(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने तिच्या अभिनयाने आणि स्टाईलने अनेकांची मने जिंकली आहेत. तिच्या अभिनयाने दीपिका पादुकोणने केवळ बॉलीवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्येही एक मजबूत स्थान निर्माण केले आहे. अशातच आता दीपिका पादुकोणबद्दल मोठी बातमी समोर आली आहे की, ती लवकरच ‘द व्हाईट लोटस सीझन 4’ मध्ये दिसणार आहे. पण ‘स्पिरिट’ आणि ‘कलकी 2898 एडी’ नंतर आता हा प्रोजेक्टही दीपिका पादुकोणच्या हातातून निसटला आहे. असे म्हटले जात आहे की अभिनेत्रीच्या एका ‘नाही’मुळे तिला इतका मोठा प्रोजेक्ट गमवावा लागला आहे. ही माहिती मालिकेशी आणि अभिनेत्रीशी संबंधित एका सूत्राने दिली आहे.
The Kerala Story 2 आज होणार नाही प्रदर्शित? अॅडव्हान्स बुकिंगनंतर कोर्टाचा १५ दिवसांचा स्थगिती आदेश
‘द व्हाईट लोटस सीझन ४’ साठी दीपिकाने ऑडिशन देण्यास स्पष्ट नकार दिल्याचे वृत्त समोर आले आहे. अशा परिस्थितीत निर्मात्यांनी चित्रपटामधूनही वगळण्याचा निर्णय घेतला. ‘द व्हाईट लोटस सीझन ४’ च्या वृत्तानुसार, ‘द व्हाईट लोटस सीझन ४’ च्या निर्मात्यांनी दीपिका पादुकोणशी संपर्क साधला होता आणि अभिनेत्रीला ऑडिशन देण्यास सांगितले होते. याबद्दल बोलताना सूत्रांनी सांगितले की, “ऑडिशन ‘द व्हाईट लोटस’ च्या कास्टिंग प्रक्रियेचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. निर्मात्यांना कलाकारांना साइन करण्यापूर्वी त्यांचे ऑडिशन घ्यायचे होते. परंतु दीपिका पादुकोण ऑडिशन देऊ इच्छित नव्हती आणि यामुळे तिने ‘द व्हाईट लोटस’ ची संधी गमावली.” असे त्याने म्हटले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, “द व्हाईट लोटस” चे निर्माते दीपिका पादुकोणला या मालिकेत कास्ट करू इच्छित होते. त्यांनी सीझन ३ साठी अभिनेत्रीशी संपर्क साधला होता, परंतु त्यावेळी ती गर्भवती होती, म्हणूनच तिने ही ऑफर नाकारली. जर दीपिका “द व्हाईट लोटस ४” मध्ये दिसली असती, तर हॉलिवूडमध्ये तिचे महत्त्वपूर्ण पुनरागमन झाले असते. येथून दीपिका पादुकोणच्या कारकीर्दला नवी दिशा मिळाली असती. आता अशातच अभिनेत्री आता कोणत्या नव्या प्रोजेक्ट्समध्ये चाहत्यांना दिसते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
दीपिकाने साऊथ चित्रपटांनाही दिला नकार
हे लक्षात घेण्यासारखे आहे की सप्टेंबर २०२५ मध्ये, दीपिकाने प्रथम संदीप रेड्डी वांगा यांच्या “स्पिरिट” चित्रपटातून बाहेर पडली आणि नंतर “कलकी २८९८ एडी” या चित्रपटाच्या सिक्वेलमधून बाहेर पडल्याच्या बातम्या आल्या. वृत्तानुसार, दीपिकाने सुमारे २० दिवस शूटिंग केले. असे म्हटले जाते की नंतर फी वाढवण्याची मागणी केल्यानंतर तिने चित्रपट सोडला.






