दशकांच्या सहकार्यातून सर्वसमावेशक आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी तयार झाला आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या माध्यमातून या कारखान्याने सुमारे १,४०० लोकांना उपजीविकेचे साधन उपलब्ध करून दिले आहे.

पेप्सिको इंडिया आणि दक्षिण आशियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जागृत कोटेचा यांनी या टप्प्याबाबत बोलताना म्हणतात, “पुणे हे गेल्या 25 वर्षांपासून पेप्सिको इंडियाच्या विकासातील एक महत्त्वाचा भाग राहिले आहे. भारतातील आमचा हा दुसरा खाद्यपदार्थ बनवणारा कारखाना आहे. या कारखान्याची क्षमता आता सहा पटीने वाढली आहे आणि याद्वारे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या माध्यमातून जवळपास 1,400 लोकांच्या उपजीविकेला हातभार लागला आहे. देशातील पहिली स्वयंचलित पॅलेटायझेशन सिस्टीम आणि बटाट्याचे डिजिटल ऑटो-ग्रेडिंग करण्यापासून ते पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणावर कमी करणाऱ्या पाणी-पुनर्वापराच्या नवीन तंत्रज्ञानाची सुरुवात इथूनच झाली आहे”.

ते पुढे म्हणाले, “2022 पासून हा कारखाना झिरो लिक्विड डिस्चार्ज प्लांट म्हणून काम करत आहे, ज्यातून नवीन शोध आणि शाश्वत विकास एकत्र येऊन कसा मोठा बदल घडवून आणू शकतात हे दिसून येते. या प्रवासाच्या केंद्रस्थानी आमचे ‘प्रगतीसाठी भागीदारी’ हे तत्त्वज्ञान आणि शेतकरी, स्थानिक नागरिक, कर्मचारी व उद्योगातील भागीदारांसोबतची आमची मजबूत साथ राहिली आहे. पुणे कारखाना जेव्हा 25 वर्षे पूर्ण करत आहे, तेव्हा भारताप्रती आमची दीर्घकालीन बांधिलकी, स्थानिक उत्पादन आणि अधिक नाविन्यपूर्ण, मजबूत व शाश्वत भविष्य घडवण्याचा आमचा निश्चय यात स्पष्टपणे दिसून येतो.”

शेतकऱ्यांच्या समृद्धीला बळ:

पुण्यातील पेप्सिको इंडियाचे यश तिथल्या कृषी व्यवस्थेशी घट्ट जोडलेले आहे. पेप्सिको इंडिया आपल्या पुणे प्लांटसाठी कच्चा माल मिळवण्यासाठी महाराष्ट्रातील शेकडो शेतकऱ्यांसोबत भागीदारी करतो. आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे पिकांची गुणवत्ता वाढवण्यासाठी मदत करत आहे. ज्यामुळे पिकांचे उत्पन्न व गुणवत्ता सुधारत आहे आणि पुनरुज्पादक शेती पद्धतींना प्रोत्साहन मिळत आहे. महाराष्ट्र आणि गुजरात मधील प्रमुख राज्यांतील आपल्या बटाटा उत्पादक भागीदार शेतात कंपनीने १००% सूक्ष्म सिंचनाचा वापर साध्य केला आहे.

पर्यावरण संवर्धन आणि पाण्याची बचत

पेप्सिको पॉझिटिव्ह च्या मार्गदर्शनाखाली, पुणे प्लांट प्रगत उत्पादन क्षमता आणि उद्योगातील अग्रेसर शाश्वत पद्धतींचा मेळ घालतो. हा प्लांट आपल्या आवश्यकतेपैकी ९८.६% वीज अक्षय ऊर्जेच्या स्रोतांतून मिळवतो. गेल्या ६ वर्षांपासून येथे ‘झिरो लँडफिल वेस्ट’चा दर्जा टिकवून ठेवण्यात आला आहे. हा प्लांट लागू असलेल्या सर्व एक्सटेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी नियमांचे पालन करतो. हा प्लांट बटाट्यातील ओलावा पुन्हा मिळवण्याच्या तंत्रज्ञानासारख्या नाविन्यपूर्ण पद्धतींचा वापर करतो, ज्यामुळे थंड करण्याच्या पारंपरिक पद्धतींऐवजी पाण्याचा वापर कमी होतो.

बटाटे धुण्याचे स्टार्चयुक्त पाणी पुन्हा उत्पादनात वापरले जाते.या उपायांमुळे एक वर्षात जवळपास 255 दशलक्ष लिटर पाण्याची बचत झाली, जे 1300 कुटुंबांच्या एक वर्षाच्या पाण्याच्या गरजेइतके आहे.पेप्सिको इंडियाचा पुण्यातील सस्टेनेबल वॉटर रिसोर्स डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट कार्यक्रम स्थानिक समुदायांच्या भागीदारीतून जलसंधारण आणि पुनर्भरणावर लक्ष केंद्रित करतो. हा उपक्रम सहा गावांमध्ये पसरलेला असून त्याचा 15,000 लोकांना फायदा झाला आहे. तसेच जलस्रोतांचे शाश्वत व्यवस्थापन करण्याची क्षमता निर्माण करून या भागात 100% पेक्षा जास्त पाणी पुनर्भरणास मदत करत आहे.

MakeMyTrip Axis Bank Offer : फिरण्याचा प्लॅन करताय? मेकमायट्रिप अन् ॲक्सिस बँक देतंय मोठं डिस्काउंट, मिळणार बंपर सूट

Web Title: Pepsico pune plant manufacturing completes 25 years investment details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 02:19 PM

Topics:  

  • Business News
  • food
  • Pune

संबंधित बातम्या

Real vs Fake Saffron: केशर अस्सल की बनावट? 5 सोप्या पद्धतीने पटकन ओळखा
1

Real vs Fake Saffron: केशर अस्सल की बनावट? 5 सोप्या पद्धतीने पटकन ओळखा

Foreign Direct Investment : सरकारचा मास्टस्ट्रोक! भारतात 4895 कोटींची परदेशी गुंतवणूक;  FDI नियमांमधील बदलामुळे फायदा?
2

Foreign Direct Investment : सरकारचा मास्टस्ट्रोक! भारतात 4895 कोटींची परदेशी गुंतवणूक; FDI नियमांमधील बदलामुळे फायदा?

Multibagger Stocks : बाजारातील पडझडीतही हे शेअर्स ठरले बाहुबली! दिला 65% पर्यंतचा बंपर रिटर्न; तुमच्याकडे आहेत का हे स्टॉक्स?
3

Multibagger Stocks : बाजारातील पडझडीतही हे शेअर्स ठरले बाहुबली! दिला 65% पर्यंतचा बंपर रिटर्न; तुमच्याकडे आहेत का हे स्टॉक्स?

YouTube Income Tax : डिजिटल क्रिएटर्सची कमाई ‘टॅक्स फ्री’ नाही! 31 ऑगस्टपूर्वी पूर्ण करा ‘हे’ काम; नाहीतर भरावा लागेल मोठा दंड
4

YouTube Income Tax : डिजिटल क्रिएटर्सची कमाई ‘टॅक्स फ्री’ नाही! 31 ऑगस्टपूर्वी पूर्ण करा ‘हे’ काम; नाहीतर भरावा लागेल मोठा दंड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.