फोटो सौजन्य - Social Media
बजाज फाऊंडेशनने ‘फ्यूचर ग्रीन लीडर्स: पॉवरिंग अँड ई-वेस्ट रिव्होल्यूशन’ या थीमअंतर्गत बालगंधर्व रंगमंदिर, मुंबई येथे ‘युथ इको समिट’च्या दुसऱ्या एडिशनचे आयोजन केले. या उपक्रमात ६० बीएमसी शाळांमधील २,००० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये विद्यार्थ्यांना ई-कचऱ्याच्या समस्यांविषयी जागरूक करण्यासाठी विविध सत्रे, पॅनेल चर्चा व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
यापूर्वीच्या वर्षी नवी दिल्लीत आयोजित पहिल्या एडिशनला चांगला प्रतिसाद मिळाला होता. या यशाला पुढे नेत यावर्षीच्या समिटमध्ये विद्यार्थ्यांसह तज्ज्ञ मान्यवरांचा सहभाग होता. प्रमुख मान्यवरांमध्ये अमन भैया (एसबीआय फाऊंडेशनचे उपाध्यक्ष), डॉ. अजय कौशल (इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, हैदराबाद), युसुफ कबीर (युनिसेफ तज्ज्ञ), आणि डॉ. प्रियदर्शिनी कर्वे (आयएनईसीसी) यांचा समावेश होता. टेक्नो मोबाइल, युनिसेफ युवा आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांनीही उपक्रमात सहभाग घेतला.
बजाज फाऊंडेशनचे संस्थापक पंकज बजाज म्हणाले, ”ई-कचराचा जगातील तिसरा सर्वात मोठा उत्पादक आणि सर्वाधिक तरूण लोकसंख्या असलेला देश भारतातील तरूण पिढी आव्हानात्मक ई-कचरा समस्येचा सामना करण्यासाठी उत्तमरित्या सज्ज आहे, ही समस्या आपण आज सामना करत असलेले सर्वात मोठे पर्यावरणीय आव्हान आहे. बजाज फाऊंडेशन या तत्त्वांवरील आपल्या उपक्रमांवर लक्ष केंद्रित करते, तसेच तरूण विचारवंतांना सक्षम करत ई-कचराप्रती कृतीला चालना देत आहे. युथ इको समिट प्लॅटफॉर्म म्हणून सेवा देते, जेथे विद्यार्थी व उद्योग प्रमुख एकत्र येऊन सहयोगाने ई-कचरा समस्या समजून घेण्याचा, तसेच या समस्येचे निराकरण करण्याच्या पद्धतींचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. आम्हाला येसच्या दुसऱ्या एडिशनला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाचा आनंद होत आहे आणि आम्ही वर्षभर ही गती कायम ठेवण्यास सज्ज आहोत.”
या समिटमध्ये ‘पर्यावरणीय परिवर्तनाला चालना देण्यासाठी मुलांना सक्षम करणे’ या विषयावर पॅनेल चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चेत मानवी कृतींचा पर्यावरणावर होणारा परिणाम व त्यावरील उपाय यावर चर्चा करण्यात आली. पॅनेलिस्ट्सनी कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी शाळा, समुदाय आणि उद्योगांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली.
विद्यार्थ्यांसाठी विशेष सत्रांमध्ये ई-कचऱ्यावर उपाय शोधण्याचे उपक्रम, सर्जनशील कला प्रदर्शन व ‘वेस्ट रीइमॅजिन्ड’ कार्यक्रम सादर करण्यात आले. सहभागी शाळांनी सादर केलेल्या पर्यावरणपूरक प्रकल्पांमधून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचे प्रदर्शन घडले. कार्यक्रमाच्या शेवटी युथ इको अवॉर्ड्स प्रदान करण्यात आले. बजाज फाऊंडेशनने आतापर्यंत ५० शहरांमधील ३,००० शाळांतील १५,००० हून अधिक विद्यार्थ्यांना जबाबदार ई-कचरा व्यवस्थापनाविषयी शिक्षित केले आहे. संस्थेचे हे प्रयत्न पर्यावरणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे तज्ज्ञांनी मान्य केले.